AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vivo X300s पुढील आठवड्यात 50 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा, 90 वॉट फास्ट चार्जिंगसह होणार लाँच, जाणून घ्या तारीख

Vivo X300s स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच होणार आहे. या फोनमध्ये 50 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आणि 7100mAh क्षमतेची बॅटरी असण्याची शक्यता आहे. तर लाँच होण्याआधीच याफोनचे फिचर्स लीक करण्यात आले आहेत. चला तर मग जाणून घेऊयात या फोनची किंमत आणि फिचर्स

Vivo X300s पुढील आठवड्यात 50 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा, 90 वॉट फास्ट चार्जिंगसह होणार लाँच, जाणून घ्या तारीख
Vivo X300s Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Mar 26, 2026 | 1:52 PM
Share

स्मार्टफोन बाजारात आणखी एका दमदार स्मार्टफोनचा प्रवेश होणार आहे. विवो कंपनी पुढच्या आठवड्यात Vivo X300s लाँच करत आहे. लाँच होण्याआधीच त्याची अनेक दमदार फिचर्स समोर आले आहेत. असा दावा केला जात आहे की, या फोनमध्ये 50 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा, 7100mAh क्षमतेची बॅटरी आणि 90 वॉटचे फास्ट चार्जिंग असेल. कारण कंपनीचे टीझर्स आणि लीक्स पाहता, हे स्पष्ट आहे की हा फोन प्रीमियम सेगमेंटमध्ये मोठी खळबळ निर्माण करू शकतो. चला तर मग आजच्या लेखात जाणून घेऊयात की हा फोन कधी लाँच होईल.

Vivo X300s या तारखेला होणार लाँच

Vivo X300s हा फोन 30 मार्च रोजी चीनमध्ये Vivo X300 Ultra आणि Vivo Pad 6 Pro सोबत लाँच करणार आहेत. हा फोन प्री-ऑर्डरसाठी आधीच उपलब्ध आहे. कंपनी हा फोन हिरव्या रंगाच्या पर्यायातही देऊ शकते. यामध्ये नवीन ब्लूप्रिंट नेटिव्ह कलर सिस्टीम देखील देण्यात येणार आहे ज्यामुळे फोटोंमधील कलरला आणखीन चांगले बनवू शकते. स्टोरेज पर्यायांमध्ये 12 जीबी ते 16 जीबी रॅम आणि 1 टीबी पर्यंत स्टोरेजचा समावेश असण्याची शक्यता आहे.

कॅमेरा आणि डिस्प्लेमध्ये मोठे अपग्रेड

विवो X300s मध्ये एक पॉवरफुल कॅमेरा असेल असे म्हटले जात आहे. यामध्ये 50MP चा फ्रंट कॅमेरा असेल, ज्यामुळे सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगचा अनुभव सुधारेल. तसेच फोनच्या मागील बाजूस झाईस ट्युनिंगसह 200MP चा प्रायमरी कॅमेरा अपेक्षित आहे. यासोबतच 50MP चा अल्ट्रावाइड लेन्स आणि 50MP चा पेरिस्कोप टेलीफोटो लेन्स असण्याचीही शक्यता आहे. या फोनमध्ये 144Hz रिफ्रेश रेटसह 6.78-इंचाचा 1.5K डिस्प्ले असेल, ज्यामुळे एक उत्तम व्हिज्युअल अनुभव मिळेल.

कार्यक्षमता, बॅटरी आणि डिझाइनवर विशेष लक्ष

या स्मार्टफोनमध्ये मोठी 7100mAh बॅटरी असेल, ज्यामुळे दीर्घकाळ वापर सुनिश्चित होईल. यात 90W वायर्ड आणि 40W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट मिळण्याची शक्यता आहे. फोनमध्ये मेटल फ्रेम असण्याची शक्यता आहे, ज्यामुळे त्याला एक प्रीमियम लूक मिळेल. 3D अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट स्कॅनर आणि IP68/IP69 रेटिंगमुळे तो अधिक सुरक्षित आणि टिकाऊ बनतो.

Follow Us
धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! अन् पुढे जे झालं....
Tree Collapse Mumbai | धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; निष्काळजीपणामुळे आणखी एकाचा बळी
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला जीव
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला 2 वर्षांच्या सोहमचा जीव
मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
ब्रेकिंग! मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील दुपारच्या सत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
Rain Update | पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
उद्धव ठाकरे पुन्हा हिंदुत्वाच्या रणांगणात! पत्रकार परिषदेत मोठी घोषणा
Uddhav Thackeray UNCUT | उद्धव ठाकरे पुन्हा हिंदुत्वाच्या रणांगणात! पत्रकार परिषदेत मोठी घोषणा; येत्या रविवारी...
अमित साटम की चाटम? साटम यांच्या हकालपट्टीची थेट संजय राऊतांकडून मागणी!
Sanjay Raut Press | अमित साटम की चाटम? मृत्यूंवर हसणं महागात पडणार; अमित साटम यांच्या हकालपट्टीची थेट संजय राऊतांकडून मागणी!
महाराष्ट्रात लागू होणार समान नागरी कायदा? अधिवेशनाकडे राज्याचे लक्ष
महाराष्ट्रात लागू होणार समान नागरी कायदा? फडणवीस सरकारच्या मोठ्या हालचाली सुरू; आजच्या अधिवेशनाकडे राज्याचे लक्ष
पालखीपूर्वी इंद्रायणीला प्रदूषणाचा विळखा! वारकऱ्यांचा संताप अनावर
Indrayani River | पालखीपूर्वी इंद्रायणीला प्रदूषणाचा विळखा! फेसाळलेल्या नदीने वारकऱ्यांचा संताप अनावर
कोल्हापूरमध्ये धोक्याची घंटा! पंचगंगा दुथडी भरून वाहतेय; 3 बंधारे...
Kolhapur Rain Update | कोल्हापूरमध्ये धोक्याची घंटा! पंचगंगा दुथडी भरून वाहतेय; 3 बंधारे पाण्याखाली, नागरिकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास सुरूच...
पावसामुळे विधानसभेचे कामकाज ठप्प! मंत्रीच पोहोचले नाहीत, सभा तहकूब
Mumai Rain Update | पावसामुळे विधानसभेचे कामकाज ठप्प! मंत्रीच पोहोचले नाहीत, सभा तहकूब