Amazon-Flipkart sale : 601 रुपयांच्या EMI वर खरेदी करा नवीन Refrigerator, मोठी सूट उपलब्ध
उन्हाळा सुरू झाला असून तुम्ही सुद्धा नवीन रेफ्रिजरेटर खरेदी करायचा विचार करत असाल तर ही एक चांगली संधी आहे. Amazon-Flipkart सेलमध्ये नवीन रेफ्रिजरेटर स्वस्तात खरेदी करण्याची संधी मिळत आहेत. जर तुम्ही काही महिन्यांनी हे रेफ्रिजरेटर खरेदी केले तर ते तुमच्यासाठी महाग असू शकतात. अशा परिस्थितीत सध्या उपलब्ध असलेल्या डीलचा त्वरित फायदा घ्या.

कडक उन्हाळा सुरू झाला असून प्रत्येक घरात थंड पाणी पिण्यासाठी सुरूवात झाली आहे. बरेच लोकं त्यांच्या घरासाठी नवीन रेफ्रिजरेटर घेण्याचा विचार करत असतात. पण असे काही रेफ्रिजरेटर आहेत ज्यांच्या किंमती एवढ्या महाग असतात की त्यामुळे रेफ्रिजरेटर खरेदी करता येत नाही. परंतु वाढता उन्हाचा तडाखा बघता तुम्हालाही रेफ्रिजरेटर खरेदी करायचा असेल पण तुमचा बजेट कमी असेल तर काळजी करू नका. तुम्ही तुमच्या घरासाठी एक चांगला रेफ्रिजरेटर खरेदी करू शकता. यासाठी तुम्हाला एकाच वेळी हजारो रुपये खर्च करावे लागणार नाहीत. तुम्ही 601 रुपयांच्या मासिक EMI वर एक दमदार रेफ्रिजरेटर खरेदी करू शकता.
Godrej 180 L
तुम्हाला गोदरेजचा हा फ्रिज फक्त 12,390 रुपयांमध्ये डिस्काउंटसह मिळत आहे. पण जर तुमच्याकडे ही किंमत देण्याचे बजेट नसेल तर काळजी करू नका. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर तुम्हाला नो कॉस्ट ईएमआयचा पर्याय देखील मिळत आहे. हा 2 स्टार फ्रिज आहे. या फ्रिजवर तुम्हाला बँक ऑफर्सचाही फायदा मिळत आहे. ज्यामध्ये तुम्हाला 1,239 रुपयांची सूट मिळू शकते.
Whirlpool रेफ्रिजरेटर्स परवडणाऱ्या किमतीत
व्हर्लपूलचा हा रेफ्रिजरेटर तुम्हाला Amazon आणि Flipkart दोन्हीवर सवलतीत मिळू शकतो. तुम्हाला Amazon वर व्हर्लपूलचा हा रेफ्रिजरेटर 2 टक्के सवलतीसह फक्त 12,790 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. जर तुम्ही ते EMI वर खरेदी केले तर तुम्हाला 620रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागेल.
Haier रेफ्रिजरेटर्स
तुम्हाला हायरचा हा फ्रिज देखील सवलतीत खरेदी करता येणार आहे. तुम्ही ते 10, 990 रुपयांच्या सवलतीसह खरेदी करू शकता. त्याची सुरुवातीची नो कॉस्ट ईएमआय 533 रुपये असेल. हे सिंगल डोअर रेफ्रिजरेटर आहे. याशिवाय, तुम्हाला क्षमता असलेले बरेच पर्याय मिळत आहेत.
तुम्हाला हवे असल्यास, Amazon व्यतिरिक्त, तुम्ही Flipkart, Vijay Sales आणि Croma वर या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर डिस्काउंट आणि बँक ऑफर्स देखील मिळवू शकता. तुम्हाला या उत्पादनांवर एक्सचेंज ऑफरचा लाभ मिळत नाही. त्यामुळे तुम्ही फक्त EMIची मदत घेऊ शकता.