G Pay, PhonePe, Paytm ची UPI सर्व्हिस काही तास बंद, युजर्सची सोशल मीडियावर तक्रार

युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI), नॅशनल पेमेंट्स काऊन्सिल ऑफ इंडिया (NPCI) च्या मालकीचे आणि ऑपरेट केलेले इन्स्टंट पेमेंट गेटवे एक तासाहून अधिक काळ बंद होते.

G Pay, PhonePe, Paytm ची UPI सर्व्हिस काही तास बंद, युजर्सची सोशल मीडियावर तक्रार
UPI transaction

मुंबई : युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI), नॅशनल पेमेंट्स काऊन्सिल ऑफ इंडिया (NPCI) च्या मालकीचे आणि ऑपरेट केलेले इन्स्टंट पेमेंट गेटवे एक तासाहून अधिक काळ बंद होते. UPI सर्व्हर डाउन झाल्यापासून अनेक युजर्सनी सोशल मीडियावर तक्रार केली आहे की, UPI सर्व्हर डाउन आहे. तसेच हे युजर्स डिजिटल वॉलेट वापरून किंवा Google Pay, Phone Pay आणि Paytm सारख्या ऑनलाइन पेमेंट सेवांचा वापर करून कोणतेही व्यवहार करू शकत नाहीत. (UPI server down, Paytm, Google Pay, PhonePe transactions fail)

अनेक युजर्सना सुरुवातीला असे वाटले होते की, त्यांच्या बाजूने नेटवर्कचा काही तरी प्रॉब्लेम आहे. त्यामुळे अनेकांनी इंटरनेट ऑन-ऑफ करुन पाहिलं, फोन रिस्टार्ट करुन पाहिला. त्यानंतर त्यापैकी बहुतांश युजर्सनी त्यांच्या अयशस्वी UPI व्यवहारांचे स्क्रीनशॉट देखील सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. अर्शद नावाच्या एका युजरने सांगितले की, तो काही तासांपासून Google Pay द्वारे पेमेंट करण्याचा प्रयत्न करत होता, परंतु तो पेमेंट करू शकला नाही.

गुगल पेची UPI सेवा 2 तास बंद

गुगल पे युजर्स दोन तासांहून अधिक काळ UPI सेवा बंद असल्याच्या तक्रारी करत आहेत. अमर नावाच्या दुसर्‍या एका युजरने ट्विटरवर सांगितले की, तो Google Pay द्वारे पेमेंट प्राप्त करू शकत नाही. Google Pay ने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटला रिप्लाय केला की, या सर्व्हरशी संबंधित समस्या आहेत, आम्ही या समस्यांचे निराकरण करण्यासाठी काम करत आहोत.

काही युजर्सनी ट्विटरवर सांगितले की, 4 तासांहून अधिक काळ लोटला तरी या समस्येचे निराकरण झाले नाही. याचदरम्यान, Google Pay कडून युजर्सना त्यांच्या समस्यांची तक्रार करताना कोणतीही वैयक्तिक माहिती सोशल मीडियावर पोस्ट करू नये याची आठवण करून दिली जात होती.

2021 मध्ये UPI च्या माध्यमातून 73 लाख कोटींचे व्यवहार

नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, डिसेंबर 2021 मध्ये, UPI ने एकूण 8.26 लाख कोटी रुपयांचे (जवळपास 111.2 अब्ज डॉलर्स) 456 कोटी व्यवहार नोंदवले. याव्यतिरिक्त, UPI व्यवहारांनी जानेवारी 2021 ते डिसेंबर 2021 पर्यंत 73 लाख कोटी (अंदाजे 970 अब्ज डॉलर्स) किमतीचे व्यवहार नोंदवले. कॅलेंडर वर्ष 2020 च्या तुलनेत प्लॅटफॉर्मवरील व्यवहार 110% पेक्षा जास्त वाढले आहेत.

इतर बातम्या

Google | वृत्त संकलनातील एकाधिकारशाहीचा दुरुपयोग, गुगलविरोधात भारतात चौकशीचे आदेश

शानदार ऑफर! Oppo चा 12 हजारांचा स्मार्टफोन 9 हजार रुपयांत खरेदीची संधी

कारसाठी NOC का गरजेचं? जाणून घ्या अप्लाय करण्याची सोपी ऑनलाईन पद्धत

(UPI server down, Paytm, Google Pay, PhonePe transactions fail)

Published On - 12:38 pm, Mon, 10 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI