हातातील कामं ठेवा बाजूला, अगोदर FASTag चे केवायसी अपडेट करा, नाहीतर दुप्पट टोल भरा

देशातील टोल नाक्यांवरील लांबच लांब रांगा एकद्याचा बंद होणार आहे. तुम्हाला टोल नाके पण नजर पडणार नाही. देशात याच वर्षात सॅटेलाईट टोल वसुली यंत्रणा सुरु होत आहे. पण त्यापूर्वी एक झंझट तुम्हाला झटपट निस्तारावी लागणार आहे. फास्टटॅगचे ईकेवायसी पूर्ण करावे लागणार आहे.

हातातील कामं ठेवा बाजूला, अगोदर FASTag चे केवायसी अपडेट करा, नाहीतर दुप्पट टोल भरा
झटपट करा ई-केवायसी अपडेट
Follow us
| Updated on: Mar 31, 2024 | 11:47 AM

राष्ट्रीय महामार्ग, द्रूतगती महामार्ग, समृद्धी असे अनेक महामार्गावरील टोल नाके हटणार आहे. ते दूरदूरवर तुमच्या नजरेस पडणार नाही. तुम्हाला टोल नाक्यावरील लांबच लांब रांगांमध्ये थांबण्याची पण गरज उरणार नाही. केंद्र सरकार फास्टॅग आणि हे टोलनाके लवकरच गुंडाळण्याच्या मार्गावर आहे. सरकार नवीन उपग्रहआधारे टोलवसुली यंत्रणा लागू करत आहे. याच वर्षात हा प्रयोग सुरु होईल. पण त्यापूर्वी तुम्हाला एक काम पूर्ण करावे लागणार आहे. फास्टटॅगचे ई-केवायसी एकदाचे अपडेट करुन द्यावे लागणार आहे. त्याची प्रक्रिया पण एकदम सोपी आहे.

तीन वर्षांपासून फास्टटॅगची साथ

देशात 15 फेब्रुवारी 2021 पासून चारचाकी वाहनांना फास्टटॅगअनिवार्य करण्यात आले आहे. टोल नाक्यावरील गर्दी कमी करण्यासाठी फास्टटॅगचा वापर वाढविण्यात आला. इलेक्ट्रॉनिक टोल जमा करण्याला गती आणि सुसूत्रता आली. प्रत्येक वाहनाला फास्टटॅग अनिवार्य करण्यात आले. पण एकच फास्टटॅग अनेक वाहनांसाठी वापरल्या जात असल्याने ई-केवायसीचे हत्यार उपासण्यात आले आहे. 31 मार्च ही त्याची अंतिम मुदत आहे. 29 फेब्रुवारीपर्यंत फास्टटॅगचे ई-केवायसी पूर्ण करण्याची मुदत होती. ती वाढवून 31 मार्च करण्यात आली होती.

हे सुद्धा वाचा

मोठा भूर्दंड

जर फास्टटॅगच अपडेट केले नाही तर वाहनधारकांना टोल नाक्यावर दुप्पट कर मोजावा लागेल. NHAI च्या फास्टटॅग विभागात यासंबंधीची सूचना आणि इतर अपडेट तुम्हाला माहिती करुन घेता येईल. सिंगल फास्टटॅगला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

ई-केवायसीसाठी ही कागदपत्रं महत्वाची

  • तुमचा वाहन नोंदणी प्रमाणपत्र (RC)
  • पासपोर्ट साईज फोटो
  • वाहन परवाना, पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदान कार्ड
  • ओळखीचा वरीलपैकी कोणताही पुरावा

असे झटपट करा ई-केवायसी

  1. बँकेशी जोडलेल्या फास्टॅग वेबसाईटवर जा
  2. नोंदणीकृत मोबाईल क्रमांकचा वापर करुन लॉग इन करा
  3. मोबाईलवर आलेला ओटीपी टाका
  4. माय प्रोफाईलवर जाऊन केवायसी टॅबवर क्लिक करा
  5. पत्ता आणि इतर आवश्यक माहिती भरा
  6. केवायसीची प्रक्रिया पूर्ण होईल
  7. fastag.ihmcl.com या साईटवर फास्टटॅग स्टेट्स चेक करा
Non Stop LIVE Update
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.