AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतात Vivo Y21 5G आणि Vivo Y11 5G लाँच, सविस्तरपणे जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

विवोने भारतात आपल्या वाय सीरीजमधील Vivo Y21 5Gआणि Vivo Y11 5G हे स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. हे नवीन 5 जी स्मार्टफोन्स कंपनीच्या वेबसाइटवर आणि रिटेल स्टोअर्समध्ये उपलब्ध आहेत. चला आजच्या लेखात आपण या फोनची किंमत आणि फिचर्स जाणून घेऊयात.

भारतात Vivo Y21 5G आणि Vivo Y11 5G लाँच, सविस्तरपणे जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
Vivo Y21 5G
| Edited By: | Updated on: Mar 26, 2026 | 1:43 PM
Share

विवो कंपनीने त्यांचा वाय सीरीजमध्ये Vivo Y21 5G आणि Vivo Y11 5G हे दोन नवीन स्मार्टफोन्स लाँच केले आहेत: हे दोन्ही फोन्स भारतात कंपनीच्या वेबसाइटवर आणि इतर ऑफलाइन रिटेल आउटलेट्सवर विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. वाय21 5जी तीन रॅम आणि स्टोरेज पर्यायांमध्ये उपलब्ध असेल, तर वाय11 5जी दोन स्टोरेज पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. चला जाणून घेऊयात की या स्मार्टफोन्सची किंमत किती आहे आणि कोणते फिचर्स आहेत.

भारतातील विवो Y21 5G ची किंमत

हँडसेटच्या 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 18,999 रूपये आहे, तर 6GB रॅम आणि 128GB व्हेरिएंटची किंमत 20,999 हजार रूपये आहे. 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या टॉप-एंड व्हेरिएंटची किंमत 22,999 आहे. तसेच हा फोन खरेदी करताना निवडक बँक कार्ड्सवर तुम्हाला 1,500 पर्यंतचा इन्स्टंट कॅशबॅक देखील मिळेल. स्पर्धेच्या बाबतीत हा नवीन विवो फोन मोटोरोला एज 60 फ्यूजन 5G, मोटोरोला जी67 पॉवर 5G आणि रियलमी पी4एक्स 5G यांच्याशी स्पर्धा करतो.

भारतातील विवो Y11 5G ची किंमत

4GB रॅम आणि 64GB व्हेरिएंटची किंमत 14,999 रूपये आहे. 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या टॉप व्हेरिएंटची किंमत 16,999 आहे. निवडक बँक कार्ड्सवर 1,000 रूपयापर्यंतचा कॅशबॅक देखील उपलब्ध आहे.

दोन्ही स्मार्टफोन्स कंपनीच्या वेबसाइटसोबतच फ्लिपकार्टवरही उपलब्ध आहेत. Y21 5G शॅम्पेन गोल्ड आणि मिडनाईट ब्लू रंगांमध्ये, तर Y11 5G सनराईज गोल्ड आणि मिडनाईट ब्लू रंगांमध्ये उपलब्ध आहे. स्पर्धेच्या बाबतीत हा फोन पोको एम7 प्लस 5G आणि ओप्पो के14एक्स 5G सारख्या स्मार्टफोन्सशी स्पर्धा करतो.

Vivo Y11 5G आणि Vivo Y21 5G वैशिष्ट्ये

ओएस: हे दोन्ही ड्युअल सिम फोन विवोच्या अँड्रॉइड 16 वर आधारित ओरिजिनओएस 6 वर चालतात.

डिस्प्ले: दोन्ही फोनमध्ये 6.74-इंचाचा एचडी प्लस एलसीडी टचस्क्रीन आहे, जो 120Hz पर्यंतचा रिफ्रेश रेट आणि 1200 nits पर्यंतची पीक ब्राइटनेस सपोर्ट करतो.

आयपी रेटिंग: हे हँडसेट धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी आयपी65 रेटिंगसह येतात आणि त्यांना एसजीएस-प्रमाणित लष्करी दर्जाचे धक्के सहन करण्याचे संरक्षणही आहे.

चिपसेट: यामध्ये वेग आणि मल्टीटास्किंगसाठी मीडियाटेक डायमेन्सिटी 6300 ऑक्टा कोअर चिपसेट आहे.

कॅमेरा: या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. Y21 5G मध्ये 50-मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आहे, तर Y11 5G मध्ये 13-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 5-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

बॅटरी: Vivo Y21 5G आणि Vivo Y11 5G मध्ये 6500mAh क्षमतेची बॅटरी आहे, जी 44W आणि 15W वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते.

कनेक्टिव्हिटी: या फोनमध्ये 5G, Wi-Fi, 4G LTE, ब्लूटूथ आवृत्ती 5.4, GPS आणि एक USB टाइप-C पोर्ट आहे. सुरक्षेसाठी बाजूला फिंगरप्रिंट सेन्सर दिलेला आहे.

Follow Us
काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? ठाकरेंच्या आंदोलनावर...
Breaking | काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनावर उदय सामंतांचा घणाघात!
धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! अन् पुढे जे झालं....
Tree Collapse Mumbai | धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; निष्काळजीपणामुळे आणखी एकाचा बळी
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला जीव
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला 2 वर्षांच्या सोहमचा जीव
मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
ब्रेकिंग! मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील दुपारच्या सत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
Rain Update | पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
उद्धव ठाकरे पुन्हा हिंदुत्वाच्या रणांगणात! पत्रकार परिषदेत मोठी घोषणा
Uddhav Thackeray UNCUT | उद्धव ठाकरे पुन्हा हिंदुत्वाच्या रणांगणात! पत्रकार परिषदेत मोठी घोषणा; येत्या रविवारी...
अमित साटम की चाटम? साटम यांच्या हकालपट्टीची थेट संजय राऊतांकडून मागणी!
Sanjay Raut Press | अमित साटम की चाटम? मृत्यूंवर हसणं महागात पडणार; अमित साटम यांच्या हकालपट्टीची थेट संजय राऊतांकडून मागणी!
महाराष्ट्रात लागू होणार समान नागरी कायदा? अधिवेशनाकडे राज्याचे लक्ष
महाराष्ट्रात लागू होणार समान नागरी कायदा? फडणवीस सरकारच्या मोठ्या हालचाली सुरू; आजच्या अधिवेशनाकडे राज्याचे लक्ष
पालखीपूर्वी इंद्रायणीला प्रदूषणाचा विळखा! वारकऱ्यांचा संताप अनावर
Indrayani River | पालखीपूर्वी इंद्रायणीला प्रदूषणाचा विळखा! फेसाळलेल्या नदीने वारकऱ्यांचा संताप अनावर
कोल्हापूरमध्ये धोक्याची घंटा! पंचगंगा दुथडी भरून वाहतेय; 3 बंधारे...
Kolhapur Rain Update | कोल्हापूरमध्ये धोक्याची घंटा! पंचगंगा दुथडी भरून वाहतेय; 3 बंधारे पाण्याखाली, नागरिकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास सुरूच...