Whatsapp Down | व्हॉट्सअ‍ॅपमध्ये तांत्रिक बिघाड, Last seen सह Privacy Settings मध्ये समस्या

सर्वसामान्य लोकांच्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य घटक असलेलं व्हॉट्सअ‍ॅपमध्ये तांत्रिक बिघाड झाला (Whatsapp Down India) आहे.

Whatsapp Down | व्हॉट्सअ‍ॅपमध्ये तांत्रिक बिघाड, Last seen सह Privacy Settings मध्ये समस्या

नवी दिल्ली : सर्वसामान्य लोकांच्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य घटक असलेलं व्हॉट्सअ‍ॅपमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या Privacy Settings सह Last seen मध्ये समस्या निर्माण झाली आहे. भारतातील हजारो युजर्सला याचा फटका बसत आहे. WABetaInfo याबाबतची माहिती दिली. (Whatsapp Down India)

WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, भारतात रात्री 8.39 पासून Privacy Settings अपड़ेट करण्यास युजर्सला समस्या निर्माण होत आहेत. अनेकांना ट्विटरसह सोशल मीडियावर याबाबतची तक्रार दाखल केली आहे. अनेक व्हॉट्सअ‍ॅप युजर्सचे Last seen ही जवळपास 8.30 ते 8.45 दरम्यानचे दाखवत आहेत.

त्याशिवाय अनेक व्हॉट्सअ‍ॅप युजर्सला Privacy Settings मध्ये कोणतेही बदलाव करता येत नाही आहे.

व्हॉट्सअ‍ॅप डाऊन झाल्यावर युजर्सनी ट्विटरवर याबाबत ट्रेंड सुरू केला आहे. #whatsappdown यावर अनेक युजर्स आपली नाराजी व्यक्त करत आहे. तसेच यावर मीम्सचाही पाऊस पडत आहे. (Whatsapp Down India)

संबंधित बातम्या : 

भारतात व्हॉट्सअॅप डाऊन, फोटो, व्हिडीओ शेअर करताना युजर्सला अडचणी

लॉकडाऊनदरम्यान Whatsapp कडून युझर्ससाठी नवं फीचर लाँच

Published On - 10:48 pm, Fri, 19 June 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI