फक्त एका क्लिकवर परत मिळवा WhatsApp वरील डिलीट झालेले मेसेज, जाणून घ्या ‘ही’ ट्रिक
व्हॉट्सॲपची ऑटोमॅटिक बॅकअप सिस्टीम तुमच्या चॅट्स गुगल ड्राइव्ह आणि आयक्लॉडमध्ये सेव्ह करते. जर तुमच्याकडून चुकून चॅट डिलीट झाले असतील तर आता तुम्ही फक्त या एका क्लिकच्या मदतीने चॅट्स पुन्हा इंस्टॉल करून शकता. चला तर मग आजच्या लेखात आपण या खास ट्रिक्सबद्दल जाणून घेऊयात...

आपल्यापैकी अनेकांनकडून WhatsApp वरील जुने चॅट्स क्लिअर करताना चुकून महत्त्वाचे चॅट डिलीट होतात तेव्हा आपल्याला खूप टेंन्शन येतं. कारण काही महत्त्वाच्या गोष्टी डिलीट झाल्यावर पुन्हा मिळवता येत नाही आणि आपली कामं अडकून राहतात. पण तुम्हाला माहित आहे का की WhatsApp च्या क्लाउड बॅकअप या खास फिचर्सचा वापर करून तुम्ही डिलीट चॅट सहजपणे रिकव्हर करू शकता. फक्त एक सोपी ट्रिक्स आणि काही सोप्या स्टेप्सच्या मदतीने तुमचे डिलीट झालेले मेसेज, फोटो आणि कागदपत्रे रिकव्हर करण्यास मदत होऊ शकते. चला तर मग आजच्या लेखात आपण डिलीट चॅट कोणत्या ट्रिक्सच्या मदतीने परत मिळवू शकतो ते जाणून घेऊयात…
व्हॉट्सॲप क्लाउड बॅकअप कसे काम करते?
WhatsApp वेळोवेळी तुमच्या Google Drive आणि iCloud (iPhone वापरकर्ते) वरील चॅट्सचा बॅकअप घेते. हे बॅकअप फक्त तेव्हाच उपयुक्त ठरतात जेव्हा मेसेज डिलीट करण्याच्या आधी त्या मेसेजचा बॅकअप आधीच घेतलेला असतो. म्हणून, बॅकअपची तारीख आणि वेळ तपासणे महत्त्वाचे आहे. बॅकअप डेटामध्ये चॅट्स, फोटो आणि फाइल्सचा समावेश असतो.
अँड्रॉइड वापरकर्ते अशा प्रकारे डिलीट केलेले मेसेज रिकव्हर करू शकतात
तुमच्या Android फोनवर प्रथम WhatsApp उघडा आणि Settings > Chats > Chat backup वर जाऊन बॅकअपची तारीख तपासा. जर चॅट डिलीट करण्यापूर्वीचा बॅकअप असेल, तर WhatsApp अनइंस्टॉल करा आणि पुन्हा इंस्टॉल करा. इंस्टॉल केल्यावर Restore पर्याय येईल त्यावर क्ल्कि करा. इंस्टॉल करताना तुम्ही वापरत असलेले Google खाते आणि फोन नंबर वापरत आहात याची खात्री करा. त्यानंतर व्हॉट्सॲपवरील डिलीट झालेले चॅट पुन्हा मिळेल.
आयफोन वापरकर्त्यांसाठी मेसेज रिकव्हर करण्याची सोपी स्टेप
आयफोनवरही ही प्रक्रिया जवळजवळ सारखीच असते. प्रथम, WhatsApp वर जा आणि तुमच्या iCloud बॅकअपची तारीख तपासा. नंतर, ॲप अनइंस्टॉल करा आणि ॲप स्टोअरमधून ते पुन्हा इंस्टॉल करा. तुमचा नंबर पडताळल्यानंतर, ‘Restore Chat History’ हा पर्याय दिसेल तेव्हा तो निवडा. हे तुमच्या जुन्या चॅट्स तुमच्या फोनवर रीलोड करेल.
कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे
लक्षात ठेवा की बॅकअप रिस्टोअर केल्याने बॅकअपनंतर तयार केलेले मेसेज गमावले जाऊ शकतात. WhatsApp फक्त एक क्लाउड बॅकअप साठवते, त्यामुळे जुना बॅकअप ओव्हरराईट होऊ शकतो. शिवाय, चॅट रिकव्हर करण्यासाठी बॅकअपच्या वेळी वापरलेला फोन नंबर आणि अकाउंट सेम असला आवश्यक आहे.
जर तुम्ही रिस्टोअर प्रॉम्प्ट चुकवला तर काय करावे?
पुन्हा इंस्टॉल केल्यानंतर दिसणारा ‘रिस्टोर’ प्रॉम्प्ट फक्त एकदाच दिसतो. तो वगळण्यासाठी व्हॉट्सॲप अनइंस्टॉल करून पुन्हा इंस्टॉल करावे लागेल. म्हणून, रिकव्हरी प्रक्रियेदरम्यान योग्य वेळी योग्य पर्याय निवडण्याची काळजी घ्या.
