Realme GT Neo 2 भारतात लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या नव्या स्मार्टफोनमध्ये काय असेल खास?

Realme कंपनीचे भारतातील प्रमुख माधव सेठ यांनी या स्मार्टफोनसंदर्भात ट्विटरवर संकेत दिले आहेत. माधव सेठ यांनी मायक्रोब्लॉगिंग साईटवर ट्विट करून एक पोल तयार केला आहे आणि म्हटले आहे की, लवकरच Realme GT Neo 2 भारतात दाखल होईल.

Realme GT Neo 2 भारतात लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या नव्या स्मार्टफोनमध्ये काय असेल खास?
Follow us
| Updated on: Sep 27, 2021 | 5:21 PM

मुंबई : Realme GT Neo 2 हा चीनी ब्रँडचा लेटेस्ट प्रीमियम फोन आहे जो सध्या चर्चेत आहे. चिनी टेक कंपनी Realme ने आपल्या लेटेस्ट GT सिरीजमधील स्मार्टफोन नुकताच चीनमध्ये लाँच केला आहे. जीटी निओ 2 नवीन कॅमेरा डिझाइनसह येतो जो आपण वनप्लस नॉर्ड 2 वर पाहू शकता. जीटी निओ 2 ब्लॅक मिंट रंगात येतो, जो निऑन ग्रीन आणि ब्लॅकचं कॉम्बिनेशन आहे. दरम्यान, हा फोन लवकरच भारतात लाँच केला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. (Realme GT Neo 2 ready to launch in India, check price and features)

Realme कंपनीचे भारतातील प्रमुख माधव सेठ यांनी या स्मार्टफोनसंदर्भात ट्विटरवर संकेत दिले आहेत. माधव सेठ यांनी मायक्रोब्लॉगिंग साईटवर ट्विट करून एक पोल तयार केला आहे आणि म्हटले आहे की, लवकरच Realme GT Neo 2 भारतात दाखल होईल. सेठ यांनी फोनची लाँचिंग डेट सांगितलेली नसली तरी त्यांनी ट्विटर पोलमध्ये लोकांनाच या फोनच्या लाँचिंग डेटबद्दल मतदान करायला सांगितलं आहे. त्यांनी युजर्सना चार पर्याय दिले आहेत. त्यामध्यो लोकांकडून ऑक्टोबरच्या सुरुवातीला सर्वाधिक मतं मिळाली आहेl. त्यामुळे कदाचित कंपनी हा फोन ऑक्टोबरच्या सुरुवातीला लाँच करु शकते.

रिअलमीच्या लेटेस्ट फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 870 प्रोसेसर वापरण्यात आला आहे. हा प्रोसेसर स्नॅपड्रॅगन 865 ची थोडी सुधारित आवृत्ती आहे जी गेल्या वर्षीच्या स्मार्टफोनसाठी फ्लॅगशिप प्रोसेसर होती. याचा अर्थ असा की ग्राहकांना या फोनच्या परफॉर्मन्सबद्दल जास्त काळजी करण्याची गरज नाही, कारण परफॉर्मन्सच्या बाबतीत हा फोन टॉप-क्लास असेल, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

किंमती

8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हर्जनची किंमत CNY 2,499 (अंदाजे 28,500 रुपये) आहे.

8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हर्जनची किंमत CNY 2,699 (अंदाजे 30,700 रुपये) आहे.

12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हर्जनची किंमत CNY 2,999 (अंदाजे 34,200 रुपये) आहे.

फीचर्स

Realme GT Neo 2 मध्ये 6.62 इंचाचा फुल HD+ E4 AMOLED डिस्प्ले, जो 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट, कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन, 600Hz चा टच सॅम्पलिंग रेट, 1300nits ची पीक ब्राइटनेस आणि DC dimming सपोर्टसह येईल. या फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे. डिस्प्लेच्या डाव्या बाजूला पंच-होल कटआऊट आहे आणि त्याच्या आत 16 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. GT Neo 2 मध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 870 प्रोसेसर आहे जो 12GB पर्यंत RAM आणि 256GB इंटर्नल स्टोरेजसह जोडलेला आहे. यात मायक्रोएसडी कार्ड सपोर्ट देखील आहे.

GT Neo 2 च्या मागील बाजूस तीन कॅमेरा सेन्सर आहेत, त्यात 64 मेगापिक्सलचा मुख्य, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड-अँगल सेन्सर आणि 2 मेगापिक्सल डेप्थ सेन्सरचा समावेश आहे. Realme GT Neo 2 मध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 65W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. चार्जिंग आणि ऑडिओ आउटपुटसाठी फोनमध्ये यूएसबी-सी पोर्ट आहे. जीटी निओ 2 वाय-फाय 6 ला सपोर्ट करतो.

इतर बातम्या

5000 रुपयांच्या रेंजमध्ये Itel चा ढासू स्मार्टफोन लाँच, युजर्सना फ्री स्क्रीन रिप्लेसमेंटसह ट्रेंडी फीचर्स मिळणार

Samsung फ्लॅगशिप स्मार्टफोन गॅलेक्सी S22 लाँचिंगसाठी सज्ज, आयफोनपेक्षा लहान, फीचर्स दमदार

256 GB स्टोरेज, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह Realme चा शानदार स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या फीचर्स

(Realme GT Neo 2 ready to launch in India, check price and features)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.