AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमच्या मोबाईलमध्ये असणारे धोकादायक अ‍ॅप असे शोधा, गुगलने दिले नवे फिचर

गुगल प्ले स्टोअर तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील धोकादायक ॲप शोधण्यासाठी मदत करणार आहे. गुगल प्ले स्टोअरच्या मदतीने तुमच्या फोनमधील धोकादायक ॲपची माहिती क्षणात मिळेल. गुगलने हे फिचर सर्वांसाठी उपलब्ध करुन दिले आहे.

तुमच्या मोबाईलमध्ये असणारे धोकादायक अ‍ॅप असे शोधा, गुगलने दिले नवे फिचर
| Updated on: Feb 05, 2025 | 1:53 PM
Share

आपल्या प्रत्येकाजवळ आता मोबाईल असतो. या मोबाईलमध्ये अनेक प्रकारचे अ‍ॅप आपन डाऊनलोड करतो. ऑनलाइन शॉपिंग असो की ऑनलाइन फूड बुकींग सर्व प्रकारचे अ‍ॅप आहेत. परंतु कधीकधी धोकादायक अ‍ॅपसुद्धा डाऊनलोड केले जातात. परंतु त्या अ‍ॅपची माहिती आपणास नसते. जवळपास सर्वच अँड्रॉईड युजर ॲप डाउनलोड करण्यासाठी Google Play Store चा वापर करतात. परंतु फोनमध्ये कोणतेही धोकादायक ॲप डाऊनलोड झाल्यास त्यामुळे नुकसान होऊ शकते. अनेक वेळा सायबर गुन्हेगार हॅकीगच्या माध्यमातून आपल्या फोनवर धोकादायक ॲपही डाउनलोड करतात. त्यामुळे आपली फसवणूक होते.

गुगल प्ले स्टोअर करणार मदत

गुगल प्ले स्टोअर तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील धोकादायक ॲप शोधण्यासाठी मदत करणार आहे. गुगल प्ले स्टोअरच्या मदतीने तुमच्या फोनमधील धोकादायक ॲपची माहिती क्षणात मिळेल. गुगलने हे फिचर सर्वांसाठी उपलब्ध करुन दिले आहे. गुगल प्ले स्टोअरच्या कोट्यवधी युजरला त्याचा फायदा होणार आहे. या फिचरच्या माध्यमातून तुम्ही हानिकारक ॲपची माहिती मिळवू शकतात. गुगुल प्ले स्टोअरमध्ये असणारे Play Protect फीचर तुमच्यासाठी महत्वाचे आहे. हे फिचर तुमचा संपूर्ण स्मार्टफोन स्कॅन करेल आणि तुम्हाला लपवलेल्या धोकादायक ॲपबद्दल माहिती देईल. तुमच्या फोनमध्ये कोणतेही धोकादायक ॲप असल्यास, हे फिचर तुम्हाला त्यांची माहिती स्क्रीनवर देईल.

असा वापरा Play Protect फिचर

  • सर्वात आधी तुमचा मोबाइलमधून गुगल प्ले स्टोअर ओपन करा.
  • प्ले स्टोअरमधील तुमच्या प्रोफाइल आयकनवर क्लिक करा.
  • तुम्हाला मेन्यू सेक्शनमध्ये Play Protect ऑप्शन दिसेल. त्या ठिकाणी क्लिक करा.
  • Play Protect वर क्लिक करताच तुमचा मोबाइलची संपूर्ण स्कॅनिंग होईल.
  • फोनमध्ये तुम्हाला Scanning in Progress… असा मेसेज दिसेल.
  • स्कॅन झाल्यावर तुमच्या मोबाइलमध्ये कोणताही धोकादायक ॲप नसेल तर No Harmful Apps Found असा संदेश येईल.
  • जर तुम्हाला No Harmful Apps Found असा मेसेज आला नाही तर धोकादायक ॲपची माहिती स्क्रीनवर दिली जाईल. ते तुम्ही तुमच्या मोबाईलमधून डिलिट करुन मोबाईल सुरक्षित ठेवले.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.