आधी सरण रचलं, मग पेटत्या चितेत उडी घेतली
राजू गिरी, टीव्ही 9 मराठी, नांदेड: शेतकऱ्याने स्वत:चं सरण रचून पेटत्या चितेत उडी घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार नांदेडमध्ये घडला आहे. दुष्काळ आणि नापिकीमुळे हैराण झालेल्या शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचललं. पोत्तना बोलपीलवाड असं या 60 वर्षीय शेतकऱ्याचं नाव आहे. उमरी तालुक्यातील तुराटी गावात ही घटना घडली. पोत्तना यांच्यावर बँकेचं कर्जही होतं. त्यातच दुष्काळ आणि नापिकी तर […]

राजू गिरी, टीव्ही 9 मराठी, नांदेड: शेतकऱ्याने स्वत:चं सरण रचून पेटत्या चितेत उडी घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार नांदेडमध्ये घडला आहे. दुष्काळ आणि नापिकीमुळे हैराण झालेल्या शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचललं. पोत्तना बोलपीलवाड असं या 60 वर्षीय शेतकऱ्याचं नाव आहे. उमरी तालुक्यातील तुराटी गावात ही घटना घडली.
पोत्तना यांच्यावर बँकेचं कर्जही होतं. त्यातच दुष्काळ आणि नापिकी तर पाचवीला पूजलेली. अशात दिवाळसणही आल्याने खचलेल्या पोत्तना यांनी स्वत:चं सरण रचून पेटत्या चितेत उडी घेऊन आयुष्य संपवलं.
सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे, शिवाय कर्जमाफीचीही घोषणा यापूर्वीच झाली आहे. तरीही शेतकरी आत्महत्या होत असल्याने, सरकारी योजनांची अंमलबजावणी होते की नाही असा प्रश्न पडला आहे.
पोत्तना यांच्या डोक्यावर बँकेचे कर्ज होते. ते कर्ज कसे फेडायचे याची चिंता त्यांना लागली होती. कर्जमाफीच्या गोंधळामुळे त्यांना बँकेने कर्ज देण्यास नकार दिला. त्यामुळे उसनवार करुन त्यांनी पेरणी केली. परंतु पावसाने ओढ दिल्याने चिंता वाढली. याच परिस्थितीत त्यांनी स्वत:चं सरण रचून आत्महत्या केली.