Alcohol Effects: घाबरु नकोस, कार तुझा भाऊ चालवणार…दारु पिल्यानंतर का वाढतो कॉन्फिडन्स, शरीरात कसा होतो केमिकल लोचा?
Alcohol Effects: अनेकदा दारु चढल्यानंतर मित्रांचे अतरंगी कारनामे आणि त्यांचं खरं रूप समोरं येतं. काही जण उजळणी म्हणतात. तर काही जण एकच वाक्य वारंवार म्हणतात. तर काही जण कार, बाईक सुसाट चालवण्याचा हट्ट धरतात. काही जण विचित्र इरेला पेटतात. कुठून येतो त्यांच्यात इतका कॉन्फिडन्स?

Alcohol Effects: प्रत्येकाच्या आयुष्यात मित्राला अनन्यसाधारण महत्त्व असते. काही जण आठवड्याच्या अखेरीस हमखास दारुची पार्टी करतात. त्यात मग यांचे अतरंगी कारनामे सुरू होतात. कुणी रडतं, तर कुणी उजळणी म्हणतं. कुणी काही करतं. अजून एक बाब म्हणजे दारु चढल्यावर अनेकजणांना कार, बाईक सुसाट दामटायची असते. ज्यांना स्वतःचा तोल सावरता येत नाही. ते कार चालवण्याचा तोऱ्यात असतात. कुठून येतो त्यांच्यात इतका कॉन्फिडन्स, आत्मविश्वास? तुम्हाला हा प्रश्न हसता हसता भेडसावतोय का? काय आहे नेमका केमिकल लोचा?
तर हे आहे नेमकं कारण?
तर दारु मेंदूला रासायनिक संदेशावाहक न्यूरोट्रांसमीटरमध्ये बदल करते. त्यामुळे तोल ढासळतो. भावनिक आवेग येतो. व्यवहार बदलतो. सुखाचा-दुःखाचा उमाळा येतो. सगळं रंग एकदाच निखरून बाहेर येतात. व्यक्तीच्या प्रतिक्रियेवर लागलीच परिणाम होतो. मद्यपीच्या विचार प्रक्रियेवर त्याचा परिणाम होतो. त्यांना तंद्री लागते. मग पुन्हा हुक्की येते. काही तरी चमत्कारीक वागणूक सुरु होते. या सर्व प्रक्रियेत आपण दारुच प्यायलो नाही. अथवा आपल्याला दारु चढलीच नाही हा दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू होतो आणि मग क्रॉस कनेक्शन वाढते. सिग्नल मेंदूपर्यंत नीट पोहचत नाही आणि व्यक्ती अधिकाधिक आत्मविश्वास असल्याचे भासवू लागतो. म्हणजे हा कॉन्फिडन्स ढोंगी असतो, तो न्युरोकेमिकलमुळे तयार होतो. मद्यपीला शंभर हत्तीचं बळ आल्याचे जाणवत असतं. पण प्रत्यक्षात त्याचा झोक जात असतो.
मेंदूच्या या भागावर परिणाम
तर दारु प्रीफ्रिंटल कोर्टेक्स ही प्रक्रिया कमी करते. त्यामुळे मेंदूतील ज्या भागावर निर्णय घेणे, अंदाज बांधणे, तर्क लढवणे आणि स्वतःवरील नियंत्रण सुटते. दारु शरीरातील GABA चा परिणाम वाढवते. दारू जशजशी भिनते मेंदू शांत होत जातो. भीती दूर होते. सत्य-असत्याचा भेद कमी होतो. भावनाउद्रेक होतो. व्यक्ती एखाद्या ट्रान्समध्ये अडकते अथवा निर्धास्त होते. त्यामुळेच मग ते वाहन चालवण्याचा अथवा दरडावून बोलण्याचा प्रयत्न करतात. अशावेळी मेंदूपेक्षा मद्यपी हे मनाने अधिक हळवे होतात आणि मग त्यांचा ओव्हर कॉन्फिडन्स आपल्याला जाणवू लागतो.
