AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Redmi Writing Pad: स्टायलस पेन सपोर्टसह येतो हा रायटिंग पॅड, किंमत फक्त 599 रुपये

वह्या पुस्तकांना देखील आता डिजिटल स्वरूप येऊ लागले आहे. रेडमी या कंपनीने डिजिटल रायटिंग पॅड बाजारात आणले आहे.

Redmi Writing Pad: स्टायलस पेन सपोर्टसह येतो हा रायटिंग पॅड, किंमत फक्त 599 रुपये
रेडमी रायटिंग पॅड Image Credit source: Social Media
| Updated on: Oct 11, 2022 | 8:36 AM
Share

मुंबई,  रेडमी रायटिंग पॅड (Redmi Writing Pad) भारतीय बाजारपेठेत ग्राहकांसाठी लॉन्च करण्यात आला आहे, नावाप्रमाणेच, हे एक उपकरण आहे जे पोर्टेबल डिजिटल नोटपॅड (Portable Digital Notepad) म्हणून काम करेल.  या उपकरणाच्या मदतीने चित्र काढणे, माहिती लिहिणे आणि स्क्रिबलिंग इत्यादी बरेच काही करता येणे शक्य आहे.  याचा अर्थ आता तुम्हाला नोट्स लिहिण्यासाठी कागद किंवा पेन शोधण्याची गरज नाही. इतकेच नाही तर इतके फीचर्स असूनही त्याची किंमत फक्त 599 रुपये इतकी आहे. त्यामुळे सामान्य व्यक्ती देखील याला खरेदी करू शकतो.  या रेडमी रायटिंग पॅडच्या अधिक जाणून घेऊया.

काय आहे वैशिष्ट्य

रेडमी रायटिंग पॅडच्या  स्पेसिफिकेशनबद्दल सांगायचे झाल्यास, यात 8.5-इंचाचा एलसीडी डिस्प्ले आहे, कंपनीच्या मते स्क्रीनमधून प्रकाश बाहेर पडत नाही, ज्यामुळे दीर्घकाळ वापर केल्यानंतरही डोळ्यांना कोणतेही नुकसान होत नाही.

हे एक पोर्टेबल डिजिटल नोटपॅड आहे जे अगदी कॉम्पॅक्ट आहे आणि टाचे वजन फक्त 90 ग्रॅम आहे ज्यामुळे लहान मुलांना देखील सहजपणे वापरता येणे शक्य आहे. स्क्रीनच्या अगदी खाली एक बटण देण्यात आले आहे. ज्याद्वारे लिहिलेली माहिती मिटविता येते.

या व्यतिरिक्त, या डिव्हाइसमध्ये लॉक स्विच वैशिष्ट्य देखील आहे जे सामग्री गोठवते ज्यामुळे तुमची सामग्री स्क्रीनवरून हटविली जाऊ शकत नाही. उत्तम पकडीसाठी या उपकरणासोबत एक स्टायलस देखील देण्यात आला आहे.

हे रायटिंग पॅड मोबाइलप्रमाणे चार्जेबल नसून यात अल्ट्रा-लाँग बदलण्यायोग्य बॅटरी देण्यात आली आहे.  या Redmi रायटिंग पॅडची LCD स्‍क्रीन खूप कमी बॅटरी वापरते. Xiaomi चा दावा आहे की वापरकर्ता एका चार्जवर 20,000 पेज पर्यंत लिहू शकतो.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.