64MP कॅमेरा, 6000mAh बॅटरीसह Samsung Galaxy M32 भारतात लाँच, किंमत…

सॅमसंगने (Samsung) भारतात नवीन गॅलेक्सी एम 32 (Samsung Galaxy M32) मिड-रेंज डिव्हाइस लॉन्च केलं आहे.

64MP कॅमेरा, 6000mAh बॅटरीसह Samsung Galaxy M32 भारतात लाँच, किंमत...
Samsung Galaxy M32

मुंबई : सॅमसंगने (Samsung) भारतात नवीन गॅलेक्सी एम 32 (Samsung Galaxy M32) मिड-रेंज डिव्हाइस लॉन्च केलं आहे. नवीन डिव्हाइस रियलमी 8, पोको एम 3 प्रो आणि रेडमी नोट 10 या स्मार्टफोन्सना तगडी स्पर्धा देईल. M सीरीज मध्ये क्वाड लेन्स, एमोलेड स्क्रीन आणि वॉटरड्रॉप नॉचसह सादर करण्यात आली आहे. सॅमसंग गॅलेक्सी एम 32 ची किंमत 16,999 रुपये इतकी आहे, ज्यामध्ये आपल्याला 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज स्पेस मिळेल. त्याच वेळी, 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजसह सादर करण्यात आलेल्या दुसर्‍या व्हेरिएंटची किंमत 14,999 रुपये इतकी आहे. (Samsung Galaxy M32 Officially launched in India with 90Hz AMOLED display and 6,000 mAh battery)

गॅलेक्सी एम 32 ब्लॅक आणि लाइट ब्लू अशा दोन रंगांमध्ये उपलब्ध करुन देण्यात आला आहे. सॅमसंग 28 जूनपासून या डिव्हाइसची विक्री येथे सुरू करणार आहे. आपण अधिकृत सॅमसंग स्टोअर, Amazon ई-कॉमर्स साईट आणि इतर विक्रेत्यांकडून हा फोन खरेदी करू शकता. अ‍ॅमेझॉन डॉट इनने आयसीआयसीआय क्रेडिट आणि डेबिट कार्ड वापरकर्त्यांसाठी ऑफर जाहीर केली आहे. या बँक कार्डद्वारे फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 1250 रुपयांची सूट मिळेल.

फीचर्स

सॅमसंग गॅलेक्सी एम 32 एमोलेड डिस्प्लेसह फुल एचडी + रेझोल्यूशन आणि 90Hz रिफ्रेश रेटसह येतो. डिस्प्लेचा पीक ब्राइटनेस 800 निट्स इतका आहे. सॅमसंगने या फोनमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 दिला आहे. फोनमध्ये ऑक्टा कोर मीडियाटेक हेलीओ G80 प्रोसेसर देण्यात आला आहे. डिव्हाइसमध्ये 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज स्पेस देण्यात आली आहे.

64MP क्वाड कॅमेरा सेटअप

या फोनच्या कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाल्यास फोनमध्ये क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनची प्रायमरी लेन्स 64 मेगापिक्सल युनिटसह सादर करण्यात आली आहे.या फोनमध्ये सेल्फीसाठी 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे, तसेच यात वॉटरड्रॉप नॉचदेखील आहे. फोनमध्ये 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड लेन्स आहे. यासह, आपल्याला 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर देण्यात आला आहे.

6000mAh क्षमतेची बॅटरी

या फोनमध्ये 6000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. फोनमध्ये 15W चार्जर देण्यात आला आहे, परंतु डिव्हाइस 25W फास्ट चार्जिंगला देखील सपोर्ट करेल. डिव्हाइस अँड्रॉयड 11 आणि UI 3.1 आउट ऑफ दी बॉक्स वर चालतो. तसेच हा फोन डॉल्बी अ‍ॅटमॉसला सपोर्ट करतो.

इतर बातम्या

‘या’ कंपनीच्या स्मार्ट टीव्ही, रेफ्रिजरेटरसह अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर डिस्काऊंट, सोबत 20% कॅशबॅक ऑफर

LG कडून जगातील पहिला 83 इंचांचा OLED TV लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

(Samsung Galaxy M32 Officially launched in India with 90Hz AMOLED display and 6,000 mAh battery)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI