अमेझॉन सेलमध्ये सॅमसंगचा ‘हा’ टॅबलेट मिळतोय चक्क अर्ध्या किंमतीत, जाणून घ्या ऑफर्सचे स्पेसिफिकेशन्स
सॅमसंगच्या या टॅबलेटमध्ये 11 इंचाचा WQXGA डिस्प्ले आहे. तसेच यात 8GB पर्यंत रॅम आणि 128GB स्टोरेज देखील आहे, अधिक स्टोरेजसाठी यात मेमरी कार्ड स्लॉट देण्यात आलेला आहे. तर हा टॅबलेट फोन तुम्ही अमेझॉनवर अर्ध्या किंमतीत खरेदी करू शकता. चला तर मग या खास ऑफर्सबद्दल जाणून घेऊयात...

तुम्ही जर नवीन टॅबलेट खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि त्यात तुमचे बजेट 20,000 रुपयांपेक्षा कमी असेल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण तुम्ही आता 32,000 रुपये किंमत असलेला Samsung Galaxy Tab A9+ जवळजवळ निम्म्या किमतीत खरेदी करू शकता. ही मोठी सवलत Amazon वर उपलब्ध आहे, ज्यामुळे तुम्ही 16,000 रुपयांपर्यंत बचत करू शकता. या टॅबलेटमध्ये 11 इंचाची स्क्रीन आणि 7,040 mAh बॅटरी आहे. तर हा टॅबलेट तुम्ही कोणत्या किंमतीत खरेदी करू शकता हे आजच्या लेखात जाणून घेऊयात…
ऑफर्स अंतर्गत हा टॅब या किमतीत करा खरेदी
Samsung Galaxy Tab A9+ चा 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 32,999 रुपये आहे. तर या टॅबवर 47% डिस्काउंट देण्यात आलेला आहे, त्यामुळे ऑफरचा भाग म्हणून हा टॅब फोन तुम्हाला अमेझॉनवर फक्त 17,499 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. याव्यतिरिक्त, तुम्ही बँक ऑफर्समध्ये 1,500 रुपयांपर्यंत आणि कॅशबॅकमध्ये 524 रुपयांपर्यंत बचत करू शकता. शिवाय हा टॅबलेट 456 रुपयांपासून सुरू होणाऱ्या सोप्या ईएमआयसह देखील खरेदी करता येईल.
Samsung Galaxy Tab A9+ चे फिचर्स
सॅमसंगचा हा कमी किंमतीच्या टॅबलेटमध्ये 11 इंचाचा WQXGA डिस्प्ले आहे ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz आणि 1920 x 1200 पिक्सेल रिझोल्यूशन आहे. हा स्नॅपड्रॅगन 695 चिपसेटने सुसज्ज आहे, 8GB पर्यंत रॅम आणि 128GB स्टोरेज आहे. अशातच तुम्हाला जर आणखीन स्टोरेज हवं असल्यास यात मेमरी कार्ड स्लॉट देखील देण्यात आलेला आहे.
या टॅबमध्ये कनेक्टीव्हीटीसाठी वायफाय आणि 5जी असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. यात 8 मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा आहे. अॅक्सिलरोमीटर, जायरोस्कोप, जिओमॅग्नेटिक सेन्सर, हॉल सेन्सर आणि आरजीबी लाईट सेन्सर सारखे सेन्सर देखील सपोर्ट करतात. टॅबमध्ये 7040 एमएएच बॅटरी आहे. तुम्ही जर ओटीटी कंटेंट पाहण्याचा आनंद घेत असाल तर हा तुमच्यासाठी सर्वोत्तम टॅबलेट असू शकतो.
