WhatsApp वर फक्त ‘हे’ नंबर करा सेव्ह, रेल्वे तिकीट बुकिंगपासून ते जेवणापर्यंत व वैद्यकीय सेवेचाही मिळेल लाभ

तुम्हीही रेल्वेने प्रवास करत असाल तर हे तीन नंबर तुमच्या व्हॉट्सॲपवर कायमचे सेव्ह करा. हे तीन नंबर तुमचा रेल्वेचा प्रवास सुखकर करतील. या नंबरच्या त्यांच्या माध्यमातून तुम्ही जेवण मागवू शकता, डॉक्टरांची ट्रीटमेंट आणि तिकिटे बुक करू शकता.

WhatsApp वर फक्त ‘हे’ नंबर करा सेव्ह, रेल्वे तिकीट बुकिंगपासून ते जेवणापर्यंत व वैद्यकीय सेवेचाही मिळेल लाभ
WhatsApp
Follow us
| Updated on: Jan 19, 2025 | 3:21 PM

अनेकदा बाहेरच्या लांब पल्ल्याचा प्रवास करण्यासाठी बहुतेकजण रेल्वेने प्रवास करण्याचा पर्याय निवडतात. तुम्ही सुद्धा गावी जाताना किंवा बाहेर फिरायला जाताना रेल्वेने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुम्हाला आता रेल्वेचा आरामदायी प्रवास करता येणार आहे. तसेच रेल्वेतील सगळ्या सेवा या अगदी सहज मिळू शकतात. आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे, तर याच विषयी माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. तुम्हाला फक्त हे तीन WhatsApp नंबर तुमच्या फोनमध्ये सेवा करून ठेवावे लागतील. ते तुम्हाला प्रवास करताना खूप उपयुक्त ठरतील. रेल्वेचे तिकीट बुक करण्यापासून ते ट्रेनमध्ये बसून जेवण मागवण्यापर्यंत तसेच तुम्हाला प्रवास करताना काही दुखापत किंवा आजारी पडल्यास डॉक्टरांना फोन करण्यापर्यंत तुमची सर्व कामे या तीन नंबरच्या सहाय्याने केली जाणार आहे. तर हे तीन नंबर तुमचा जीव आणि वेळ हे दोन्ही वाचवू शकतात. आता या तीन WhatsApp नंबरचा तपशील आणि तुम्ही त्याचा वापर कसा करू शकता, याविषयी माहिती जाणून घेऊयात.

WhatsApp वर हे तीन नंबर सेव्ह करा

9881193322 : WhatsAppच्या माध्यमातून रेल्वे तिकीट बुक करायचे असेल तर हा नंबर फोनमध्ये सेव्ह करा. या नंबरवरून तुम्ही ट्रेनचे तिकीट बुक करू शकता. तुम्ही ट्रेनचे पीएनआर स्टेटस तपासू शकता. तुम्ही ट्रेनचे लाईव्ह स्टेटस पाहू शकता. याव्यतिरिक्त, तुम्ही ट्रेनचे वेळापत्रक इत्यादी तपासू शकता.

हे सुद्धा वाचा

8750001323 : ट्रेनमध्ये बसून भूक लागली तर काळजी करू नका, तुम्ही सीटवर बसून जेवण मागवू शकता. यासाठी तुम्हाला फक्त हा नंबर तुमच्या फोनमध्ये सेव्ह करावा लागेल. त्यानंतर तुम्हाला WhatsApp वर मेसेज पाठवावा लागेल. ऑन-स्क्रीन सूचना आणि प्रश्नांची उत्तरे देऊन तुम्ही जेवण ऑर्डर करू शकता.

138 : ट्रेनमध्ये तुमची किंवा इतर कोणाची तब्येत बिघडली तर या नंबरच्या माध्यमातून डॉक्टरची सेवा मिळू शकते. अगदी पुढच्या स्टेशनवर तुम्हाला डॉक्टरांची टीम सापडेल. जे तुमच्या गरजेनुसार आणि परिस्थितीनुसार तुम्हाला हाताळतील.

ही प्रक्रिया जाणून घ्या

हे WhatsApp नंबर सेव्ह केल्यानंतर तुम्हाला WhatsApp वरील चॅट सेक्शनमध्ये जाऊन हायचा मेसेज पाठवावा लागेल. यानंतर तुम्हाला सर्व्हिस ऑप्शनचा मेसेज येईल. त्यातून तुम्हाला हवी ती सेवा निवडता येईल. तुम्हाला ऑन स्क्रीन सूचनांचे पालन करावे लागेल, त्यानंतर तुमचे काम पूर्ण होईल. रेल्वेनं प्रवास करताना ही माहिती कामात येऊ शकते. त्यामुळे ही माहिती सेव्ह करा.

'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?
'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?.
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी.
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला.
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका.
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा.
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ.
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री.
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?.
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले...
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले....