AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

7000mAh बॅटरीसह Realme P4 Lite 5G स्मार्टफोन भारतात झाला लाँच, जाणून घ्या या फोनची किंमत आणि फिचर्स

रियलमीचा हा नवीन फोन बजेट सेगमेंटमधील ग्राहकांसाठी लाँच करण्यात आला आहे. या फोनमध्ये केवळ मोठी 7000mAh बॅटरीच नाही, तर एआय फीचर्स, अँड्रॉइड 16 ओएस आणि मीडियाटेक प्रोसेसरसुद्धा आहे. चला तर मग डिव्हाइसची किंमत आणि त्यासोबत मिळणाऱ्या ऑफर्स बद्दल जाणून घेऊयात.

7000mAh बॅटरीसह Realme P4 Lite 5G स्मार्टफोन भारतात झाला लाँच, जाणून घ्या या फोनची किंमत आणि फिचर्स
Realme P4 Lite 5G
| Edited By: | Updated on: Mar 20, 2026 | 2:12 PM
Share

बजेट सेगमेंटमधील ग्राहकांसाठी रियलमी पी4 लाइट 5जी स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. या फोनच्या प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये पॉवरफूल 7000mAh बॅटरी, 900 निट्सची कमाल ब्राइटनेस, मीडियाटेक प्रोसेसर, अँड्रॉइड 16 आणि एआय फीचर्स यांचा समावेश आहे. या फोनला धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी आयपी64 (IP64) रेटिंग देण्यात आले आहे. चला या स्मार्टफोनची किंमत आणि यात मिळणाऱ्या फीचर्स त्यासोबतच विक्रीबद्दलही जाणून घेऊयात. किंमतीनुसार हा हँडसेट तीन व्हेरिएंटमध्ये येतो. यातील 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 12,999 रुपये आहे. 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 13,999 रुपये आहे. 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या टॉप व्हेरिएंटची किंमत 15,999 रुपये आहे.

स्पर्धेच्या बाबतीत बोलायचे झाले तर या किंमत श्रेणीमध्ये हा फोन मोटोरोला G57 पॉवर 5G, पोको M7 प्लस 5G आणि ओप्पो K14X 5G सारख्या मॉडेल्सशी स्पर्धा करतो.

हा फोन कंपनीच्या वेबसाइट, फ्लिपकार्ट आणि रिटेल स्टोअर्सवरून खरेदीसाठी उपलब्ध असेल. लाँच ऑफरमध्ये 1 हजार रुपयांची सरळ सूट आणि 500 रुपयांची बँक ऑफर समाविष्ट आहे. विद्यमान रियलमी ग्राहकांना अतिरिक्त 500 रुपयांचा एक्सचेंज बोनस देखील मिळेल.

Realme P4 Lite 5G फिचर्स

कॅमेरा सेटअप: या फोनमध्ये मागील बाजूस 13-मेगापिक्सलचा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आणि पुढील बाजूस 5-मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर आहे.

ऑपरेटिंग सिस्टम: हा फोन अँड्रॉइड 16 वर आधारित असलेल्या रियलमी UI 7.0 वर चालतो. या हँडसेटला 2 ओएस आणि तीन वर्षांचे सुरक्षा अपडेट्स मिळतील.

रॅम: या फोनमध्ये 6GB रॅम असली तरी कंपनी 8GB व्हर्च्युअल रॅमला देखील सपोर्ट करते. ही व्हर्च्युअल रॅम 14GB पर्यंत वाढवता येते.

स्टोरेज: तुम्हाला फोनमधील फोटो, व्हिडिओ, ॲप्स इन्स्टॉल करणे आणि इतर कामांसाठी 128 जीबी इंटर्नल स्टोरेजचा लाभ मिळेल.

एआय फीचर्स: या रियलमी ब्रँडच्या फोनमध्ये एआय इरेझर 2.0 एआय क्लियर फेस, एआय असिस्टन्स, एआय पावर्ड डॉक्युमेंट्स यांसारखी फीचर्स आहेत.

डिस्प्ले: या नवीन फोनमध्ये 144Hz रिफ्रेश रेट, 180Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 900 nits पीक ब्राइटनेस सपोर्टसह 6.8-इंचाचा HD+ रिझोल्यूशन डिस्प्ले आहे.

कनेक्टिव्हिटी: या रियलमी मोबाईलमध्ये वाय-फाय 5, 5G, 3.5mm हेडफोन जॅक, ब्लूटूथ व्हर्जन 5.3 आणि USB टाइप C पोर्ट आहे. बॅटरी: फोनला पॉवर देण्यासाठी 7000 mAh ची पॉवरफूल बॅटरी देण्यात आली आहे, जी 15 W वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते.

Follow Us
भोंदूबाबा प्रकरणात रुपाली चाकणकर गोत्यात; तटकरे यांची प्रतिक्रिया काय?
भोंदूबाबा प्रकरणात रुपाली चाकणकर गोत्यात; तटकरे यांची प्रतिक्रिया काय?.
तर मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटलांचीही चौकशी करा, अंधारे कडाडल्या
तर मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटलांचीही चौकशी करा, अंधारे कडाडल्या.
एकनाथ शिंदे यांचे सीडीआर तपासण्याची हिंमत गृहखातं दाखवेल का?
एकनाथ शिंदे यांचे सीडीआर तपासण्याची हिंमत गृहखातं दाखवेल का?.
तर माझे यजमानच...चाकणकर यांच्या त्या विधानाचा दाखला देत अंधारे बरसल्या
तर माझे यजमानच...चाकणकर यांच्या त्या विधानाचा दाखला देत अंधारे बरसल्या.
राज्यातील 9 मंत्री लिंगपिसाट बाबाचे अनुयायी, ही तर खरात फाईल
राज्यातील 9 मंत्री लिंगपिसाट बाबाचे अनुयायी, ही तर खरात फाईल.
उद्योग ठप्प, कामगारांचे मुंबईतून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर
उद्योग ठप्प, कामगारांचे मुंबईतून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर.
खरात फाईलमुळे महाराष्ट्रातील सरकार कोसळू शकतं, संजय राऊतांचा मोठा दावा
खरात फाईलमुळे महाराष्ट्रातील सरकार कोसळू शकतं, संजय राऊतांचा मोठा दावा.
युद्धाचा मोठा फटका; LPG टंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या रांगा
युद्धाचा मोठा फटका; LPG टंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या रांगा.
गडचिरोली : अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना दणका, पिकांचे मोठे नुकसान
गडचिरोली : अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना दणका, पिकांचे मोठे नुकसान.
धनंजय मुंडेंचा गंभीर आरोप; मोठे नेते मला संपवण्याच्या प्रयत्नात होते
धनंजय मुंडेंचा गंभीर आरोप; मोठे नेते मला संपवण्याच्या प्रयत्नात होते.