AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Perplexity AI : Meta आणि Apple या टेक जायंट्सना वेडावणारी स्टार्टअप, खरंच बनणार का OpenAI ची टक्कर?

AIच्या जगात झपाट्याने उभरत असलेली Perplexity AI ही स्टार्टअप कंपनी सध्या तंत्रज्ञान क्षेत्रात चर्चेचा विषय ठरत आहे आणि विशेष म्हणजे, Meta आणि Apple सारख्या दिग्गज कंपन्या Perplexity AI विकत घेण्यासाठी उत्सुक आहेत. नेमकं काय खास आहे या स्टार्टअपमध्ये आणि ती OpenAI ला खरंच स्पर्धा देऊ शकते का? जाणून घ्या सविस्तर.

Perplexity AI : Meta आणि Apple या टेक जायंट्सना वेडावणारी स्टार्टअप, खरंच बनणार का OpenAI ची टक्कर?
ai
| Edited By: | Updated on: Jul 07, 2025 | 4:57 PM
Share

सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) जगतात मोठी खळबळ उडवून देणाऱ्या कंपन्यांमध्ये एक नाव वेगाने पुढे येत आहे Perplexity AI. ही कंपनी 2022 मध्ये अमेरिकेतील San Francisco येथे सुरू झाली आणि अवघ्या काही वर्षांत ती टेक क्षेत्रातली लक्षवेधी ताकद ठरू लागली आहे. आता ही कंपनी इतकी चर्चेत आहे की Meta आणि Apple सारख्या महाकाय कंपन्या तिला विकत घेण्यासाठी उत्सुक आहेत.

Perplexity म्हणजे काय?

Perplexity ही फक्त एक Chatbot नाही, तर ती एक Conversational Search Engine आहे जी Google किंवा Bing प्रमाणेच वापरली जाते, पण वेगळी गोष्ट म्हणजे ती कोणतेही जाहिरात दाखवत नाही आणि थेट स्रोतांसह संक्षिप्त, अचूक उत्तरं देते. Perplexity दर महिन्याला जवळपास 780 दशलक्ष सर्च क्वेरीज हाताळते आणि दर महिन्याला 20% वाढ अनुभवते. म्हणजेच, वापरकर्त्यांचा विश्वास आणि वापर सतत वाढतो आहे.

याच कंपनीने अलीकडेच Comet नावाचं एक AI-बेस्ड ब्राउजर असिस्टंट देखील लाँच केलं आहे, जे ऑनलाइन शॉपिंग, ईमेल व्यवस्थापन आणि वेबपेज सारांश तयार करण्यात मदत करतं.

Meta आणि Apple का आहेत एवढे उत्सुक?

Meta (पूर्वीची Facebook) हे आधीपासूनच WhatsApp, Instagram आणि Facebook या सर्व प्लॅटफॉर्म्समध्ये AI मोठ्या प्रमाणावर वापरत आहे. त्यांनी नुकताच Scale AI मध्ये 14.3 अब्ज डॉलर्स गुंतवणूक केली आहे. याशिवाय, Meta ने स्वतःचा AI मॉडेल LLaMA 4 देखील सादर केला आहे, पण त्याला अपेक्षित यश अद्याप मिळालेलं नाही. अशा वेळी, Perplexity सारख्या यशस्वी आणि झपाट्याने वाढणाऱ्या कंपनीला विकत घेणे Meta साठी एक उत्तम पर्याय असू शकतो.

दुसरीकडे Apple नेही आपल्या सिस्टममध्ये AI आणण्याची गती वाढवली आहे. विशेषतः Apple Intelligence आणि Siri मध्ये सुधारणा करताना, त्यांना अशा AI टेक्नोलॉजीचा आधार लागेल जो वापरकर्त्याच्या गरजेनुसार अधिक संवादक्षम आणि बुद्धिमान उत्तरं देईल जे काम Perplexity सहज करू शकते.

सध्या कोणताही व्यवहार निश्चित झालेला नसला, तरी उद्योगवर्तुळात जोरदार चर्चा आहे की 2025 च्या उत्तरार्धात Perplexity चा भाग कोण होणार Meta की Apple?

आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?.
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका.
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?.