Whatsapp : सावधान! ‘या’ नंबरवरुन येणार 25 लाखांच्या लॉटरीचा कॉल, आता काय करायचं ते जाणून घ्या….

25 लाखांची लॉटरी तसेच इतर लोभी व्हॉट्सअ‍ॅप संदेशांना बळी पडू नये. घोटाळेबाजांना या युक्त्यांमधून बँक तपशील आणि वापरकर्त्यांची इतर महत्त्वाची माहिती मिळते. याविषयी तुम्ही अधिक तपशिलवार जाणून घ्या...

Whatsapp : सावधान! 'या' नंबरवरुन येणार 25 लाखांच्या लॉटरीचा कॉल, आता काय करायचं ते जाणून घ्या….
WhatsAppImage Credit source: social
Follow us
| Updated on: Aug 01, 2022 | 3:52 PM

नवी दिल्ली :  सायबर गुन्हेगार ऑनलाइन फसवणूक करण्यासाठी अनेक पद्धतींचा अवलंब असतात. अनेक घोटाळेबाज देखील बिनदिक्कतपणे व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) वापरतात. त्यामाध्यमातून फसवणूकही करतात. पाकिस्तानी नंबरवरून कॉल किंवा मेसेज (Massage) करणं ही सर्वात जुनी आणि चोरट्यांमधली लोकप्रिय पद्धत आहे. हे सायबर चोरटे Whatsapp युजर्सना (User) मेसेज पाठवतात की युजरला 25 लाखांची लॉटरी लागली आहे. त्याचप्रमाणे 25 लाख रुपयांची लॉटरी जिंकण्यासाठी +92 3208550775 या क्रमांकावरून एका वापरकर्त्याला व्हॉट्सअ‍ॅप संदेश पाठवण्यात आला आहे. हे ठग वापरकर्त्यांना फसवण्यासाठी ऑडिओ मेसेजमध्ये सांगतात की व्हॉट्सअ‍ॅप लॉटरी जिंकल्याचा मेसेज पाठवला आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत असा लोभ टाळावा आणि येथे नमूद केलेली पावलं म्हणजे टीप्स वापरा. तसेच खालील माहिती जाणून घ्या. यामुळे तुम्ही धोक्यापासून म्हणजेच फसवणुकीपासून वाचू शकाल.

काय करावं?

ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारांना आमिष दाखवण्यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी, अभिनेते अमिताभ बच्चन आणि लोकप्रिय शो कौन बनेगा करोडपती यांच्या नावांचाही पोस्टरमध्ये वापर करण्यात आला आहे. त्याचबरोबर विजयी लॉटरीची 25 लाख रुपयांची रक्कम बँक खात्यात हस्तांतरित करण्यासाठी 7098०43909 या क्रमांकावर कॉल करण्याचे सांगण्यात आले आहे. ऑडिओ मेसेजमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की या नंबरवर कोणताही सामान्य कॉल नाही, फक्त व्हॉट्सअ‍ॅप कॉल करावे लागतील.

25 लाखांची लॉटरी तसेच इतर लोभी व्हॉट्सअ‍ॅप संदेशांना बळी पडू नये. घोटाळेबाजांना या युक्त्यांमधून बँक तपशील आणि वापरकर्त्यांची इतर महत्त्वाची माहिती मिळते. अनेक वेळा वापरकर्ते त्यांच्या फसवणुकीला बळी पडतात आणि त्यांचे मोठे नुकसान करतात. तुम्हालाही असे व्हॉट्सअ‍ॅप मेसेज किंवा कॉल येत असतील तर ते टाळण्यासाठी हे उपाय करा.

हे सुद्धा वाचा

हे करा….

  1. कोणत्याही लॉटरी किंवा पैशाचे आमिष दाखवणारे संदेश किंवा कॉलकडे दुर्लक्ष करा.
  2. अनोळखी नंबरवरून येणारे मेसेज किंवा कॉल्सपासून सावध रहा.
  3. तुम्हाला एखादा नंबर संशयास्पद वाटल्यास, तो ताबडतोब ब्लॉक करा.
  4. अशा नंबरची तक्रार करण्याची सुविधाही व्हॉट्सअ‍ॅपने दिली आहे.
  5. तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपवर अशा नंबरची तक्रार करू शकता.
  6. बिगर भारतीय नंबरवरून येणारे व्हॉट्सअ‍ॅप मेसेज वगैरे उघडू नका.
  7. कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका
  8. कधीही कोणाशीही OTP शेअर करू नका.
  9. असे मेसेज अजिबात फॉरवर्ड करू नका.
  10. कोणतीही सायबर फसवणूक झाल्यास, सायबर क्राईम पोर्टलवर त्वरित तक्रार करा.
  11. कोणत्याही लॉटरी किंवा पैशाचे आमिष दाखवणारे संदेश किंवा कॉलकडे दुर्लक्ष करा.
  12. अनोळखी नंबरवरून येणारे मेसेज किंवा कॉल्सपासून सावध रहा.

वरील माहितीमुळे तुमची फसवणूक टळू शकेल.

Non Stop LIVE Update
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय.
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'.
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत.