अवनीच्या हत्येची चौकशी करु : मुख्यमंत्री

मुंबई: टी वन वाघिणीला ठार केल्याप्रकरणी चौकशी केली जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं. ते मुंबईत बोलत होते.  वाघिणीला ठार मारणे हे दु:खदायक होतं असंही मुख्यमंत्री म्हणाले. यवतमाळमधील नरभक्षक वाघिणीला शुक्रवारी रात्री गोळी घालून ठार करण्यात आलं. याप्रकारानंतर प्राणीप्रेमींकडून निषेध व्यक्त होत आहे. खुद्द केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री मेणका गांधी यांनी या […]

अवनीच्या हत्येची चौकशी करु : मुख्यमंत्री
Follow us
| Updated on: Nov 05, 2018 | 4:15 PM

मुंबई: टी वन वाघिणीला ठार केल्याप्रकरणी चौकशी केली जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं. ते मुंबईत बोलत होते.  वाघिणीला ठार मारणे हे दु:खदायक होतं असंही मुख्यमंत्री म्हणाले.

यवतमाळमधील नरभक्षक वाघिणीला शुक्रवारी रात्री गोळी घालून ठार करण्यात आलं. याप्रकारानंतर प्राणीप्रेमींकडून निषेध व्यक्त होत आहे. खुद्द केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री मेणका गांधी यांनी या घटनेचा निषेध नोंदवत, महाराष्ट्र सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं.

मेणका गांधींच्या आक्रमक पवित्र्यानंतर राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टीकरण देताना, सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने वाघिणीला मारल्याचं म्हटलं. तसंच वाघ मारल्याने कोणाला आनंद झालेला नाही, तर ती नरभक्षक असल्याने तिला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला. पण तिने प्रतिहल्ला केल्याने तिच्यावर गोळी झाडल्याचं स्पष्टीकरण दिलं.

या सर्व प्रकारानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टी वन वाघिणीच्या हत्येची चौकशी करण्याची घोषणा केली. वाघिणीचा खात्मा

तब्बल 13 जणांची शिकार करणाऱ्या नरभक्षक टी-1 वाघिणीचा खात्मा करणाऱ्यात अखेर दीड महिन्यांनी यश आलं. शार्प शूटर अजगर अलीने शुक्रवारी 2 नोव्हेंबरच्या  रात्री एकच्या सुमारास टी-1 वाघिणीला अचूक टिपत तिला गतप्राण केलं. टी-वाघिणीचा खात्मा होताच, गेल्या अनेक दिवसांपासून भयभीत अवस्थेत जगणाऱ्या यवतमाळच्या राळेगावातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडत एकच जल्लोष केला.

संबंधित बातम्या 

मध्यरात्री शार्प शूटरचा नेम बसला, नरभक्षक वाघिणी ठार झाली! 

वाघिणीला ठार करणाऱ्या शार्प शूटरची धारदार प्रतिक्रिया 

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.