iPhone वापरताय तर ‘या’ 5 सीक्रेट सेटिंग्स तर माहित असायलाच हव्या, थर्ड-पार्टी ॲपशिवाय करा सक्रिय
आयफोनमध्ये अनेक लपलेले फीचर्स आहेत जे ॲपल प्रमोट करत नाही, पण हे फिचर्स आयफोन वापरकर्त्यांसाठी खूप उपयुक्त आहेत. या 5 सेटिंग्ज तुमची फोनमधील काही काम अगदी सुपरफास्ट करतील. चला तर मग या सीक्रेट सेटिंग्सबद्दल जाणून घेऊयात...

आयफोनची क्रेज संपुर्ण जगात पाहायला मिळते. अशातच तुमच्याकडे जर आयफोन असेल तर तुम्हाला तुमच्या फोनच्या या काही सीक्रेट सेटिंग्स विषयी माहित असणे आवश्यक आहे. तर टेक जायंट ॲपल त्यांच्या आयफोनमध्ये असे काही सीक्रेट फीचर्स असतात जे तुमची दैनंदिन कामे सोपी करतात, परंतु या सीक्रेट सेटिंग्स बद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. हे फीचर्स तुमचा टायपिंग आणि नेव्हिगेशन अनुभव सुधारतातच पण तुमचा आयफोन अधिक स्मार्ट पद्धतीने वापरला जातो. खास गोष्ट म्हणजे तुम्ही कोणत्याही थर्ड-पार्टी ॲपशिवाय तुमच्या फोनवर ते त्वरित सक्रिय करू शकता. जर तुम्हालाही तुमचा आयफोन त्याच्या पूर्ण क्षमतेने वापरायचा असेल, तर तुम्हाला या 5 सेटिंग्ज माहित असणे आवश्यक आहे. चला तर मग आजच्या लेखात याबद्दल जाणून घेऊयात.
स्पेस बार ट्रिक (Space Bar Trick)
टचस्क्रीनवर कर्सर सेट करणे अनेकदा अवघड असते, परंतु आयफोन कीबोर्डमध्ये एक लपलेली ट्रिक्स आहे. स्पेस बार दाबून धरून ठेवा, आणि तुमचा कीबोर्ड ट्रॅकपॅडमध्ये रूपांतरित होईल. आता तुम्ही तुमचे बोट फिरवून कर्सरला जिथे आवश्यक असेल तिथे ठेवू शकता. यामुळे टायपिंगच्या चुका दुरुस्त करणे खूप सोपे होते.
फोन सायलंट न करता कीबोर्ड क्लिक करा सायलंट
तुम्हाला जर टायपिंग करताना कीबोर्डचा क्लिकिंग आवाज त्रास देत असेल, तर तुम्ही संपूर्ण फोन सायलेंट मोडमध्ये न ठेवता कीबोर्ड क्लिक सायलंट करू शकता. यासाठी तुम्ही Settings मध्ये जा नंतर Sounds & Haptics आणि Keyboard Feedbackवर जाऊन आवाज बंद करू शकता. Haptics चालू असताना टाइप करताना तुम्हाला अजूनही थोडासा व्हायब्रेशन जाणवेल.
अॅपल लोगोला बनवा शॉर्टकट बटण
तुमच्या आयफोनच्या मागील बाजूस असलेला Apple लोगो हा केवळ एक डिझाइनचा भाग नाही तर त्यात एक असे लपलेले बटण आहे. Back Tap फिचर्ससह तुम्ही स्क्रीनशॉट घेण्यासाठी व कॅमेरा उघडण्यासाठी किंवा कंट्रोल सेंटर लॉंच करण्यासाठी डबल किंवा ट्रिपल टॅप सेट करू शकता. तुम्ही Settings- Accessibility-Touch- Back Tap वर जाऊन तुमचा पसंतीचा शॉर्टकट निवडू शकता.
फ्लॅशलाइटची ब्राईटनेस तुमच्या सोईने करा कंट्रोल
बहुतेक वापरकर्ते फ्लॅशलाइट फक्त चालू किंवा बंद करण्यापुरता मर्यादित ठेवतात, परंतु त्याची ब्राइटनेस लेव्हल देखील सेट केली जाऊ शकते. Control Centre मधील फ्लॅशलाइट आयकॉनवर जास्त वेळ दाबून ठेवा जेणेकरून तुम्हाला ब्राइटनेस कमी जास्त करू शकता.
ॲप्समधून रेड नोटिफिकेशन काढणे
प्रत्येक अॅप आयकॉनवर दिसणारे लाल बॅज तुमची स्क्रीन गोंधळलेली दिसते. तर असे नोटिफिकेशन काढून टाकण्यासाठी, Settings- Notifications वर जा, अॅप निवडा आणि बॅजेस बंद करा. हे तुमची होम स्क्रीन स्वच्छ आणि फोकस्ड राहील. तुम्ही हे अशा कोणत्याही अॅपवर लागू करू शकता ज्याला खूप जास्त नोटिफिकेशन येत असतात.
