Vibe Coding म्हणजे काय रे..! आयटी सेक्टरमध्ये नव्या प्रोगॅमिंगमुळे बदलाचे वारे, का ते समजून घ्या
तंत्रज्ञानाच्या युगात झपाट्याने बदल होताना दिसत आहे. आज वापरत असलेलं तंत्रज्ञान काही दिवसात बदलेलं दिसतं. सध्या तंत्रज्ञानाच्या युगात एआयने क्रांती घडवली आहे. त्यातच वाईब कोडिंगची आयसी सेक्टरमध्ये चर्चा रंगली आहे. येणाऱ्या काळात याचे फायदे आणि तोटे असतील असं काही जणांचं म्हणणं आहे.

21वं शतक हे तंत्रज्ञानाचं युग आहे असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. 21 व्या शतकात अनेक शोध लागले. त्यामुळे मानवी जीवन सुसह्य झाल्याचं पाहायला मिळत आहे. प्रत्येकाच्या हाती असलेला स्मार्टफोनने मागच्या 15 वर्षात कात टाकत एक उंची गाठली. त्यामुळे बऱ्याच गोष्टी चुटकीसरशी सोप्या झाल्या आहेत. स्मार्टफोन आणि लॅपटॉप वापरकर्ते अॅप, वेबसाईट वापरतात. त्यामुळे कामं आणखी सोपी झाल्याचं पाहायला मिळत आहे. पण हे अॅप्स आणि वेबसाईट डिझाईन करण्यासाठी कोडिंग केली जाते. कोडिंग हा शब्ध तुम्ही अनेकदा तुमच्या आयटी सेक्टरमध्ये काम करत असलेल्या मित्र किंवा नातेवाईकाकडून ऐकला असेलच. तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमध्ये वापरत असलेलं अॅप्सदेखील या कोडिंगच्या माध्यमातून तयार केलेलं असतं. पण या कोडिंगमध्येही क्रांतीकारक बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेंस अर्थात एआयमुळे कोडिंग क्षेत्रात मोठा बदल झाल्याचं दिसत आहे. नवीन पद्धतीला वाइब कोडिंग असं संबोधलं जातं. आयटी सेक्टरमध्ये या कोडिंगची लोकप्रियता वाढल्याचं दिसत आहे. नेमकं वाइब कोडिंग म्हणजे काय त्याचा आयटी सेक्टरमध्ये काय बदल झाला ते जाणून घ्या. ...