आता WhatsApp चॅटिंगची रंगत वाढणार; नवं फीचर येतंय!

आता WhatsApp ने नवीन Sticker Shortcut नावाचं फीचर देण्याची तयारी केली आहे. WhatsApp चं हे फीचर लवकरच ग्लोबल युझर्सला रोलआउट केलं जाऊ शकतं

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 13:01 PM, 25 Jan 2021
आता WhatsApp चॅटिंगची रंगत वाढणार; नवं फीचर येतंय!
Whatsapp chatting New Feature

नवी दिल्ली : WhatsApp ने युझर्सच्या चॅटिंग एक्सपिरिअन्सला आणखी चांगलं करण्यासाठी नव-नवीन फीचर्स (WhatsApp Sticker Shortcut Feature) लॉन्च करत असतो. आता WhatsApp ने नवीन Sticker Shortcut नावाचं फीचर देण्याची तयारी केली आहे. WhatsApp चं हे फीचर लवकरच ग्लोबल युझर्सला रोलआउट केलं जाऊ शकतं (WhatsApp Sticker Shortcut Feature).

चॅट बारमध्ये नवीन फीचर दिसणार

WhatsApp मध्ये येणारे स्टीकर शॉर्टकट फीचर ची माहिती WABetaInfo ने दिली. रिपोर्टच्या माहितीनुसार, हे फीचर चॅट बारमध्ये दिसेल, रोलआऊट झाल्यानंतर युझर्सला चॅट बारमध्ये इमोजी एंटर करणे किंवा कुठला शब्द लिहिण्यासाठी वेगळे रंग असलेले आयकॉन दिसतील. तर, कीबोर्डला एक्सपान्ड करण्यावर WhatsApp चे सर्व स्टीकर दिसतील.

WABetaInfo नुसार, कंपनीने या फीचरला सध्या अँड्रॉईड डिव्हायसेससाठी तयार करत आहे. लवकरच या फीचरला WhatsApp Beta युझर्ससाठी रोलआऊट केलं जाऊ शकतं (WhatsApp Sticker Shortcut Feature).

नवीन स्टीकर पॅक रिलीज

स्टीकर शॉर्टकट शिवाय कंपनीने अँड्रॉईड आणि iOS बेस्ड अॅप्ससाठी नवीन अॅनिमेटेड स्टीकर पॅकला रिलीज केलं. हे फीचर WhatsApp Web साठी उपलब्ध आहेत. 2.4MB च्या साईज असलेल्या स्टीकर पॅकचं नाव Sumikkogurashi आहे. जगभरात WhatsApp युझर या फीचरला WhatsApp स्टीकर स्टोअरमधून डाउनलोड केलं जाऊ शकतं.

WhatsApp Sticker Shortcut Feature

संबंधित बातम्या :

WhatsApp, Signal, Telegram सारख्या 15 मेसेजिंग प्लॅटफॉर्मवरील मेसेजला एकाच अ‍ॅपने रिप्लाय करा

प्रायव्हसी पॉलिसीवर मोदी सरकारच्या कठोर भूमिकेनंतर WhatsApp चं मोठं वक्तव्य; कंपनी म्हणते…

WhatsApp | माहिती लीक होण्याची भीती? असा करा व्हॉट्सअ‍ॅपचा जुना डेटा डिलीट…

Privacy भंग होत असल्यास WhatsApp डिलीट करा : दिल्ली हायकोर्ट

WhatsApp विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका, नवे गोपनीयता धोरण बरखास्त करण्याची मागणी