तुमचा फोन चोरीला गेला तर ‘या’ सरकारी पोर्टलवर करा तक्रार दाखल, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस
मोबाईल चोरीच्या वाढत्या घटनांमध्ये, CEIR पोर्टलने 500,000 हून अधिक फोन यशस्वीरित्या ट्रेस केले आहेत, परंतु पोलिसांकडून वसूलीचा दर फक्त 3% आहे. तर आजच्या लेखात आपण CEIR द्वारे चोरीला गेलेल्या फोनबद्दल तक्रार कशी दाखल करावी आणि तो कसा ब्लॉक करावा हे जाणून घेऊयात.

स्मार्टफोन हा आपल्या जीवनाचा एक अविभाज भाग बनला आहे. तर स्मार्टफोन हा आपला जीव की प्राण आहे. कारण प्रत्येकाच्या फोनमध्ये फोटो, व्हिडीओ, कॉन्टॅक्ट नंबर, बँक अकाऊंट माहिती, तसेच महत्वाची डॉक्युमेंटही यामध्ये असते. त्यात जर फोन चोरीला गेला तर आपला जीव कासावीस होतो. अशातच मोबाईल फोन चोरीला जाणे या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. चोरीला गेलेला फोन मिळाल्यानंतर बरेच लोकं तो परत मिळण्याची आशा सोडून देतात, परंतु आता तुम्हाला सरकारच्या 0 दूरसंचार विभागाचे CEIR पोर्टल तुमचा फोन परत मिळवण्यास मदत करतात. तर गेल्या दोन वर्षांत या पोर्टलवर 8,00,000 तक्रारी दाखल केल्याचे उघड झाले आहे.
या पोर्टलने 5,00,000 हून अधिक मोबाईल फोनचे लोकेशन ट्रॅक केले आहे आणि ती माहिती पोलिसांना दिली आहे, परंतु आतापर्यंत पोलिसांनी फक्त 13,000 फोन जप्त केले आहेत. एकंदरीत ही बाब लक्षात घेता पोलिसांनी दिलेली लोकेशन माहिती आणि जप्त केलेल्या मोबाईल फोनवरील डेटा पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की हा आकडा फक्त 3 टक्के आहे. CEIR वर तक्रार केली की तो फोन भारतात कुठल्याही नेटवर्कवर वापरता येत नाही. परंतू हा फोन वापरण्याचा प्रयत्न केला तर पोलिसांना याबद्दल लगेच समजते. तर आजच्या लेखात आपण सरकारी पोर्टल CEIR द्वारे तुम्ही तक्रार कशी दाखल करू शकता ते जाणून घेऊयात.
CEIR द्वारे तक्रार कशी करावी
https://www.ceir.gov.in/Home/index.jsp वर अधिकृत पोर्टलवर जा, वेबसाइटच्या होमपेजच्या डाव्या बाजूला दिसणाऱ्या Block Stolen/Lost Mobile पर्यायावर क्लिक करा.
या पर्यायावर टॅप केल्यानंतर, तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल, या पेजवर काही महत्त्वाची माहिती विचारली जाईल.
फोनची माहिती मागितल्यानंतर, तुम्हाला चोरी झालेल्या फोनची माहिती देखील विचारली जाईल, जसे की फोन कुठे आणि कोणत्या स्थितीत चोरीला गेला. ती सर्व माहिती यात भरा.
यानंतर, तुम्हाला काही वैयक्तिक माहिती द्यावी लागेल. सर्व माहिती दिल्यानंतर, सबमिट बटण दाबा. या स्टेपचे अनुसरण केल्यानंतर, तुमचा फोन ब्लॉक केला जाईल.
