AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Xiaomi कंपनीच्या बनावट वस्तू जप्त, दिल्ली पोलिसांची कारवाई

Xiaomi या चीनच्या स्मार्टफोन कंपनीचे 13 लाख रुपयांच्या बनावट वस्तू जप्त केल्या (Xiaomi product seized) आहेत.

Xiaomi कंपनीच्या बनावट वस्तू जप्त, दिल्ली पोलिसांची कारवाई
| Updated on: Dec 06, 2019 | 7:13 PM
Share

नवी दिल्ली : Xiaomi या चीनच्या स्मार्टफोन कंपनीचे 13 लाख रुपयांच्या बनावट वस्तू जप्त केल्या (Xiaomi product seized) आहेत. दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली (Xiaomi product seized) आहे. मिळालेल्या माहितीनुसार 25 नोव्हेंबरला दिल्ली पोलिसांनी गफ्फार मार्केटमधील व्यापाऱ्यांकडून या बनावट वस्तू जप्त केल्या (Xiaomi product seized) आहेत.

Xiaomi ने काढलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, 15 नोव्हेंबरला दिल्ली पोलिसांना बनावट वस्तू विक्रेत्यांची तक्रार मिळाली होती. यानंतर दिल्ली पोलिसांनी गफ्फार मार्केटमध्ये छापेमारी केली. त्यावेळी 13 लाख रुपये किंमतीचे बनावट वस्तू जप्त करण्यात आल्या. यात शाओमीचे 2000 पेक्षा जास्त वस्तूंचा समावेश आहे.

दिल्ली पोलिसांनी गफ्फार मार्केटमधील चार दुकानात छापेमारी केली. त्यावेळी या दुकानात शाओमी कंपनीच्या हुबेहुब पण बनावट वस्तू आढळल्या. बनावट वस्तूंमध्ये Mi Power Banks, Mi Necbands, Mi Travel Adaptor, Mi Earphones Basic, Mi Wireless Headsets, Redmi Air Dots या वस्तूंचा समावेश (Xiaomi product seized) आहे.

या सर्व बनावट वस्तू हे दुकानदार गेल्या वर्षभरापासून विकत होते. या बनावट वस्तूंचा फटका अनेक ग्राहकांनाही बसत होता. तसेच याचा फटका कंपनीलाही होत होता. दरम्यान सध्या या प्रकरणाची सविस्तर चौकशी सुरु आहे.

यानंतर सावधागिरी बाळगत Xiaomi ने ग्राहकांना बनावट वस्तू कशा ओळखाल? याबाबतची माहिती दिली (Xiaomi product seized) आहे.

  • Mi Powerbank किंवा यासारख्या प्रोडक्ट्समध्ये एखादा सिक्युरिटी कोड असतो. हा कोड तुम्ही शाओमीच्या वेबसाईटवर चेक करुन ती वस्तू बनावट आहे की नाही हे शोधू शकता.
  • बनावट वस्तूंच्या बॉक्सची पॅकींग आणि रिटेल बॉक्सच्या पॅकींगपेक्षा वेगळे असतात. यात कंपनीच्या वेबसाईटवर चेक करता येते.
  • तसेच कंपनीचा अधिकृत लोगो आहे का याची खात्री करावी.
  • विशेष म्हणजे फिटनेससंबंधीत प्रोडक्टला Mi Fit अॅपचा सपोर्ट दिला जातो. जर तो सपोर्ट नसेल तर ती वस्तू बनावट आहे असे समजावे.
  • Xiaomi च्या ओरिजनल बॅटरीवर Li Poly Batteries असे लिहिलेले असते. जर बॅटरीवर फक्त Li-ion असे लिहिलेले असेल, तर ती बॅटरी बनावट आहे हे समजून जा.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.