सेडान की एसयुव्ही? कोणती कार आहे अधिक किफायतशीर, जणून घ्या महत्त्वाचा फरक
तुम्हाला SUV आवडते की सेडान? आज आम्ही तुम्हाला याचविषयी माहिती सांगणार आहोत. भारतात बाईक तसेच कार प्रेमींची कमतरता नाही. बाजारपेठेतील सर्वच गाड्यांचे ग्राहक वेगवेगळे असतात, पण बहुतांश भारतीय एसयूव्हीपेक्षा सेडानला प्राधान्य देतात.

तुम्हाला कार घ्यायची आहे का? असं असेल तर यापूर्वी तुम्हाला SUV आवडते की सेडान? हे आधी माहिती असणं गरजेचं आहे. तसेच या दोन्हीत नेमका कोणता फरक आहे, हे जाणून घेतल्यास अनेक गोष्टी सोप्या होतील. SUV आणि सेडान, याविषयी जाणून घेऊया.
भारतात कार खरेदी करणे हे प्रत्येक माणसाचे सर्वात मोठे स्वप्न असते, ते पूर्ण करण्यापूर्वी तो भरपूर वाहनांचा शोध घेतो, परंतु बहुतेक लोक सेडान कारला प्राधान्य देतात. यामागे अशी अनेक कारणं आहेत, जी बहुतांश लोकांना माहित नसतील. चला तर मग जाणून घेऊया यामागचं खास कारण.
फीचर्स
सेडान कार सामान्यत: अधिक स्टायलिश आणि आरामदायक मानल्या जातात. त्यांच्याकडे अधिक लेगरूम आणि रायडिंगसाठी चांगली जागा आहे, जी लॉग ड्राइव्ह दरम्यान आरामदायक अनुभव देते. रस्त्यावर ही सेडान अधिक सुंदर दिसते, जी भारतीय ग्राहकांना खूप आवडते.
भारतातील बहुतांश रस्त्यांवर खड्डे आहेत. अशावेळी ग्राऊंड क्लिअरन्स कमी असतानाही धक्के सहन करण्याची ताकद असणारी कार हवी. सेडान कार हे काम अधिक चांगल्या प्रकारे करते. सिटी ड्रायव्हिंगसाठी या कार चांगल्या असून ट्रॅफिकमध्ये सहज धावू शकतात, असा विश्वास भारतीय ग्राहकांनी व्यक्त केला आहे.
इंधन क्षमता
एसयूव्हीचे वजन सेडानपेक्षा जास्त असते, ज्यामुळे त्यांची इंधन क्षमता कमी होऊ शकते. सेडानमध्ये इंधनाची कार्यक्षमता जास्त असते, जी भारतीय ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बाब आहे, विशेषत: जेव्हा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत. एसयूव्हीच्या किंमती सहसा सेडानपेक्षा जास्त असतात, ज्यामुळे भारतीय ग्राहक अधिक परवडणारा पर्याय म्हणून सेडानला प्राधान्य देतात. विशेषत: मिड सेगमेंट आणि लोअर सेगमेंट कारमध्ये सेडानला मोठी मागणी आहे.
लॉग ड्राइव्ह
बऱ्याच भारतीय कुटुंबांसाठी एक चांगला पर्याय सिद्ध होतो कारण ते रायडिंगसाठी भरपूर जागा प्रदान करते आणि लॉग ड्राइव्हसाठी आरामदायक आहे. याशिवाय हे कुटुंबासाठी प्रीमियम पर्याय म्हणूनही काम करते, ग्राहकांना उत्तम अनुभव देते.
रस्त्यावर ही सेडान अधिक सुंदर दिसते, जी भारतीय ग्राहकांना खूप आवडते. तसेच ती अनेकांची पसंतही आहे. आम्ही तुम्हाला एसयूव्ही आणि सेडान, या दोन्हींची माहिती दिली आहे. आता तुम्ही वरील गोष्टींची उजळणी करून तुम्हाला कोणती योग्य वाटते, याचा अंदाज घेऊन वाहन खरेदी करू शकतात.