कॉल आल्यावर आता फोनच बोलेल तुमच्या आवाजात, जाणून घ्या स्पेशल ट्रिक
कॉल आल्यावर तुमचा फोनच तुमच्या आवाजात बोलला तर कसं वाटेल? तंत्रज्ञानाच्या जगात आता हे शक्य झाले आहे. तुम्ही कुठेतरी रिलॅक्स व्हा आणि फोन तुमच्या आवाजात कॉलवर बोलेल.

आजच्या डिजिटल युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) हे आज सर्वात लोकप्रिय तंत्रज्ञान बनले आहे, ज्यामुळे मुलांपासून मोठ्यांपर्यंत मुलांची काम करण्याची पद्धत बदलली आहे. जर तुम्ही घरात एकदम आरामात बसलेले आहात आणि कॉल आल्यावर जर तुमचा फोन आपोआप तुमच्या आवाजात बोलायला लागला तर काय होईल? कारण आता एआयच्या मदतीने हे शक्य आहे आणि ही कमाल ट्रूकॉलरची असणार आहे. अनोळखी नंबरवरून कॉल आल्यावर आपण पहिले नंबर कोणाचा आहे हे जाणून घेण्यासाठी ट्रूकॉलरचा वापर करतो, पण आता ट्रूकॉलरच्या माध्यमातून तुमचा फोनही तुमच्या आवाजात बोलू शकतो.
ट्रूकॉलर तुम्हाला ट्रूकॉलर असिस्टंटमध्ये पर्सनल व्हॉइस नावाचे फीचर देत आहे. या फीचरअंतर्गत तुम्ही तुमच्या आवाजाचं डिजिटल व्हर्जन तयार करू शकता. त्यानंतर तुमचा डिजिटल व्हॉईस ट्रूकॉलर असिस्टंट फोन कॉल साठी वापरता येईल.
कसे तयार झाला ‘हा’ फिचर
ट्रूकॉलर व मायक्रोसॉफ्ट या दोन्ही कंपन्यांनी भागीदारी केली आहे. त्यामुळे दोन्ही कंपनीने सोबतच्या भागीदारीचा एक भाग म्हणून पर्सनल व्हॉईस फीचर विकसित केले आहे. ज्यामुळे या कंपन्यांनी मायक्रोसॉफ्ट अझुर एआय स्पीचचे नवीन पर्सनल व्हॉईस तंत्रज्ञान हे ॲपमध्ये वापरण्यात यावा यासाठी सहकार्य केले आहे.
आता तुम्हीच करा तुमचा आवाज तयार
ट्रूकॉलरच्या स्टॅण्डर्ड डिजिटल असिस्टंट व्हॉइस या नवीन फिचरमुळे तुम्ही तुमचा आवाज तयार करू शकता. कारण जेव्हा ट्रूकॉलर असिस्टंट तुम्हाला कॉल आल्यावर तुम्हाला तुमच्या आवाजात कॉल आलेल्या व्यक्तीचा नाव किंवा नंबर सांगणार आहे.
पर्सनल व्हॉईस फीचरचा वापर करण्यासाठी युजर्सकडे ट्रूकॉलर ॲपची लेटेस्ट व्हर्जन असणे आवश्यक आहे आणि तुम्ही ट्रूकॉलर प्रीमियमचे सदस्य असणे आवश्यक आहे. ट्रूकॉलर प्रीमियम सब्सक्रिप्शनची किंमत महिन्याला ९९ रुपयांपासून सुरू होते.
कसा सेट कराल आवाज?
या फीचरमध्ये तुमचा आवाज सेट करण्याची पद्धत खूप सोपी आहे. फक्त ॲपमधील असिस्टंट सेटिंग्जमध्ये जा आणि तुमचा आवाज रेकॉर्ड करण्यासाठी आणि सेट करण्यासाठी दिलेल्या सूचनांचे अनुसरण करा. यानंतर असिस्टंटवर कॉल आला की एआय असिस्टंट तुमच्या आवाजात बोलेल आणि फोन करणाऱ्यांना तुमचा आवाज ऐकू येईल.