भारतीय युजर्ससाठी Windows 11 रोलआऊट, तुमच्या PC वर सिस्टिम कशी इन्स्टॉल करणार? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप

मायक्रोसॉफ्टने भारतात विंडोज 11 रोलआउट करण्यास सुरुवात केली आहे. लेटेस्ट सॉफ्टवेअर विंडोज 10 पीसीवर मोफत अपग्रेडद्वारे आणि नवीन पीसीवर प्री-इन्स्टॉल करून उपलब्ध केले जात आहे.

भारतीय युजर्ससाठी Windows 11 रोलआऊट, तुमच्या PC वर सिस्टिम कशी इन्स्टॉल करणार? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
Windows 11
Follow us
| Updated on: Oct 05, 2021 | 5:03 PM

मुंबई : मायक्रोसॉफ्टने भारतात विंडोज 11 रोलआउट करण्यास सुरुवात केली आहे. लेटेस्ट सॉफ्टवेअर विंडोज 10 पीसीवर मोफत अपग्रेडद्वारे आणि नवीन पीसीवर प्री-इन्स्टॉल करून उपलब्ध केले जात आहे. कंपनीने जाहीर केले आहे की, विंडोज 11 असुस, एचपी आणि लेनोवो सारख्या भागीदारांकडून नवीन उपकरणांवर प्री-इन्स्टॉल केले जाईल आणि लवकरच Acer आणि Dell च्या नवीन डिव्हाईसेसमध्ये उपलब्ध होईल. (Windows 11 Now Available for Download in India, know How to Get It on Your PC)

मायक्रोसॉफ्टच्या मते, विंडोज 11 साठी ‘डाउनलोड आणि इंस्टॉल’ पर्याय निवडल्यानंतर वापरकर्त्यांना मायक्रोसॉफ्ट सॉफ्टवेअर लायसन्सच्या अटी स्वीकाराव्या लागतील. यानंतरच डाऊनलोड करण्याची प्रक्रिया सुरू होईल. मायक्रोसॉफ्टने यापूर्वी म्हटले होते की, वापरकर्ते त्यांच्या जुन्या पीसीवर विंडोज 11 वापरू शकतील लेटेस्ट OS साठी ISO फाइल इन्स्टॉल करून आणि ते मॅन्युअली इन्स्टॉल करून वापरता येईल.

Windows 11 तुमच्या PC वर काम करणार की नाही हे तपासा

Windows 11 तुमच्यासाठी आहे की नाही, हे तपासण्यासाठी, वापरकर्त्यांना Settings > Windows Update वर जाणे आवश्यक आहे. जर तुम्हाला अजून अपडेट मिळाले नसेल आणि तुमचा पीसी विंडोज 11 चालवू शकेल की नाही हे तपासायचे असेल तर तुम्हाला मायक्रोसॉफ्टचे PC’s Health अॅप डाउनलोड करावे लागेल.

जर विंडोज PC Health अॅप दर्शवत असेल की, आपला पीसी 11 सह सुसंगत आहे आणि तुम्ही अपडेटसाठी आणखी प्रतीक्षा करू इच्छित नसाल तर खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.

Step 1 : सर्वप्रथम विंडोज 11 सॉफ्टवेअर डाउनलोड पेजवर जा.

Step 2 : विंडोज 11 इनस्टॉलेशन असिस्ट वापरा आणि ‘Download Now’ वर क्लिक करा, त्यानंतर दिलेल्या सूचना फॉलो करा.

Step 3 : येथे तुम्ही ‘Create Windows 11 Installation Media’ वर जाऊन bootable यूएसबी ड्राइव्ह किंवा डीव्हीडी तयार करू शकता.

Step 4 : आता तुम्ही डिस्क इमेज (ISO) ला bootable मीडिया किंवा व्हर्चुअल मशीन इन्स्टॉलसाठी डाऊनलोड करु शकता.

Step 5 : आता दिलेल्या सूचना फॉलो करा आणि अशा प्रकारे आपण विंडोज 11 सहजपणे इंस्टॉल करू शकाल.

इतर बातम्या

6GB/256GB, 50 MP कॅमेरासह ओप्पोचा किफायतशीर स्मार्टफोन लाँच, अमेझॉनवर डिस्काऊंट

8-inch HD डिस्प्ले, दमदार प्रोसेसरसह Moto Tab G20 भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Flipkart Big Billion Days 2021 : Flipkart बिग बिलियन डेज 2021 मध्ये उपलब्ध असलेले टॉप स्मार्टफोन्स

(Windows 11 Now Available for Download in India, know How to Get It on Your PC)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.