AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सॅमसंगचा 5000mAh बॅटरी असलेला हा स्टायलिश स्मार्टफोन झाला लाँच, 6 वर्षांसाठी मिळतील अपडेट

तुम्ही 20 हजार रुपयांच्या बजेटमध्ये स्मार्टफोन शोधत असाल, तर सॅमसंग ने या रेंजमध्ये नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. चला जाणून घेऊया या फोनची किंमत काय आहे आणि तुम्हाला हा फोन कोणत्या खास फिचर्ससह मिळेल?

सॅमसंगचा 5000mAh बॅटरी असलेला हा स्टायलिश स्मार्टफोन झाला लाँच, 6 वर्षांसाठी मिळतील अपडेट
samsung-galaxy-f17Image Credit source: Tv9 Network
| Edited By: | Updated on: Sep 12, 2025 | 5:58 PM
Share

आजकाल प्रत्येकजण स्टायलिश स्मार्टफोन खरेदी करत असतात. तसेच कमी बजेटमध्ये 5G सपोर्ट असलेला व अधिक काळ नवीन राहणारा फोन आपण शोधत असतो. तर ग्राहकांच्या या गोष्टी लक्षात घेता सॅमसंग कंपनीने 20 हजार रुपयांपेक्षा कमी बजेट असलेल्या एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. तर या फोनच्या फिचर्सबद्दल बोलायचे झाले तर हा फोन Exynos प्रोसेसर, 5000mAh पॉवरफुल बॅटरी, कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस डिस्प्ले प्रोटेक्शन, गॅलेक्सी एआय फीचर्ससह लाँच करण्यात आला आहे.

या फोनला सहा वर्षांसाठी प्रमुख ओएस अपग्रेड आणि सहा वर्षांसाठी सुरक्षा अपडेट्स मिळत राहतील. हा हँडसेट गुगल जेमिनी आणि सर्कल टू सर्च सारख्या एआय फीचर्सने सुसज्ज आहे. हे सॅमसंग वॉलेटसह सॅमसंगच्या टॅप अँड पे फीचरला देखील सपोर्ट करते.

सॅमसंग गॅलेक्सी F17 5G ची भारतात किंमत

भारतीय बाजारात या नवीनतम सॅमसंग स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 14,499 रुपये आहे, या किमतीत तुम्हाला 4 जीबी/128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट मिळेल. या फोनच्या 6 जीबी/128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटसाठी तुम्हाला 15,999 रुपये खर्च करावे लागतील. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाले तर, हा फोन सॅमसंग इंडियाच्या अधिकृत वेबसाइट तसेच फ्लिपकार्ट आणि निवडक रिटेल स्टोअर्समधून खरेदी करता येईल.

सॅमसंग गॅलेक्सी F17 5G स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले: या सॅमसंग स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा फुल एचडी प्लस इन्फिनिटी यू सुपर डिस्प्ले आहे जो 90 हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.

चिपसेट: या बजेट फोनमध्ये 5nm आधारित Exynos 1330 प्रोसेसर, 6 GB पर्यंत RAM आणि 128 GB अंतर्गत स्टोरेज आहे.

ऑपरेटिंग सिस्टम: हा नवीनतम सॅमसंग फोन अँड्रॉइड 15 वर आधारित One UI 7 वर काम करतो.

कॅमेरा सेटअप: ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) सह 50 मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा, 5 मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेल मॅक्रो कॅमेरा सेन्सर. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी समोर 13 मेगापिक्सेल सेन्सर देण्यात आला आहे.

बॅटरी: फोनला पॉवर देण्यासाठी 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 25W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

कनेक्टिव्हिटी: फोनमध्ये 4G VoLTE, 5G, ब्लूटूथ व्हर्जन 5.3, वाय-फाय 5, GPS, NFC, OTG आणि USB टाइप C सपोर्ट असेल.

Follow Us
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त...
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी.....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी......
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद.
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह...
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की.....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की......
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,.
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू.
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश...
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश....
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर...
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर....
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री...
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री....