मुंबई : ग्लोबल स्मार्टफोन ब्रँड टेक्नोने (Tecno) गुरुवारी भारतीय युजर्ससाठी खास किंमतीत अपग्रेड केलेला ‘स्पार्क गो 2021 स्मार्टफोन’ (Tecno Spark Go 2021) लाँच केला आहे. 7,299 रुपये किंमतीत स्पार्क गो 2021 सादर केला आहे. यामध्ये 2 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज व्हेरिएंट मिळेल. हा फोन तीन कलर व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध होईल, ज्यात होरायझन ऑरेंज, मालदीव ब्लू आणि गॅलेक्सी ब्लू या रंगांचा समावेश आहे. अमेझॉनवर 7 जुलैपासून मर्यादित स्टॉकसह 6,699 रुपयांच्या विशेष लाँच किंमतीवर हा फोन उपलब्ध होईल. (Tecno launches affordable smartphone Spark Go 2021, check is price and features)
ट्रांशन इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरिजित तालपात्रा यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, टेक्नोची 1 कोटी आनंदी ग्राहकांची उपलब्धता हा देशातील आमच्या लोकप्रियतेचा दाखला आहे. ते म्हणाले, आम्हाला माहित आहे की, आम्ही योग्य उत्पादने उपलब्ध करुन दिली आहेत आणि योग्य मागणीची पूर्तता केली आहे.
स्मार्टफोनमध्ये 6.52 इंचाचा एचडी + डॉट नॉच डिस्प्ले देण्यात आला असून बॉडी टू स्क्रीन रेश्यो 89.7 टक्के, 480 निट्स ब्राइटनेस, 720 * 1600 रेजोल्यूशन आणि 20 : 9 अॅस्पेक्ट रेश्यो उपलब्ध आहे. स्मार्टफोनमध्ये एक शानदार डिझाइन, ग्लॉसी फिनिश आणि 2.5 डी ग्लास देण्यात आला आहे, जो स्मार्टफोनला प्रीमियम लूक देतो. फोनमध्ये 5,000 mAh क्षमतेची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.
फोनमध्ये 13 मेगापिक्सलचा AI ड्युअल रीअर कॅमेरा देण्यात आला आहे. एचडीआर, नाइट पोर्ट्रेट, बॅकलाइट पोर्ट्रेट आणि एआय-पावर्ड बॅकग्राउंड बोकेह इफेक्टसारखे 18 एआय ऑटो सीन डिटेक्शन मोड आहेत. यामध्ये एफ 2.0 अपर्चरसह 8 मेगापिक्सलचा एआय फ्रंट कॅमेरादेखील देण्यात आला आहे.
Welcome SPARK GO 2021! 📱
Get your #entertainmentreloaded with the amazing features.
Get it for a special launch price of Rs.6699 only on @amazonIN 🎉
Sale starts on the 7th July. Stay tuned! 😉
Check it out: https://t.co/cfv7cja8YP#TECNO #TECNOMOBILEINDIA #SPARK pic.twitter.com/DhMRqDDmrS
— TecnoMobileInd (@TecnoMobileInd) July 1, 2021
इतर बातम्या
WhatsApp ला टक्कर, Telegram चे ढासू फीचर्स रोलआऊट, एकाच वेळी 30 जणांना व्हिडीओ कॉल करा
व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये शुभेच्छा संदेश पाठवणाऱ्या मेंबर्सना अॅडमिनचा दणका, 10 हजारांचा दंड वसूल!
PUBG Mobile मध्ये Tesla च्या गाड्या दिसणार, कंपनीकडून मोठ्या भागीदारीची घोषणा
(Tecno launches affordable smartphone Spark Go 2021, check is price and features)