Twitter block 250 accounts | नरेंद्र मोदींच्या विरोधात आक्षेपार्ह हॅशटॅग, ट्विटस् करणारी 250 अकाऊंट ब्लॉक, ट्विटरची कारवाई

Twitter to block around 250 accounts केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाच्या सूचनेनुसार ट्विटरनं 250 वापरकर्त्यांची अकाऊंटस ब्लॉक केली आहेत.

Twitter block 250 accounts | नरेंद्र मोदींच्या विरोधात आक्षेपार्ह हॅशटॅग, ट्विटस् करणारी 250 अकाऊंट ब्लॉक, ट्विटरची कारवाई
ट्वीटरवर आपल्या आवाजात पोस्ट करा ट्विट; बस्स तुम्हाला कराव्या लागतील या सोप्या गोष्टी

नवी दिल्ली: केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाच्या सूचनेनुसार ट्विटरनं 250 वापरकर्त्यांची अकाऊंटस ब्लॉक केली आहेत. त्या ट्विटर अकाऊंटवरुन ‘Modi Planning Farmer Genocide ‘ हा हॅशटॅग चालवण्यात आला होता. त्याद्वारे चुकीची आणि प्रक्षोभक वक्तव्य 30 जानेवारीला केली गेल्याचा दावा करण्यात आला आहे. ट्विटरनं केलेल्या कारवाईत प्रसार भारतीच्या सीईओचे ट्विटर अकाऊंट देखील सस्पेंड करण्यात आलं आहे. (Twitter to block around 250 Tweets/Twitter accounts including Prasar Bharati CEO account)

केंद्रीय गृहमंत्रालय आणि कायदेविषयक संस्थांच्या विनंतीवरुन केंद्रीय आयटी मंत्रालयाकडून ट्विटरला संबंधित अकाऊंटसवर कारवाई करण्याबाबत कळवण्यात आले होते, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सध्या सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनात संबंधित ट्रेंडमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून 250 जणांची अकाऊंटस ब्लॉक करण्यात आली आहेत, अशी माहिती मिळतेय. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत ट्विट केले आहे.

ट्विटरच्या कारवाईचा प्रसारभारतीच्या सीईओला फटका

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाच्या सूचनेनुसार 250 ट्विटर अकाऊंटस ब्लॉक करण्यात आली आहेत. ट्विटरच्या या निर्णयाचा फटका प्रसार भारतीचे सीईओ शशि शेखर यांना बसला आहे. शशि शेखर यांचं ट्विटर अकाऊंट ब्लॉक कऱण्यात आलं असून प्रसार भारतीनं त्याबाबत ट्विटर इंडियाला प्रश्न विचारला आहे. प्रसारभारतीनं ट्विटर आणि ट्विटर इंडियाला टॅग करुन प्रसारभारतीच्या सीईओच्या ट्विटरवर झालेल्या कारवाईबद्दल स्पष्टीकरण मागितलं आहे. प्रसार भारतीनं ट्विटरवर त्याबाबत फोटो शेअर केला आहे. Account Withheld. Your Account has been withheld in India in response to a legal demand  असा उल्लेख त्यावर करण्यात आलाय म्हणजेच कायदेशीर कारवाई करण्याची मागणी झाल्यानंतर तुमचं अकाऊंट बंद करण्यात आलं आहे.

Prasar bharati ceo twitter

प्रसार भारतीच्या सीईओचं अकाऊंट सस्पेंड करण्यात आलंय

ट्विटरनं कारवा मॅगझिन, अभिनेता सुशांत सिंह, किसान एकता मोर्चा, आपचे आमदार जनरल सिंह यांच्या ट्विटर अकाऊटला ब्लॉक करण्यात आलयं. कॉ. कन्हैय्या कुमार याचे अकाऊंट देखील सस्पेंड करण्यात आले होते ते पुन्हा रिस्टोर करण्यात आलं आहे.

 

संबंधित बातम्या:

Budget 2021 : आता स्मार्टफोन्स महागणार! मोबाईल पार्ट्सबाबत सरकारची मोठी घोषणा

आता WhatsApp वरील चॅट्स Telegram वर मूव्ह करा, नवं फिचर लाँच

(Twitter to block around 250 Tweets/Twitter accounts including Prasar Bharati CEO account)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI