3 काळ्या नागांनी फणा काढल्याचा विस्मयकारी क्षण, नेटकऱ्यांकडून फोटो व्हायरल

जो कोणी हा फोटो पाहत आहे, तो अगदी स्तब्ध झालेला दिसतो आणि हा फोटो पुन्हा पुन्हा पाहतो. फोटो पाहून ज्यांना आश्चर्य वाटलं नाही असे लोक कमीच आहेत.

3 काळ्या नागांनी फणा काढल्याचा विस्मयकारी क्षण, नेटकऱ्यांकडून फोटो व्हायरल
3 नागांनी फणा काढल्याचा फोटो
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: VN

Nov 18, 2021 | 4:04 PM

सोशल मीडियावर अनेकदा प्राण्यांचे अनेक व्हिडिओ आणि फोटो पाहायला मिळतात. जे पोस्ट होताच व्हायरल होतात. इंटरनेटवर जंगलाशी संबंधित अनेक मनोरंजक फोटोही आहेत. तुम्ही सर्वांनी सापाचे बरेच व्हिडिओ आणि फोटो पाहिले असतील, साप हा असा प्राणी आहे ज्याला लोक घाबरतात, परंतु आता जे समोर आले आहे ते खूपच मनोरंजक आहे. हा फोटो सर्व सोशल मीडिया युजर्सचे लक्ष वेधून घेत आहे. खरं तर हा फोटो महाराष्ट्रातील मेळघाटातील जंगलांतील आहे. जिथं एक विस्मयकारक दृश्य पाहायला मिळालं. व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये काळ्या रंगाचे तीन नाग झाडाभोवती गुंडाळलेले दिसत आहेत. (3 Black Cobra Snake Photo Ifs officer shares 3 cobras together photo goes viral on social media)

जो कोणी हा फोटो पाहत आहे, तो अगदी स्तब्ध झालेला दिसतो आणि हा फोटो पुन्हा पुन्हा पाहतो. फोटो पाहून ज्यांना आश्चर्य वाटलं नाही असे लोक कमीच आहेत. त्यामुळे आता हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तज्ज्ञांच्या मते, काळ्या रंगाचे कोब्रा एकत्र दिसणं फार दुर्मिळ आहे. आता हा फोटो पोस्ट झाल्यापासून सोशल मीडियाच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळत आहे.

फोटो पाहा

हा फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. हे छायाचित्र सुसंता नंदा IFS ने त्यांच्या ट्विटर पेजवर शेअर केले आहे. फोटो शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘आशीर्वाद… जेव्हा एकाच वेळी तीन साप तुम्हाला आशीर्वाद देतात.’ यासोबतच त्यांनी फोटोचे क्रेडिट राजेंद्र सेमलकर यांना दिले आहे. हा फोटो व्हायरल होताना हजारो लोकांनी पाहिला आहे, तसेच हजारो लोकांनी फोटोवर कमेंट करताना त्यांच्या प्रतिक्रिया देखील शेअर केल्या आहेत.

लोकांच्या कमेंट्सबद्दल बोलताना एका यूजरने कमेंट करत लिहिले की, ‘आपल्याला जेवढे वाटते तितके साप हिवाळ्यात हायबरनेट करत नाहीत. हवामान, प्रदेश, हवामान, तापमान, अन्न, वनस्पती इत्यादींवर अवलंबून असते.’ दुसर्‍या वापरकर्त्याने लिहिले, ‘मला वाटत नाही की हे कोणत्याही प्रकारे आशीर्वाद आहे’ तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, ‘शेअर केल्याबद्दल धन्यवाद. 3 नागांना एकत्र पाहणे सामान्य गोष्ट नाही.’ दुसर्‍याने लिहिले, ‘हे चित्र खूप सुंदर आहे’ याशिवाय काही लोकांनी या तीन सापांना कुटुंब असल्याचे सांगितले आहे.

हेही पाहा:

Video: शाहरुख मलायकाच्या गाण्यावर मित्रांचा भन्नाट डान्स, नेटकरी म्हणाले, हे गाणं ऑल टाईम हीट आहे!

Video: चिकन घशात अडकलं, दम घुटला, जीव जाणार, तितक्यात एकाने प्राण वाचवले!

 

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें