दमदार कॅमेरा सेटअपसह Redmi चा ‘हा’ स्मार्टफोन ठरतोय खास…

Redmi Note 11SE आज भारतात दाखल होणार आहे. या मोबाईलमध्ये मजबूत बॅटरी आणि दमदार कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या स्मार्टफोनसोबत चार्जर आणि केबल दिली जाणार नसल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

दमदार कॅमेरा सेटअपसह Redmi चा ‘हा’ स्मार्टफोन ठरतोय खास…
Follow us
| Updated on: Aug 26, 2022 | 2:27 PM

रेडमी (Redmi) आपला नवीन स्मार्टफोन भारतीय मोबाइल बाजारात दाखल करणार आहे. या नवीन स्मार्टफोनचे नाव रेडमी नोट 11 एसई (Redmi Note 11SE) ठेवण्यात आले आहे. या फोनमध्ये अनेक चांगले फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. या अपकमिंग मोबाईलबद्दल आतापर्यंत बरीच माहिती समोर आली आहे. लिक झालेल्या माहितीनुसार या स्मार्टफोनमध्ये दमदार कॅमेरा सेटअप दिला जाण्याची शक्यता आहे. तसेच अनेक अत्याधुनिक फीचर्सही (features) देण्यात आली आहेत. दरम्यान, अजून एका माहितीनुसार कंपनी या मोबाईलसोबत चार्जर अॅडॉप्टर आणि केबल देणार नसल्याची माहिती आहे.

Redmi Note 11SE हा Redmi Note 11 सीरिजचाच एक भाग आहे. यापूर्वी कंपनीने Redmi Note 11, Redmi Note 11S, Redmi Note 11T 5G, Redmi Note 11 Pro आणि Redmi Note 11 Pro + 5G हे स्मार्टफोन ग्राहकांसाठी आणले आहेत. आता हा स्मार्टफोन आज बाजारात दाखल होण्याची प्रतीक्षा आहे. या फोनचे काही स्पेसिफिकेशन कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर उघड झाले आहेत. लिस्टेड माहितीनुसार, हा स्मार्टफोन 31 ऑगस्टपासून विक्रीसाठी उपलब्ध असेल.

Redmi Note 11SE चार्जर

Redmi Note 11 SE च्या चार्जरबद्दल बोलायचे झाले तर अनेक रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे, की यावेळी कंपनी चार्जरशिवाय स्मार्टफोन लॉन्च करेल. हा पहिला बजेट किंवा मिड-रेंज स्मार्टफोन असेल, ज्यामध्ये कंपनी चार्जिंग अॅडॉप्टर देणार नाही.

Redmi Note 11SE चे स्पेसिफिकेशन्स

Redmi Note 11SE च्या स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाले तर यात 6.43 इंचाचा फुल एचडी प्लस AMOLED डिस्प्ले मिळेल. यासोबतच यामध्ये 60 Hz चे रिफ्रेश रेट देखील आहे. त्याची जास्तीत जास्त ब्राईटनेस 700 nits आहे. हा फोन 2400×1080 पिक्सेल रिझोल्युशनसह नॉक करेल.

Redmi Note 11SE प्रोसेसर आणि रॅम

MediaTek Helio G95 चिपसेट सह Redmi Note 11SE चा हा मोबाईल फोन येत आहे. तसेच हे ARM Mali G76 MC4 सह येईल. यामध्ये 6 जीबी आणि 8 जीबी रॅमचा पर्याय उपलब्ध असेल.

Redmi Note 11SE कॅमेरा सेटअप

Redmi Note 11SE च्या बॅक पॅनलवर क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये प्रायमरी कॅमेरा 64 मेगापिक्सल्सचा आहे. 8 मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड अँगल लेंस आहेत. तिसरा कॅमेरा 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आहे आणि चौथा कॅमेरा 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आहे. या मोबाईलमध्ये 13 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

Redmi Note 11SE बॅटरी

Redmi Note 11SE मध्ये 33 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी 5000 mAh बॅटरी आहे. यासोबतच यामध्ये बायोमेट्रिक पद्धतीने मोबाईल अनलॉक करणारा एक साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. तसेच 3.5 एमएम ऑडिओ जॅकचाही समावेश आहे.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.