Jio, Airtel, Vi आणि BSNL मधील सर्वात स्वस्त प्लॅन कोणाकडे? जाणून घ्या
देशातील प्रमुख टेलिकॉम कंपन्या त्यांचे यूजर्स वाढवण्यासाठी अनेक योजना लाँच करत असतात. त्यातील काही प्लॅन हे स्वस्त असतात तर काही महाग असतात. तुमचे सिम सक्रिय ठेवण्यासाठी तुम्ही किती रूपयांची योजना निवडू शकता हे जाणून घेऊयात...

आपल्या देशातील प्रमुख टेलिकॉम कंपन्या त्यांचे यूजर्स वाढविण्यासाठी अनेक नवनवीन प्लॅन लाँच करत असतात. जेणेकरून त्यांच्या यूजर्सला या प्लॅनचा अधिक फायदा होईल. तसेच यूजर्सचा आधार वाढवण्यासाठी अनेक योजना सुरू करतात, त्यापैकी काही प्लॅन हे डेटावर लक्ष केंद्रित करतात, तर काही प्लॅनच्या वैधतेवर आधारित असतात. आतापर्यंत, फक्त Jio, Airtel आणि Vi सारख्या खाजगी कंपन्या डेटा आणि वैधतेवर लक्ष केंद्रित करीत होत्या, परंतु आता सरकारी कंपनी BSNL देखील त्यांचे मार्केट वाढवण्यासाठी अनेक प्लॅन लाँच करत आहे. अशातच या सर्व कंपन्यांपैकी तूमचा सिम सक्रिय ठेवण्यासाठी कमीत कमी किती पैसे द्यावे लागतील आणि कोणत्या कंपनीचा सर्वात स्वस्त प्लॅन आहे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
jio चा स्वस्त प्लॅन
रिलायन्स जिओने 2025 मध्ये तुमचे सिम सक्रिय ठेवण्यासाठी किमान 189 रुपयांचा कमी किंमत असलेला रिचार्ज प्लॅन जारी केला आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला २८ दिवसांची वैधता मिळते. यासोबतच कंपनी या ऑफरसह यूजर्सना अमर्यादित व्हॉइस कॉल, 300 एसएमएस आणि 2GB डेटा ऑफर करते.




Airtelचा स्वस्त प्लॅन
एअरटेलच्या ग्राहकांना 199 रुपयांचा हा परवडणारा प्लॅन आहे, ज्यामध्ये कंपनी 28 दिवसांच्या वैधतेसह अमर्यादित कॉल, 100 एसएमएस आणि 2GB डेटा देते. यामध्ये जिओपेक्षा एसएमएस सुविधा अधिक उपलब्ध आहे.
BSNLचा सर्वात स्वस्त प्लॅन
तुम्ही जर जास्त इंटरनेट वापरत नसाल आणि तुमचे सिम सक्रिय ठेवायचे असेल तर तुम्ही BSNLचा 59 रुपयांचा प्लॅन निवडू शकता. यामध्ये तुम्हाला 7 दिवसांची वैधता मिळेल आणि 1GB डेटा देखील मिळेल. याशिवाय बीएसएनएलचा 99 रुपयांचा प्लॅनही आहे.
Vi चा परवडणारा प्लॅन
तुम्ही Viचे सिमकार्ड 99 रुपयांमध्ये ॲक्टिव ठेवू शकता, परंतु तुम्हाला या प्लॅनमध्ये कमी सुविधा मिळतात. या प्लॅनमध्ये आउटगोइंग एसएमएस सेवा देखील उपलब्ध नाही. जर तुम्हाला फक्त सिमवर सेवा चालू ठेवायची असेल तर तुम्ही ही योजना निवडू शकता.