20 हजारात 42 इंचाची स्मार्ट टीव्ही, रिमोट सोडा आदेश द्या आणि बघा, ऐका, आनंद लुटा

Thomson या कंपनीने भारतात दोन 42 आणि 43 इंचाच्या स्मार्ट टीव्ही लॉन्च केल्या आहेत. विशेष म्हणजे या टीव्हींची किंमत सर्वसामान्यांना अगदी परवडेल अशी आहे (Thomson path series 42 inch TV).

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 21:18 PM, 15 Jan 2021
20 हजारात 42 इंचाची स्मार्ट टीव्ही, रिमोट सोडा आदेश द्या आणि बघा, ऐका, आनंद लुटा

मुंबई : आपल्या घरात 42 इंचाची स्मार्ट टीव्ही असावी, असं अनेकांना वाटतं. मात्र, स्मार्ट टीव्हीची किंमत पाहिल्यावर अनेकदा आपण टीव्ही घेण्याचा निर्णय पुढे ढकलतो. पण तुम्ही जर खरंच 42 इंचाची स्मार्ट टीव्ही घेऊ इच्छित असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. कारण Thomson या कंपनीने भारतात दोन 42 आणि 43 इंचाच्या स्मार्ट टीव्ही लॉन्च केल्या आहेत. विशेष म्हणजे या टीव्हींची किंमत सर्वसामान्यांना अगदी परवडेल अशी आहे. त्याचबरोबर या टीव्हींमध्ये गुगल असिस्टंट सपोर्ट असणार आहे. त्यामुळे रिमोट ऐवजी तुम्ही फक्त आदेश दिला तरी टीव्ही तुम्हाला हवं तसं मनोरंजन करणार आहे (Thomson path series 42 inch TV).

Thomson कंपनीने Thomson Path सीरीजच्या Thomson PATH2121 Android TV आणि Thomson PATH0009BL Android TV अशा दोन टीव्ही लॉन्च केल्या आहेत. यापैकी Thomson PATH2121 Android TV या टीव्हीची किंमत 19,999 रुपये इतकी आहे. तर 43 इंचाच्या Thomson PATH0009BL Android TV या टीव्हीची किंमत 22,499 रुपये इतकी आहे. फ्लिपकार्टवर 20 जानेवारीपासून या टीव्हींची विक्री सुरु होणार आहे. विशेष म्हणजे आता प्रजासत्ताक दिनाच्या विशेष ऑफरमध्ये स्वस्तात मस्त अशी ही टीव्ही तुम्ही खरेदी करु शकणार आहात.

फक्त हुकूम द्या आणि आनंद लुटा

मोबाईलवर आपण OTT प्लॅटफॉर्मवरील बऱ्याच वेबसिरीज आणि कार्यक्रम पाहत असतो. तुमच्या घरात स्मार्ट टीव्ही असेल तर तुम्ही टीव्हीवर ते कार्यक्रम पाहता. यासाठी तुम्ही मोबाईलसोबत टीव्ही कनेक्ट करतात. मात्र, आता टीव्हीच्या रिमोटमध्येच Amazon prime Video, Youtube आणि Sony Liv साठी डेडिकेटेड बटन्स आहेत. त्यामुळे तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने ओटीटी प्लॅटफॉर्मची मजा घेऊ शकणार आहात. थॉमसन पाथच्यास दोन्ही टीव्हींमध्ये HDM1 2.0 पोर्ट आणि 2 USB 2.0 पोर्ट्स आहेत (Thomson path series 42 inch TV).

फायदेशीर गोष्टी काय?

थॉमसनच्या 42 आणि 43 इंचाच्या दोन्ही टीव्हींमध्ये 1.4GHz ARM Cortex-A53 क्वॉड कोर प्रोसेसर आहेत. याशिवाय 40 व्हॅटचा साऊंड आऊटपूट आहे. दोन्ही टीव्हींमध्ये DLED IPS डिस्प्ले आहे. त्यामुळे स्क्रिन रिजॉल्यूशन हे 1920×1080 पिक्सल इतकं आहे. या टीव्हींचा व्ह्यूंग अँगल हा 178 डिग्रीचा आहे. या दोन्ही टीव्हींमध्ये 1 GB RAM आणि 8GB इंटर्नल स्टोअरेज आहे.

दिवसभराची बित्तंबात, पाहा आजची बात, #TV9Marathi वर दररोज रात्री 10 वा

या दोन्ही टीव्हींमध्ये Chromecast (Android) आणि AirPlay (iOS) सपोर्ट आहे. त्यामुळे तुम्ही स्मार्टफोन किंवा टॅबलेटवर होणाऱ्या गोष्टी टीव्हीवरही अनुभवू शकतात. या दोन्ही टीव्हींमध्ये तुम्ही 5000 पेक्षाही जास्त App इन्स्टॉल करु शकतात.

हेही वाचा : शाओमीच्या Mi 10i फोनची बंपर विक्री, पहिल्याच सेलमध्ये तब्बल 200 कोटींची उलाढाल