सँमसंगचा नवीन फोन लाँच, पाहा किंमत आणि फीचर्स

मुंबई : सॅमसंगने नवीन स्मार्टफोन सॅमसंग गॅलेक्सी A9 Pro लाँच केला आहे. सॅमसंगने नुकतेच हा नवीन स्मार्टफोन दक्षिण कोरियाच्या बाजारात उतरवला आहे. भारतीय बाजारपेठेत कधीपर्यंत आणले जाईल याबद्दलची अधिकृत माहिती कंपनीने अजून दिली नाही. सॅमसंगचा हा नवीन स्मार्टफोन गॅलेक्सी A8S सारखा दिसत आहे. सॅमसंगने आपल्या इनफिनिटी डिस्प्लेसोबत हा फोन लाँच केला आहे. दक्षिण कोरियाच्या बाजारात […]

सँमसंगचा नवीन फोन लाँच, पाहा किंमत आणि फीचर्स
सचिन पाटील

| Edited By:

Jul 05, 2019 | 4:34 PM

मुंबई : सॅमसंगने नवीन स्मार्टफोन सॅमसंग गॅलेक्सी A9 Pro लाँच केला आहे. सॅमसंगने नुकतेच हा नवीन स्मार्टफोन दक्षिण कोरियाच्या बाजारात उतरवला आहे. भारतीय बाजारपेठेत कधीपर्यंत आणले जाईल याबद्दलची अधिकृत माहिती कंपनीने अजून दिली नाही. सॅमसंगचा हा नवीन स्मार्टफोन गॅलेक्सी A8S सारखा दिसत आहे. सॅमसंगने आपल्या इनफिनिटी डिस्प्लेसोबत हा फोन लाँच केला आहे. दक्षिण कोरियाच्या बाजारात उतरवण्याआधी कंपनीने हा फोन चीनमध्ये काही महिन्यांपूर्वी लाँच केला आहे.

तीन कॅमेऱ्यांच्या फोन

फोटोची आवड असणाऱ्यांसाठी सॅमसंगने या फोनला तीन कॅमेरे दिले आहेत आणि सेल्फीसाठी यामध्ये 24 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. यामध्ये 24, 10, 5 मेगापिक्सल असे तीन कॅमेरे रिअरला दिले आहेत. विशेष म्हणजे सॅमसंगने नवीन फोन 2019 मधील ट्रेंड Punch Hole असलेल्या डिस्प्लेसोबत लाँच केला आहे.  Punch Hole म्हणजेच फोनच्या फ्रंट साईडवर एक होल असले आणि त्यामध्ये सेल्फी कॅमेरा असणार आहे. हा फोन सॅमसंगने अशा युजर्ससाठी लाँच केला आहे, जे लोक जास्त प्रमाणात मोबाईलवर व्हिडीओ पाहतात आणि गेम खेळतात.

फोनच्या डिझाईनचे पाहिले, तर हा फोन तीन रंगात उपलब्ध आहे. ब्ल्यू, ग्रीन आणि ग्रे रंगामध्ये ग्राहकांना मिळेल. सॅमसंगने आपला हा स्मार्टफोन दक्षिण कोरियामध्ये 599,500 कोरियाई वॉनमध्ये लाँच केला आहे. जर तुम्ही भारतीय रुपयांत पाहिले तर याची किंमत 37,800 रुपये आहे. कंपनीने याला भारतात कधी लाँच करणार याबाबतची अधिकृत माहिती अजून दिलेली नाही.

Samsung galaxy A9 Pro चे फीचर्स

  • 6.4 इंचाची डिस्प्ले
  • 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इनबिल्ट मेमरी
  • 3,400 बॅटरी
  • रिअरला फिंगरप्रिंट स्कॅनरची सुविधा
  • यूएसबी टायप सी-पोर्टल, स्पीकर ग्रिल आणि मायक्रोफोन

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें