Realme बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज, वॉच 2, वॉच 2 प्रो, बड्स वायरलेस 2 सह अनेक प्रोडक्ट्स लाँच करणार

अनेक महिन्यांच्या लीक्स आणि अफवांनंतर, रियलमीने (Realme) अन्य ऑडिओ उत्पादनांसह Realme वॉचचा सक्सेसर लाँच करणार असल्याची पुष्टी केली आहे.

Realme बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज, वॉच 2, वॉच 2 प्रो, बड्स वायरलेस 2 सह अनेक प्रोडक्ट्स लाँच करणार
Realme
Follow us
| Updated on: Jul 25, 2021 | 5:26 PM

मुंबई : अनेक महिन्यांच्या लीक्स आणि अफवांनंतर, रियलमीने (Realme) अन्य ऑडिओ उत्पादनांसह Realme वॉचचा सक्सेसर लाँच करणार असल्याची पुष्टी केली आहे. कंपनीने रियलमी वॉच 2, रियलमी वॉच 2 प्रो, रियलमी बड्स वायरलेस 2, रियलमी बड्स वायरलेस 2 निओ आणि रियलमी बड्स क्यू 2 निओ लाँच करणार असल्याची घोषणा केली आहे. सर्व उत्पादने 23 जुलैला एका व्हर्च्युअल इव्हेंटमध्ये लाँच केली जातील. Amazon इंडियाच्या वेबसाइटवर हे डिव्हाइस खरेदीसाठी उपलब्ध असतील. (Realme will launch Realme Watch 2, Watch 2 Pro, Buds Wireless 2 and many more products)

रियलमीने रियलमी वॉच 2 प्रो आणि रियलमी बड्स वायरलेस 2 जागतिक बाजारपेठेत लाँच केले आहेत. रियलमी वॉच 2 प्रो मे महिन्यात मलेशियामध्ये सादर करण्यात आले होते. श्रीलंकेत रियलमी बड्स वायरलेस 2 निओ लाँच करण्यात आले आहे. मलेशियामध्ये, रियलमी वॉच 2 प्रो MYR 299 (अंदाजे 5,300 रुपये) इतक्या किंमतीत लाँच केलं आहे. तर रियलमी बड्स वायरलेस 2 निओ श्रीलंकेत LKR 8,279 (अंदाजे 3,000 रुपये) मध्ये उपलब्ध आहे.

रियलमी वॉच 2 प्रोचे स्पेक्स

Amazon ने आपल्या लॉन्चपूर्वी रियलमी वॉच 2 प्रो ची काही प्रमुख वैशिष्ट्ये सूचीबद्ध केली आहेत. वॉच 2 प्रो मध्ये 1.75 इंचाचा आयताकृती फुल टच डिस्प्ले आहे. जो सेन्सरसह येतो, ज्यात हार्ट रेट सेन्सर, स्लीप ट्रॅकर, ब्लड ऑक्सिजन सेन्सर, स्लीप ट्रॅकर आणि बरेच काही समाविष्ट आहे. बॅटरीच्या बाबतीत असे मानले जाते की एकाच चार्जवर बॅटरी 14 दिवस टिकते.

या घड्याळामध्ये 90 स्पोर्ट्स मोड आहेत जे रनिंग, स्विमिंग, फुटबॉल, बास्केटबॉल, योगा, क्रिकेट, स्ट्रेंथ ट्रेनिंग, आउटडोर वॉक, आउटडोर योगासह तुमच्या प्रत्येक हालचालींवर वॉच ठेवतात. डस्ट आणि वॉटर रेजिस्टन्सच्या बाबतीत या स्मार्टवॉचला IP68 रेटिंग मिळालं आहे.

रियलमी बड्स वायरलेस 2 चे स्पेक्स

Realme Buds Wireless 2 एक नेकबँड आहे ज्यामध्ये कॉल क्वालिटी वाढण्यास, अॅक्टिव्ह नॉइस कॅन्सलेशन आणि डुअल मायक्रोफोन आहे. हा 13.6mm बेस बुस्ट ड्राइव्हर्ससह सुसज्ज आहे आणि यात Google फास्ट पेअर आहे. हा बँड ट्रान्सपरन्सीसह येतो. जो युजर्सना एअरबड्स न काढता सभोवतालचा आवाज ऐकण्यास अनुमती देतो. बॅटरीच्या बाबतीत, नेकबँडमध्ये 135mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी सिंगल चार्जवर 18 तासांपर्यंतचा टाईम देते.

इतर बातम्या

अ‍ॅमेझॉन देत आहे 10 हजार रुपयांपर्यंत गिफ्ट व्हाऊचर; बस्स.. तुम्हाला फक्त ‘ही’ किरकोळ प्रक्रिया करावी लागेल

मजेदार इन्स्टाग्राम रील्स आणि यूट्यूब व्हिडिओ बनवायचे आहेत; मग तात्काळ फोनमध्ये इन्स्टॉल करा हे 10 व्हिडिओ एडिटिंग अॅप्स

दरमहा फक्त 99 रुपये द्या आणि 4999 रुपयांचा हा ब्ल्यूटूथ स्पीकरला घरी आणा; जाणून घ्या टेलिकॉम कंपनीचा प्लान

(Realme will launch Realme Watch 2, Watch 2 Pro, Buds Wireless 2 and many more products)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.