तुमचेही इंटरनेट लवकर संपतं का? मग या 5 स्मार्ट टिप्स नक्की येतील कामी
मोबाईल डेटा हे आजच्या युगात ‘डिजिटल इंधन’ आहे. स्मार्ट युजर ते जपून वापरतात, त्यासाठी या 5 ट्रिक्स अत्यंत उपयोगी ठरतात. जर तुम्हालाही सतत डेटा संपण्याची समस्या भेडसावत असेल, तर या लेखात दिलेल्या टिप्स त्वरित अमलात आणा आणि मोबाईल वापरताना 'डेटा टेन्शन' पासून मुक्त व्हा!

आजच्या डिजिटल युगात स्मार्टफोन हे फक्त कॉलिंगसाठी मर्यादित राहिलेलं नाही. आज स्ट्रीमिंग, गेमिंग, सोशल मीडिया, ऑनलाईन मीटिंग्स, वेब ब्राउजिंग यांसारख्या असंख्य गोष्टींसाठी मोबाईलचा वापर होतो. त्यामुळे मोबाइल डेटा पटकन संपल्याची तक्रार अनेक युजर्सकडून ऐकायला मिळते. जर तुमचाही डेटा दररोज संध्याकाळी संपत असेल आणि तुम्ही सतत रिचार्ज करण्याच्या विवंचनेत असाल, तर आता काळजी करण्याची गरज नाही. या बातमीत अशा 5 स्मार्ट ट्रिक्स सांगणार आहोत, ज्या वापरून तुम्ही तुमचा डेटा बचत करू शकता आणि इंटरनेटचा आनंद अखंडपणे घेऊ शकता.
1. अॅप्ससाठी ‘ऑटो अपडेट’ बंद करा
बहुतेक लोकांच्या नकळत, त्यांच्या फोनमधील अॅप्स वायफायशिवायही आपोआप अपडेट होत असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात डेटा खर्च होतो. हे टाळण्यासाठी, प्ले स्टोअर किंवा अॅप स्टोअरमध्ये जाऊन ‘ऑटो अपडेट’ ही सेटिंग ‘Wi-Fi only’ वर सेट करा. यामुळे अॅप्स केवळ वायफायवरच अपडेट होतील आणि तुमचा मोबाईल डेटा वाचेल.
2. बॅकग्राउंड डेटा वापरावर मर्यादा ठेवा
अनेक अॅप्स बॅकग्राउंडमध्ये डेटा वापरत असतात. उदाहरणार्थ, ईमेल, चॅट अॅप्स किंवा न्यूज अॅप्स. ही प्रक्रिया तुमच्या लक्षातही येत नाही आणि डेटा खर्च होतो. एंड्रॉइड किंवा iOS च्या सेटिंग्समध्ये जाऊन बॅकग्राउंड डेटा ‘रिस्ट्रिक्ट’ किंवा ‘ऑफ’ करा. यामुळे डेटा फक्त ते अॅप तुम्ही प्रत्यक्ष वापरत असतानाच खर्च होईल.
3. व्हिडिओ क्वालिटी कमी करा
जर तुम्ही दिवसभर सोशल मीडिया अॅप्सवर व्हिडिओ पाहत असाल, तर लक्षात ठेवा की ही अॅप्स बाय डिफॉल्ट HD (High Definition) क्वालिटीमध्ये व्हिडिओ स्ट्रीम करतात. त्यामुळे भरपूर डेटा खर्च होतो. यासाठी, YouTube, Instagram, Facebook सारख्या अॅप्समध्ये ‘डेटा सेव्हिंग मोड’ अॅक्टिवेट करा आणि व्हिडिओ क्वालिटी 480p किंवा त्यापेक्षा कमी करा.
4. ‘डेटा सेव्हर मोड’ ऑन करा
एंड्रॉइड स्मार्टफोन्समध्ये ‘डेटा सेव्हर’ नावाचा एक इनबिल्ट फीचर असतो, जो एकूण डेटा वापर कमी करतो. यासोबतच, Chrome ब्राउजरमध्येही डेटा सेव्हिंग मोड उपलब्ध असतो, जो वेब पेजेस लोड करताना डेटा खूपच कमी वापरतो. त्यामुळे हा मोड चालू करून तुम्ही इंटरनेट ब्राउजिंग करतानाही डेटा वाचवू शकता.
5. Wi-Fi चा स्मार्ट वापर करा
जर तुम्ही ऑफिस, कॉलेज, मॉल किंवा कॅफेमध्ये असाल आणि तेथे Wi-Fi सुविधा उपलब्ध असेल, तर मोबाईल डेटा बंद करून Wi-Fi वापर करा. विशेषतः जर तुम्ही मोठ्या फाइल्स डाउनलोड करत असाल किंवा व्हिडिओ कॉल करत असाल, तर Wi-Fi हीच सर्वोत्तम निवड आहे. यामुळे तुमचा डेटा बरेच प्रमाणात वाचू शकतो.
