AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

असा होता जगातील पहिला मोबाईल, वजन आणि किंमत ऐकून आश्चर्य वाटेल; चार्जिंगबाबत ऐकाल तर हसू फुटेल

हा फोन अत्यंत वजनदार होता. या मोबाईलचं वजन जवळपास 2 किलो होतं. तो खिशात ठेवून चालणं अशक्य होतं. त्यामुळे हा मोबाईल हातात ठेवावा लागायचा किंवा कमरेला बांधावा लागायचा.

असा होता जगातील पहिला मोबाईल, वजन आणि किंमत ऐकून आश्चर्य वाटेल; चार्जिंगबाबत ऐकाल तर हसू फुटेल
Mobile PhoneImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 21, 2023 | 8:30 AM
Share

नवी दिल्ली: आधी जे तंत्रज्ञान अत्यंत महागडं असतं नंतर ते अत्यंत स्वस्त होतं. पण त्यावेळी त्या तंत्रज्ञानाची क्रेझ प्रचंड असते. जेव्हा ती वस्तू हातात अन् रोजच्या जीवनातील भाग बनते तेव्हा तिची क्रेझ कमी होऊन जाते. मोबाईलही त्यापैकी एक. मोबाईल आला तेव्हा तो प्रचंड महागडा होता. वजनदार होता. वायरलेस होता. त्याची किंमतही खूप होती. त्यामुळे एवढ्याश्या मोबाईलमधून दूरवरच्या माणसासोबत बोलता येतं याची त्याकाळी प्रचंड क्रेझ होती. शिवाय मोबाईल जवळ असणं म्हणजे श्रीमंतीचं लक्षण मानलं जात होतं. आज मात्र, मोबाईल लहान मुलांपासून ते अबालवृद्धांपर्यंत आणि गरीबांपासून ते श्रीमंतांपर्यंत सर्वांकडे आहे. मोबाईल हा जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे.

मोबाईल फोनचा स्मार्ट फोन होण्यापर्यंतचा प्रवास अत्यंत रोचक आहे. लँडलाईनपासून ते मोबाईलपर्यंतचा हा प्रवासही तसा थक्क करणारा आहे. अनेक दशकापूर्वी पहिला मोबाईल फोन विकला गेला होता.

हा मोबाईल फोन इंजिनीअर मार्टिन कुपर यांनी तयार केला होता. त्यांनी 1970च्या दशकात मोटरोला कंपनी ज्वाईन केली होती. मार्टिन कुपर यांनी 1973मध्ये हा मोबाईल बनवला होता.

अडीच लाखाचा मोबाईल

जगातील पहिला मोबाईल फोन अमेरिकेत विकला गेला होता. 1983ची ही गोष्ट आहे. आज आपण स्मार्ट फोनवर सर्व प्रकारची डिल्स चेक करतो. मात्र, पहिल्या मोबाईल फोनची किंमत ऐकून तुम्हीही चक्रावून जाल. जगातील पहिल्या मोबाईल फोनची किंत 2500 पाऊंडस होती. म्हणजे जवळपास 4 हजार डॉलर. म्हणजेच आजच्या काळातील 2.5 लाख रुपये.

वजन 2 किलो

हा फोन अत्यंत वजनदार होता. या मोबाईलचं वजन जवळपास 2 किलो होतं. तो खिशात ठेवून चालणं अशक्य होतं. त्यामुळे हा मोबाईल हातात ठेवावा लागायचा किंवा कमरेला बांधावा लागायचा. त्या काळाच्या हिशोबाने हे तंत्रज्ञान नवे होते. त्यामुळे त्याची किंमत अधिक होती.

बॅटरी खांद्यावर, चार्जिंग 10 तास

विशेष म्हणजे या मोबाईलची बॅटरी खांद्यावर लटकवून चालावे लागे. हा मोबाईल चार्ज करण्यासाठी 10 तास लागायचे. विशेष म्हणजे एवढा वेळ चार्जिंग करूनही मोबाईलची चार्जिंग अवघे 30 मिनिटचं राहायची.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.