Viral Video: क्या सांप बनेगा रे तू!; व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हालाही येईल हसू
Viral Video: सध्या सोशल मीडियावर सापाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर अनेकांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. हा सापाचा व्हिडीओ तुम्ही देखील नक्की पाहा...

सापाचे नाव जरी काढले तरी भल्याभल्यांना घाम फुटतो. पृथ्वीवरील सर्वात विषयी प्राण्यांमध्ये सापाचे नाव घेतले जात. त्यांच्यापासून सर्वजण स्वत:चे रक्षण करताना दिसतात. पण सध्या सोशल मीडियावर या विषारी प्राण्याचा एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने साप पाकडला आहे. त्यानंतर सापाने जे काही केले ते पाहून अनेकांना हसू अनावर झाले. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहे. आता व्हिडीओ नेमका काय आहे? चला पाहूया…
व्हिडीओमध्ये नेमकं काय?
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक साप आपल्या मार्गाने जात असतो. अचानक तिथे एक व्यक्ती येतो आणि त्याला हातात पकडते. त्यामुळे साप चिडतो आणि त्याला चावण्याचा प्रयत्न करतो. पण दात नसल्याने बिचारा साप चावूच शकत नाही. साप अनेकदा चावण्यासारखी धडपड करतो, पण प्रत्येक वेळी त्याचा हल्ला हवेतच होतो. साधारणपणे सापाचे नाव ऐकताच लोकांच्या हृदयाचे ठोके वाढतात, पण या व्हिडीओत तर उलटेच झाले आहे. या व्हिडीओवर अनेकांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. कारण सापाच्या कृतीने कोणीही घाबरवण्याऐवजी हसवण्याचे काम करेल.
वाचा: 19-20 वर्षाच्या मुलींना माझा व्हिडीओ… प्राजक्ता माळीने सांगितला धक्कादायक अनुभव
Attack 100% Damage 0% 🥹❤️ pic.twitter.com/rGNraGxG8u
— Nature is Amazing ☘️ (@AMAZlNGNATURE) September 26, 2025
लाखो वेळा पाहिला गेला व्हिडीओ
हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (ट्विटर) वर @AMAZlNGNATURE या आयडीवरून शेअर करण्यात आला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिण्याच आले आहे की, ‘अटॅक 100% डॅमेज 0%’ म्हणजे सापाने त्या व्यक्तीला चावण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण त्याला काहीही नुकसान करू शकला नाही. अवघ्या 14 सेकंदांच्या या व्हिडीओला आतापर्यंत 3 लाखांहून अधिक वेळा पाहिले गेले आहे, तर 4 हजारांहून अधिक लोकांनी व्हिडीओला लाइक केले आहे आणि विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
नेटकऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया
व्हिडीओ पाहून एका यूजरने कमेंट केली आहे की, ‘इतकी मेहनत करतोय, पण चावतच नाही. बिचारा अपयशी ठरला,’ तर दुसऱ्या यूजरने मिश्किलपणे म्हटले आहे की, ‘असं वाटतंय की सापाचं प्रशिक्षण अपूर्ण राहिलं.’ तर तिसऱ्या युजरने लिहिलं आहे की, ‘याला पाहून तर वाटतंय की, पाल हिच जास्त धोकादायक आहे.’
