Realme C25s ते Realme 8 5G, पाच स्मार्टफोनच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या नव्या किंमती

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 31, 2021 | 4:54 PM

स्मार्टफोन निर्माता कंपनी Realme ने आपल्या पाच स्मार्टफोनच्या किंमतीत वाढ केली आहे, या यादीत Realme C25s, Realme C21, Realme C11, Realme 8 आणि Realme 8 5G या स्मार्टफोनचा समावेश आहे.

Realme C25s ते Realme 8 5G, पाच स्मार्टफोनच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या नव्या किंमती
Realme 9 सिरीज झाली टीज, पुढच्या आठवड्यात फोनच्या स्पेसिफिकेशनबाबत होईल खुलासा

Follow us on

मुंबई : स्मार्टफोन निर्माता कंपनी Realme ने आपल्या पाच स्मार्टफोनच्या किंमतीत वाढ केली आहे, या यादीत Realme C25s, Realme C21, Realme C11, Realme 8 आणि Realme 8 5G या स्मार्टफोनचा समावेश आहे. कंपनीने Realme C21 च्या किंमतीत 300 रुपयांची वाढ केली आहे. त्याचबरोबर Realme C25 आणि Realme C25s खरेदी करण्यासाठी आणखी 500 रुपये मोजावे लागतील. दुसरीकडे, जर तुम्ही Realme 8 आणि Realme 8 5GB खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुम्हाला यासाठी 1500 रुपये अधिक मोजावे लागतील. (Realme India increased price of its 5 smartphones, including Realme 8 5G, C11, C21, C25s)

कंपनीने अलीकडेच आपल्या स्मार्टफोनच्या किंमतीत वाढ केली होती आणि आता पुन्हा एकदा किंमती वाढवल्या आहेत. यासह, Realme C25s, Realme C21, Realme C11, Realme 8 आणि Realme 8 5G स्मार्टफोनची किंमत बदलली आहे. चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोनच्या नवीन किंमती…

Realme C11 सिरीजच्या वाढलेल्या किंमती

 • Realme C11 च्या 2GB RAM आणि 32GB स्टोरेजवाल्या फोनची किंमत आता 7,299 रुपये झाली आहे. या फोनची आधीची किंमत 6,999 रुपये इतकी होती.
 • 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज असलेल्या Realme C11 फोनची किंमत आता 8,499 रुपयांवरून 8,799 रुपये झाली आहे.

Realme C21 सिरीजच्या वाढलेल्या किंमती

 • 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज असलेल्या Realme C21 फोनची किंमत आता 8,499 रुपयांवरून 8,999 रुपये झाली आहे.
 • 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज असलेल्या Realme C21 फोनची किंमत आता 9,999 रुपये झाली आहे, जी आधी 9,499 रुपये होती.

Realme 8 सिरीजच्या वाढलेल्या किंमती

 • 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या Realme 8 या फोनची किंमत आता 15,999 रुपये झाली आहे, जी आधी 14,499 रुपये होती.
 • 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या Realme 8 च्या फोनची किंमत आता 16,999 रुपये झाली आहे, जी आधी 15,499 रुपये होती.
 • 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या Realme 8 या फोनची किंमत आता 17,999 रुपये झाली आहे, जी आधी 16,499 रुपये होती.

Realme C25s सिरीजच्या वाढलेल्या किंमती

 • 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज असलेल्या Realme C25s फोनची किंमत आता 10,499 रुपयांवरून 10,999 रुपये झाली आहे.
 • 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या Realme C25s फोनची किंमत आता 11,999 रुपये झाली आहे, जी आधी 11,499 रुपये होती.

Realme 8 5G सिरीजच्या वाढलेल्या किंमती

 • 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज असलेल्या Realme 8 5G फोनची किंमत आता 13,999 रुपयांवरून 15,499 रुपये झाली आहे.
 • 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या Realme 8 5G फोनची किंमत आता 14,999 रुपयांवरून आता 16,499 रुपये झाली आहे.
 • 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या Realme 8 5G फोनची किंमत आता 18,499 रुपये झाली आहे, जी आधी 16,999 रुपये होती.

इतर बातम्या

6GB/128GB, 108MP ट्रिपल कॅमेरा, मोटोरोलाचा Edge 20 Fusion बाजारात

17 सप्टेंबरपासून Iphone 13 ची विक्री, 30 सप्टेंबरला नव्या एअरपॉड्सचं लाँचिंग, लीक्समधून खुलासा

30 फिटनेस मोड, SpO2 मॉनिटरिंग फीचरसह Mi Band 6 भारतात लाँच, किंमत…

(Realme India increased price of its 5 smartphones, including Realme 8 5G, C11, C21, C25s)

Non Stop LIVE Update

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI