AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WhatsApp एकदम बदलले की राव! काय आहेत अपडेट, हे नवीन फीचर्स

WhatsApp Update : इन्स्टंट मॅसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲपने नवीन अपडेट रिलीज केले आहे. त्याने युझर्सचे लक्ष वेधून घेतले आहे. हे फीचर एकदम आकर्षक दिसत आहे. कंपनीने अँड्राईड व्हर्जनसाठी अपडेट आणले आहे. त्यामुळे व्हॉट्सॲपचा इंटरफेस पार बदलून गेला आहे.

WhatsApp एकदम बदलले की राव! काय आहेत अपडेट, हे नवीन फीचर्स
व्हॉट्सॲपने टाकली कात, झाला असा बदल
| Updated on: Mar 31, 2024 | 11:21 AM
Share

तुमचे पण व्हॉट्सॲप एकदम बदलून गेलं ना? मेटा कंपनीने Android युझर्ससाठी WhatsApp च्या डिझाईनमध्ये मोठा बदल केला आहे. हे अपडेट हळूहळू लाखो, कोट्यवधी युझर्सपर्यंत पोहचत आहे. मेटाने या नवीन फीचरची अधिकृत माहिती अजून दिलेली नाही. पण लाखो युझर्सच्या मोबाईलमधील व्हॉट्सॲप पूर्णपणे बदलल्याचे लक्षात येत आहे. या नवीन अपडेटचा iOS युझर्सवर कोणताही परिणाम होणार नाही. या फीचरवर मेटा गेल्यावर्षी सप्टेंबरपासून चाचपणी करत होती.

व्हॉट्सॲपच्या नवीन इंटरफेसमध्ये काय आहे खास

  • व्हॉट्सॲपने बदल केल्यानंतर आता स्टेट्स बार वरच्या अंगावरुन थेट खालच्या दिशेला आला आहे. WhatsApp iOS प्रमाणेच हा बदल आहे. आता तुम्हाला या ठिकाणी तीन नाही तर चार टॅब्स दिसतील. पूर्वी युझर्सला केवळ चॅट, अपडेट्स(स्टेटस) आणि कॉलचा पर्याय दिसत होता. आता या यादीत कम्युनिटी हे टॅब जोडल्या गेले आहे.
  • युझर्सला एकाचवेळी चॅट,अपडेट्स(स्टेटस), कॉल आणि कम्युनिटीचा पर्याय दिसेल. कंपनीने प्रत्येक टॅबसाठी एक आयकॉन ठेवला आहे. यसोबतच युझर्सला ग्रीन डॉट दिसतील. ते नोटिफिकेशनची माहिती देतील. हा हिरवा रंग मागील व्हर्जनपेक्षा थोडा फिकट ठेवण्यात आला आहे.

असा पण झाला बदल

  1. नवीन बदल झाल्यानंतर इंटरफेस बदलला आहे. व्हॉट्सॲपचे मॅसेज दिसण्याच्या पद्धतीत बदल झाला आहे. मुख्य स्क्रीन सर्व चॅट्सची एक यादी दर्शविते. यामध्ये आर्काईव्ह मॅसेज सर्वात अग्रभागी दिसतात. तर आर्काइव्हच्या खाली युझर्सला तीन पर्याय दिसतात. यामध्ये सर्व मॅसेज, अनरीड मॅसेज आणि ग्रुप मॅसेजचा पर्याय मिळतो.
  2. या बदलामुळे युझर्स सहजरित्या त्याचे मॅसेज चेक करु शकतो. व्हॉट्सॲपने हा बदल जगातील जवळपास सर्वच वापरकर्त्यांसाठी रोलआऊट केला आहे. जर तुम्हाला अजूनही हा नवीन इंटरफेस दिसत नसेल तर एकदा तुमचे व्हॉट्सॲप अपडेट करुन घ्या. जर अपडेटनंतर पण कही बदल दिसत नसला तर काही काळ प्रतिक्षा करा. तुमच्या मोबाईलमध्ये पण हे अपडेट व्हर्जन लवकरच दिसेल.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.