AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Samsung galaxy s25 सीरिज लवकरच लॉन्च होणार, प्री-बुकिंग सुरू, फीचर्स जाणून घ्या

तुम्ही स्मार्टफोन घेण्याचा प्लॅन करत असाल तर ही बातमी नक्की वाचा. कारण, वनप्लस 13 आणि आयफोन 16 नंतर आता Samsung galaxy s25 सीरिज लवकरच लॉन्च होणार आहे. सॅमसंगची ही बहुप्रतिक्षित सीरिज आहे. कंपनीने या सीरिजसाठी प्री-बुकिंग सुरू केले आहे. तुम्ही प्री-बुकिंग किती रुपयांत करू शकता आणि त्यात तुम्हाला कोणते खास फीचर्स मिळतील ?

Samsung galaxy s25 सीरिज लवकरच लॉन्च होणार, प्री-बुकिंग सुरू, फीचर्स जाणून घ्या
Samsung Galaxy S25
| Edited By: | Updated on: Jan 08, 2025 | 9:51 AM
Share

तुमच्यासाठी आमच्याकडे आज एक खास बातमी आहे. तुम्ही स्मार्टफोन घेण्याचा प्लॅन करत असाल तर ही बातमी नक्की वाचा. Samsung galaxy s25 सीरिज लवकरच लॉन्च होणार आहे. या सीरिजसाठी कंपनीने प्री-बुकिंग सुरू केले आहे. Samsung galaxy s25 सीरिजमध्ये नेमके कोणते फीचर्स आहेत? किंमत काय आहे? या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती आम्ही पुढे देत आहोत. जाणून घेऊया.

तुम्ही Samsung galaxy s25 सीरिजचे प्री-बुकिंग करू शकता. नवीन गॅलेक्सी S सीरिजमध्ये अनेक दमदार फीचर्स पाहायला मिळू शकतात. नव्या सीरिजमध्ये AI चे अ‍ॅडव्हान्स व्हर्जन येऊ शकते. फ्लॅगशिप गॅलेक्सी एस सीरिज 1999 रुपयांची टोकन रक्कम देऊन तुम्ही आगाऊ बुक करू शकता. तुम्ही हा फोन खरेदी कराल तेव्हा ही रक्कम तुमच्या बिलात जोडली जाईल. फोनमध्ये तुम्हाला कोणते फीचर्स मिळू शकतात जाणून घेऊया.

Samsung galaxy s25 कधी लॉन्च करणार?

Samsung galaxy s25 हा फोन 22 जानेवारी 2025 रोजी कॅलिफोर्नियातील सॅन होजे येथे सॅमसंगच्या गॅलेक्सी अनपॅक्ड इव्हेंटमध्ये लॉन्च करण्यात येणार आहे.

प्री-बुकिंग कसे करायचे?

Samsung galaxy s25 सीरिजची प्री-बुकिंग तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून Samsung.com करू शकता. याशिवाय तुम्हाला हवं असेल तर सॅमसंग एक्सक्लुझिव्ह स्टोअरवरूनही तुम्ही या फोनसाठी बुकिंग करू शकता.

सॅमसंगची आगामी सीरिज गॅलेक्सी एस प्री-रिझर्व्ह केल्यास तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात. सर्वात आधी तुम्हाला गॅलेक्सी एस सीरिजचा लवकर अ‍ॅक्सेस मिळेल. याशिवाय कंपनी 5000 रुपयांपर्यंत व्हाउचर देखील देत आहे. पण निवडक व्यवहारांवर ही ऑफर मिळू शकते.

Samsung galaxy s25 अल्ट्रा

आगामी स्मार्टफोनमध्ये तुम्हाला टायटॅनियम फ्रेम मिळू शकते. फोनमध्ये 6.9 इंचाचा डिस्प्ले असू शकतो. Samsung galaxy s24 नंतर आता आगामी s25 सीरिजकडून कॅमेऱ्याच्या अपेक्षा वाढल्या आहेत. मागील सीरिजच्या तुलनेत या फोनमध्ये आणखी चांगला कॅमेरा सेटअप मिळू शकतो.

प्रायमरी कॅमेरा 200 मेगापिक्सलचा असू शकतो. सेकंडरी कॅमेरा 100 मेगापिक्सल, 50 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा मिळू शकतो. याशिवाय 50 मेगापिक्सलचा टेलिफोटो लेन्सही मिळू शकतो. फोनमध्ये 5000 एमएएचची बॅटरी मिळू शकते. जे 45W फास्ट चार्जिंग सपोर्टसोबत येऊ शकते.

Samsung galaxy s25 सीरिजची किंमत किती?

कंपनीने सध्या कोणतेही फीचर, किंमत किंवा डिझाइनचा खुलासा केलेला नाही. नवीन सीरिजचे काही फीचर्स येथे नमूद केली आहेत. ते सर्व संभाव्य फीचर्स आहेत. Samsung galaxy s25 सीरिजच्या किंमतीचा अंदाज घेतला तर Samsung galaxy s25 सीरिजमध्ये तीन मॉडेल्स लाँच केले जाऊ शकतात. हा फोन भारतात 1,29,999 रुपयांमध्ये लॉन्च केला जाण्याची शक्यता आहे.

कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.