WhatsApp युजर्ससाठी भन्नाट फीचर, आता इमेजवरून टेक्स कॉपी करणं एकदम सोपं

व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. व्हॉट्सअ‍ॅप सुरु झाल्यापासून आतापर्यंत अनेक बदल कंपनीने केले आहेत. आता त्यात एका नव्या फीचर्सची भर पडणार आहे.

WhatsApp युजर्ससाठी भन्नाट फीचर, आता इमेजवरून टेक्स कॉपी करणं एकदम सोपं
WhatsApp चं नवं फीचर, आता फोटोवरील टेक्स कॉपी करा एका क्लिकवर
Follow us
| Updated on: Mar 18, 2023 | 4:09 PM

मुंबई : व्हॉट्सअ‍ॅप हे सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप आहे. स्मार्टफोन असलेल्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आपल्याला हे अ‍ॅप पाहायला मिळेल. जगभरात या अ‍ॅपचे कोट्यवधी युजर्स आहेत. व्हॉट्सअ‍ॅप लाँच झाल्यापासून आतापर्यंत यात काळानुरूप बरेच बदल झाले आहेत. युजर्सच्या दृष्टीकोनातून कंपनी यात नवनवे प्रयोग करत असते. व्हॉट्सअ‍ॅप हा आता आपल्या रोजच्या जीवनाचा भाग झाला आहे, असं म्हणायला हरकत नाही. आता मेटा कंपनीच्या मालिकीच्या व्हॉट्सअ‍ॅपमध्ये युजर्स फोटोतून टेक्स्ट वेगळे करू शकतो. चला कसं ते जाणून घेऊयात.

WhatsApp Text Detection Feature

व्हॉट्सअॅपच्या नव्या फीचरमध्ये युजर्स फोटोवर लिहिलेले टेक्स्ट रिमुव्ह करू शकतात. टेक्स्ट कॉपी करायचं असेल तर एक ऑप्शन दिलं आहे. एका ऑप्शनवर क्लिक करताच फोटोवरील टेक्स्ट गायब होईल आणि ते टेक्स्ट कॉपी देखील करू शकता. पण हे फीचर View Once मोडवर सेंड केलेल्या फोटोला सपोर्ट करत नाही. म्हणजेच फोटोवरून टेक्स्ट कॉप करता येणार नाही.

हे फीचर आयओएस वर्जन आणि बीटा वर्जन सुरु केलं आहे. ज्या लोकांकडे 23.5.77 वर्जन अपडेट केलेलं आहे. त्यांनाच या फीचर्सचा फायदा घेता येईल. व्हॉट्सअ‍ॅपचे सिलेक्टेड युजर्स ज्यांनी आयओएस 23.1.0.73 वर्जन अपडेट केलं आहे. त्यांनाही या फीचरचा वापर करता येईल. लवकरच हे फीचर अँड्रॉईड युजर्ससाठी सुरु केलं जाईल.

व्हॉट्सअ‍ॅपनं नुकतंच स्टीकर मेकर टूल आणि व्हॉईस स्टेटस अपडेट फीचर सुरु केलं होतं. स्टिकर मेकर टूल्सने युजर्स आपल्या आवडीचे स्टीकर्स बनवू शकतात. या व्यतिरिक्त युजर्स आपल्या आवाजात व्हॉईस रेकॉर्ड करून स्टेटसला ठेवू शकतात. हे दोन्ही फीचर्स आयओएस युजर्ससाठी सुरु आहेत.

दुसरीकडे, आता नवे फीचर व्हॉट्सअ‍ॅप यूजर्ससाठी आणलं जाण्याची शक्यता आहे. Wabetinfo च्या रिपोर्टनुसार, कंपनी चॅट्स आणि ग्रुप्समधील मोबाईल नंबर्सची सिस्टीम बंद करू शकते. या अपडेट अंतर्गत कंपनी मोबाईल नंबरऐवजी यूजरनेम घेऊ शकते. WhatsApp च्या बीटा आवृत्ती 2.22.25.10 मध्ये एक अपडेट दिसून आलं आहे.यामध्ये मोबाईल नंबरऐवजी युजरनेम वापरण्यात आले आहे. अनोळखी नंबरवरून येणारा मेसेज सहज ओळखू शकता येणार आहे. कारण नंबरऐवजी नाव दिसेल.

व्हॉट्सअ‍ॅप युजर्स

व्हॉट्सअ‍ॅप हे 100 हून अधिक देशांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय मेसेंजिंग अ‍ॅप आहे. जगभरात व्हॉट्सअ‍ॅपचे 2.24 बिलियन अ‍ॅक्टिव्ह युजर्स आहेत. व्हॉट्सअ‍ॅपवर 2016 ते 2020 या कालावधीत 1 बिलियन युजर्स जॉईन झाले. 100 बिलियन मेसेज दिवसाला फॉरवर्ड आणि रिसिव्ह केले जातात. जगभराच्या आकडेवारीनुसार भारतात व्हॉट्सअ‍ॅपचे सर्वाधिक युजर्स आहेत. भारतात 487.5 मिलियन व्हॉट्सअ‍ॅप युजर्स आहेत.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.