AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AC चं पाणी फुकट वाया घालू नका! ‘या’ स्मार्ट पद्धतीने करा वापर

एसी चालू असताना दररोज बाहेर पडणारं पाणी तुम्ही बेकार समजून फेकता का? पण खरंतर हे पाणी आहे खूपच उपयुक्त! गाडी धुण्यापासून घर स्वच्छतेपर्यंत, याच पाण्याने तुम्ही पाण्याची मोठी बचत करू शकता. जाणून घ्या, एसीच्या पाण्याचं हा वापर जो आपल्या पर्यावरणाचं भलं करेल!

AC चं पाणी फुकट वाया घालू नका! 'या' स्मार्ट पद्धतीने करा वापर
ac cooler
Follow us
| Updated on: Apr 27, 2025 | 11:45 AM

उन्हाळ्याचे दिवस म्हणजे एसीचा मोसम! सतत घाम, उकाडा आणि तापमान वाढल्यानंतर एसीशिवाय राहणं जवळपास अशक्यच. पण एसीचा वापर करताना तुम्ही कधी त्यातून बाहेर पडणारं पाणी पाहिलं आहे का? रोज एसीमधून अनेक लिटर पाणी बाहेर पडतं आणि आपण ते सर्रास फेकून देतो. पण खरंतर हे पाणी उपयोगी पडू शकतं. एसीचं पाणी पिण्यासाठी योग्य नसतं, कारण त्यात धूळ, बॅक्टेरिया असण्याची शक्यता असते. पण घरातली काही कामं अशी आहेत जिथं हेच पाणी वापरून तुम्ही चांगली बचत करू शकता!

एसीच्या पाण्याचा स्मार्ट वापर कुठे होतो ?

1. गाडी धुण्यासाठी : गाडी किंवा दुचाकी धुण्यासाठी तुम्ही एसीचं साचलेलं पाणी वापरू शकता. यामुळे स्वच्छतेसाठी लागणारं नळाचं पाणी वाचेल.

2. झाडांना पाणी घालण्यासाठी : काही प्रकारच्या सजावटीच्या झाडांना (जसे की कॅक्टस) हे पाणी देता येईल. मात्र, थोडक्याच झाडांवर आधी चाचणी करून मग नियमित वापर करा.

3. घर स्वच्छ करण्यासाठी : घराचा फरशी पुसताना किंवा बाथरूम स्वच्छ करताना हे पाणी वापरा. थोडंसं डिटर्जंट टाकल्यावर स्वच्छतेसाठी अगदी परफेक्ट!

4. कूलर आणि बॅटरीसाठी : एसीचं पाणी डिस्टिल्ड स्वरूपाचं असतं, त्यामुळे इन्व्हर्टरच्या बॅटरी किंवा कूलरमध्येही तुम्ही हे पाणी सहज वापरू शकता.

एसीमधून रोज सुमारे 1-2 लिटर पाणी बाहेर पडतं. जर तुम्ही हे पाणी फेकण्याऐवजी घरातल्या कामांसाठी वापरलंत, तर उन्हाळ्यात किमान 50-60 लिटर पाण्याची बचत होऊ शकते! ही बचत तुमच्याच नव्हे तर पृथ्वीच्या भविष्यासाठीही महत्त्वाची आहे. तर मग, एसीच्या पाण्याला आता वाया जाऊ देऊ नका थोडं विचार बदला आणि पर्यावरणासाठी पाऊल उचला!

एअर इंडियाच्या विमानाचं इमर्जन्सी लॅंडींग, मोठं कारण आलं समोर
एअर इंडियाच्या विमानाचं इमर्जन्सी लॅंडींग, मोठं कारण आलं समोर.
विमान दुर्घटनेत बचावलेल्या प्रवाशाचा अंगावर काटा आणणारा अनुभव
विमान दुर्घटनेत बचावलेल्या प्रवाशाचा अंगावर काटा आणणारा अनुभव.
विमान दुर्घटनेतल्या वस्तीगृहातल्या विद्यार्थ्यांनी सांगितली आँखों देखी
विमान दुर्घटनेतल्या वस्तीगृहातल्या विद्यार्थ्यांनी सांगितली आँखों देखी.
पंतप्रधान नरेंद्र मोदी मृतांच्या नातेवाईकांना भेटले
पंतप्रधान नरेंद्र मोदी मृतांच्या नातेवाईकांना भेटले.
मृतांच्या 192 नातेवाईकांच्या DNA चाचण्या पूर्ण
मृतांच्या 192 नातेवाईकांच्या DNA चाचण्या पूर्ण.
लकी नंबरनेच केला रुपाणींचा घात, त्याच तारखेला मृत्यूने कवटाळलं
लकी नंबरनेच केला रुपाणींचा घात, त्याच तारखेला मृत्यूने कवटाळलं.
अहमदाबाद विमान दुर्घटनेवर राज ठाकरेंनी उपस्थित केले मोठे प्रश्न..
अहमदाबाद विमान दुर्घटनेवर राज ठाकरेंनी उपस्थित केले मोठे प्रश्न...
टेकऑफ नंतर काही क्षणात विमान मेडिकल कॉलेजच्या वसतीगृहावर कोसळलं अन्...
टेकऑफ नंतर काही क्षणात विमान मेडिकल कॉलेजच्या वसतीगृहावर कोसळलं अन्....
विमान क्रॅश होणार हे आधीच कळलं?, 'त्या' प्रवाशानं काय केलं होतं ट्विट?
विमान क्रॅश होणार हे आधीच कळलं?, 'त्या' प्रवाशानं काय केलं होतं ट्विट?.
लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातील सर्वच 242 जणांचा मृत्यू - AP
लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातील सर्वच 242 जणांचा मृत्यू - AP.