लॅपटॉपमधील बॅटरी बॅकअपच्या समस्येने त्रस्त आहात? ‘या’ पाच टीप्स येतील कामी, नक्की फॉलो करा!

विंडोज आपल्या युजर्ससमोर विविध पर्याय ठेवत असते. त्यामाध्यमातून तुम्ही तुमची बॅटरी स्टँडबाय आणि तिची लाईफ वाढवू शकतात. आज आपण अशाच काही टीप्स बघणार आहोत; ज्याच्या माध्यमातून विंडोज लॅपटॉपमधील बॅटरीची कार्यक्षमता वाढविण्यास मदत होउ शकते.

लॅपटॉपमधील बॅटरी बॅकअपच्या समस्येने त्रस्त आहात? ‘या’ पाच टीप्स येतील कामी, नक्की फॉलो करा!
Follow us
| Updated on: Aug 01, 2022 | 2:26 PM

मुंबई :  विंडोज ही जगभरात सर्वाधिक वापरली जाणारी ऑपरेटिंग सिस्टम आहे. बहुतेक नवीन लॅपटॉप हे विंडोज 11 (Windows 11) इंस्टॉल केलेले असतात. आजकाल लॅपटॉपचे (Laptop) जवळपास सर्वच जनरेशन दमदार बॅटरीसह उपलब्ध आहेत. पण तरीही त्यांची बॅटरी दिवसभर टिकेल (Battery Life) याची शाश्‍वती नसते. वर्कलोड जास्त असल्यावर बॅटरी लागेच ‘लो’ होते. अशा वेळी युजर्स आवश्‍यक ती कामे वेगाने करु शकत नाही. तसेच चार्जिंग करण्यातही बराच वेळ लागत असतो. अशा वेळी विंडोज आपल्या ग्राहकांना अनेक पर्याय उपलब्ध करतो, ज्याद्वारे युजर्सच्या बॅटरी स्टँडबाय आणि ड्यूरेबिलिटीमध्ये वाढ होते. आज या लेखाच्या माध्यमातून अशाच काही पद्धतींबद्दल सांगत आहोत ज्यामुळे विंडोज लॅपटॉपमधील बॅटरीची लाईफ वाढण्यास मदत होईल.

1) बॅटरी सेव्हर वापरा

जेव्हा बॅटरी सेव्हर चालू असतो, तेव्हा ज्यांच्यात सर्वाधिक विजेचा वापर होत असतो अशा काही गोष्टी तुमचा पीसी तात्पुरत्या बंद करत असतो. यात, ऑटोमॅटीक ईमेल, कॅलेंडर सिंक, लाइव्ह टाइल अपडेट आणि तुम्ही जास्त वापरत नसलेले अॅप्सचा समावेश होत असतो. यासाठी सेटींगमध्ये जाऊन सिस्टीमवर जावे. त्यानंतर पॉवर आणि बॅटरी हा पर्याय निवडा. बॅटरी एका विशिष्ट पातळीपेक्षा कमी झाल्यावर बॅटरी सेव्हर चालू व्हावे, असे तुम्हाला वाटत असल्यास, तुम्हाला बॅटरी सेव्हर निवडावे लागेल. नंतर तुमच्या आवडीची बॅटरी लेव्हल निवडा. पीसी चार्ज होत नाही तोपर्यंत बॅटरी सेव्हर चालू ठेवा.

2) ॲक्टिव परफॉर्मेंससाठी कमी कालावधी निवडा

या ट्रीकमुळे लॅपटॉपची बॅटरी वाचण्यास मदत होते. यामुळे स्क्रीन टाइम बर्‍याच प्रमाणात कमी होतो. यासाठी स्टार्टवर जा आणि नंतर सेटींगवर टॅप करा. त्यानंतर सिस्टमवर जा आणि पॉवर आणि बॅटरी निवडा. नंतर स्क्रीन आणि स्लीप निवडा. बॅटरी पॉवर चालू करण्यासाठी, turn off my screen निवडा.

हे सुद्धा वाचा

3) डिसप्लेचा ब्राइटनेस कमी करा

पहिल्यांदा स्टार्ट आणि नंतर सेटिंग्ज वर जावे. नंतर डिसप्लेवर जाऊन सिंस्टीमवर जा आणि नंतर ब्राइटनेस निवडा.

4) स्क्रीन रिफ्रेश रेट कमी करा

हाय रिफ्रेश रेट डिव्हाइसचा परफॉर्मेंस सुधारतो. परंतु यामुळे बॅटरीचा अधिक वापर होत असतो. स्क्रीन रिफ्रेश रेट कमी करायचा असल्यास, स्टार्टवर जावे. त्यानंतर सेटींग्समध्ये जाऊन सिस्टीमवर जा. त्यानंतर डिसप्लेवर जा आणि नंतर ॲडव्हान्स डिसप्ले निवडावा. नंतर कमी रिफ्रेश दर निवडा.

5) अॅपसाठी कस्टम ग्राफिक्स पर्याय निवडा

पहिल्यांदा स्टार्टवर जा आणि नंतर सेटींग्सवर क्लिक करा. त्यानंतर सिस्टमवर जा आणि डिसप्लेवर जावे. त्यानंतर ग्राफिक्स निवडा. अॅप्ससाठी कस्टम पर्यायाअंतर्गत अॅप निवडा आणि नंतर पर्याय निवडा. त्यानंतर पॉवर सेव्हिंग निवडा.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.