महापौरपदाचा उमेदवार मीच: आमदार अनिल गोटे

विशाल ठाकूर, टीव्ही 9 मराठी, धुळे: भाजपचे धुळ्याचे आमदार अनिल गोटे यांनी भाजपविरुद्धचं दंड थोपटले आहेत. धुळे महानगरपालिकेच्या प्रचारार्थ प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी घेतलेली सभा स्वत: अनिल गोटेंनी उधळल्यानंतर, आता त्यांनी नवी घोषणा केली आहे. आमदार अनिल गोटे हे स्वत:च महापौरपदाचा उमेदवार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. अनिल गोटे यांनी शनिवारी रावसाहेब दानवे, गिरीश महाजन यांची सभा उधळून […]

महापौरपदाचा उमेदवार मीच: आमदार अनिल गोटे
Follow us
| Updated on: Nov 12, 2018 | 10:53 AM

विशाल ठाकूर, टीव्ही 9 मराठी, धुळे: भाजपचे धुळ्याचे आमदार अनिल गोटे यांनी भाजपविरुद्धचं दंड थोपटले आहेत. धुळे महानगरपालिकेच्या प्रचारार्थ प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी घेतलेली सभा स्वत: अनिल गोटेंनी उधळल्यानंतर, आता त्यांनी नवी घोषणा केली आहे. आमदार अनिल गोटे हे स्वत:च महापौरपदाचा उमेदवार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. अनिल गोटे यांनी शनिवारी रावसाहेब दानवे, गिरीश महाजन यांची सभा उधळून लावली. त्यानंतर रविवारी त्यांनी धुळ्यात जाहीर सभा घेऊन,  महापौरपदाचा उमेदवार स्वतः असल्याचं जाहीर केलं.

येत्या 9 डिसेंबरला धुळे महापालिकेची पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी सगळे राजकीय पक्ष कसून तयारीला लागले आहेत. जळगाव महापालिका निवडणुकीच्या यशानंतर भाजपला धुळे महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवायचा आहे. या निवडणुकीची जबाबदारी भाजपने जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपवली आहे. मात्र, गिरीश महाजन यांच्या नियुक्तीवर आमदार अनिल गोटे नाराज आहेत. त्यांनी स्वतः इच्छुकांच्या मुलाखती घेऊन तिकीट वाटप केली आहेत.

धुळे लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. सुभाष भामरे आणि आमदार अनिल गोटे यांच्यातला वाद हा नवीन राहिलेला नाही. त्यातच या निवडणुकीसाठी डॉ. सुभाष भामरे यांनी देखील भाजपच्या पदाधिकाऱ्यांना हाताशी धरुन महापालिका निवडणुकीची तयारी सुरु केली आहे.भाजपत डॉ. भामरे आणि आमदार गोटे यांच्यात 2 गट पडले असून कोणत्या प्रभागात कोणाला तिकीट मिळणार याबाबत सुरुवातीपासून संभ्रम निर्माण झाला आहे.

आमदार अनिल गोटे यांनी स्वच्छ आणि कोरी पाटी असणाऱ्या तरुण उमेदवारांना संधी देण्याचे ठरवले आहे. मात्र दुसरीकडे डॉ. सुभाष भामरे हे राष्ट्रवादीसह अन्य पक्षातल्या आणि महत्वाची पदे घेऊन पक्षाला सोडचिठ्ठी दिलेल्या लोकांना भाजपात प्रवेश देत आहेत. त्यातल्या अनेक लोकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे देखील दाखल आहेत.

आमदार अनिल गोटे हे भाजपात तरुण उमेदवारांना संधी देऊ इच्छित असताना, दुसरीकडे भामरे हे आयारामांना संधी देत असल्याचा आरोप आहे. आमदार अनिल गोटे यांनी याबाबत वेळोवेळी पत्रक काढून भामरे यांच्यावर टीका देखील केली आहे.

धुळे शहरात शनिवारी भाजपचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेव दानवे ,जसलसंपदा मंत्री गिरीश महाजन,डॉ सुभाष भामरे ,पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत सभा होती. या सभेत भाषण सुरू असताना कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ उडाला आणि आमदार गोटे यांना डावल्याचा आरोप करीत कार्यकर्ते एकमेकांत भिडले. गोंधळ वाढतच पोलिसांनी मध्यस्ती करत वाद मिटवला.

संबंधित बातम्या 

भाजपच्या अनिल गोटेंनी दानवे, महाजनांची सभा उधळली

Non Stop LIVE Update
शाह ठाकरेंच्या विरोधात तर मोदी बाजूने? मोदींच्या मनात ठाकरेंबद्दल काय?
शाह ठाकरेंच्या विरोधात तर मोदी बाजूने? मोदींच्या मनात ठाकरेंबद्दल काय?.
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.