AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातला सर्वात फास्ट चार्जिंग स्मार्टफोन Xiaomi 11i HyperCharge जानेवारीत लाँच होणार

Xiaomi ने भारतातील 2022 साठीचा पहिला लॉन्च इव्हेंट जाहीर केला आहे. यासह, चीनी स्मार्टफोन निर्मात्या कंपनीने पुढील महिन्यात देशात Xiaomi 11i HyperCharge लॉन्च करण्याची अधिकृतपणे घोषणा केली आहे.

भारतातला सर्वात फास्ट चार्जिंग स्मार्टफोन Xiaomi 11i HyperCharge जानेवारीत लाँच होणार
Xiaomi 11i HyperCharge
| Edited By: | Updated on: Dec 23, 2021 | 6:00 AM
Share

मुंबई : Xiaomi ने भारतातील 2022 साठीचा पहिला लॉन्च इव्हेंट जाहीर केला आहे. यासह, चीनी स्मार्टफोन निर्मात्या कंपनीने पुढील महिन्यात देशात Xiaomi 11i HyperCharge लॉन्च करण्याची अधिकृतपणे घोषणा केली आहे. लॉन्चची तारीख 6 जानेवारी ठेवण्यात आली आहे. Xiaomi 11i HyperCharge व्हर्च्युअल पद्धतीने सादर केला जाईल. (Xiaomi is ready to launch 11i HyperCharge in 2022)

Xiaomi 11i हायपरचार्ज हा फोन Redmi Note 11 Pro+ चं रीर्ब्रँडेड व्हर्जन असेल. कंपनीच्या मते, आगामी स्मार्टफोन 120W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल. 100W पेक्षा अधिक फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेला हा भारतातील पहिला स्मार्टफोन आहे. कंपनीचा दावा आहे की 120W हायपरचार्ज सोल्यूशन केवळ 15 मिनिटांत 100 टक्के बॅटरी चार्ज करू शकते.

Xiaomi 11i हायपरचार्जचे स्पेसिफिकेशन्स

रिपोर्ट्सनुसार, Xiaomi 11i हायपरचार्ज हा फोन Redmi Note 11 Pro+ चं रीर्ब्रँडेड व्हर्जन असेल आणि त्याच स्पेसिफिकेशन्स सेटसह येईल. चीनमध्ये, Redmi Note 11 Pro+ 120Hz रिफ्रेश रेट आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस प्रोटेक्शनसह 6.67-इंच AMOLED पॅनेलसह येतो. डिस्प्लेमध्ये होल पंच समाविष्ट आहे ज्यामध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 16 मेगापिक्सेलचा कॅमेरा सेन्सर आहे.

या फोनच्या बॅक पॅनलवर, स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सलची अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 2 मेगापिक्सेलच्या डेप्थ सेन्सरसह 108-मेगापिक्सेलचा प्रायरमी कॅमेरा दिला जाईल.

हा फोन MediaTek Dimensity 920 चिपसेटसह सुसज्ज आहे, जो 8GB LPDDR4x RAM आणि 256GB UFS 3.1 स्टोरेजसह येतो. या फोनची मेमरी मायक्रोएसडी कार्ड सपोर्टद्वारे वाढवता येते. फोन 4500mAh बॅटरीसह येईल जो 120W फास्ट चार्जिंग आउट-ऑफ-द-बॉक्ससह जोडलेला आहे.

फोनच्या इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास यात 5G सपोर्ट, 4G LTE, ड्युअल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ 5.1, GPS, NFC, USB टाइप-सी पोर्ट, JBL स्टीरिओ स्पीकर्स, साइड-माउंट फिंगरप्रिंट सेन्सर यांसारख्या फीचर्सचा यात समावेश आहे.

इतर बातम्या

iPhone 13 सिरीजवर 20000 रुपयांची सूट, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर?

Xiaomi 12 या महिन्यात लाँच होणार, जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

ऑनलाईन फूड ऑर्डर करताय? 1 जानेवारीपासून द्यावा लागणार टॅक्स

(Xiaomi is ready to launch 11i HyperCharge in 2022)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.