AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral Video: सिंह आणि गेंड्यामध्ये तुफान फाईट, या लढाईनं अखेर ठरवलं ‘जंगलाचा राजा’ कोण?

Viral Video: आजकाल सोशल मीडियावर जंगलातील प्राण्यांचे तुफान व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये सिंह आणि गेंड्यामध्ये जोरदार लढाई होताना दिसत आहेत. हा आश्चर्यकारक व्हिडीओमध्ये शेवटी कोण जिंकतं असा प्रश्न सर्वांचा मनात येतो. त्यासाठी बातमीमधील व्हिडीओ नक्की पाहा...

Viral Video: सिंह आणि गेंड्यामध्ये तुफान फाईट, या लढाईनं अखेर ठरवलं 'जंगलाचा राजा' कोण?
Viral videoImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Sep 13, 2025 | 5:57 PM
Share

जंगलाच्या दुनियेत ताकद आणि धैर्य हीच प्राण्याची खरी ओळख असते. कारण याशिवाय त्यांचे जिवंत राहणे कठीण आहे. खरे तर जंगलात जीवन आणि मृत्यूची लढाई नेहमीच सुरू असते. कधी अजगर आणि मगर यांच्यामध्ये लढाई होते. तर कधी वाघाच्या बछड्यावर मगरी हल्ला करतात. याचेच एक जिवंत उदाहरण देणारा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये जंगलाचा राजा म्हणून ओळखला जाणारा सिंह आणि वजनदार गेंडा समोरासमोर आले आहेत. दोघांमध्ये इतकी जोरदार टक्कर होते की पाहणारे थक्क होतात, पण प्रश्न असा आहे की या लढाईत जंगलाचा खरा राजा कोण ठरला? हे पाहण्यासाठी सर्वजण आतुर आहेत.

नेमकं व्हिडीओमध्ये काय घडलं?

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओच्या सुरुवातीला तुम्ही पाहू शकता की सिंह आणि गेंडा समोरासमोर आहेत. दोघेही एकमेकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहेत. सिंह आपल्या चपळाईने आणि तीक्ष्ण नखांनी गेंड्याला घाबरवण्याचा प्रयत्न करतो. पण वजनदार गेंडा सिंहला कुठे घाबरणार? तो आपल्या शिंगाने सिंहावर हल्ला करतो. त्याचा हल्ला सिंहाला तेथून पळून जाण्यास भाग पाडतो. गेंड्याची ताकद आणि आक्रमकता पाहण्यासारखी आहे. शेवटी सिंहाला मैदान सोडून पळ काढावा लागतो. पण पुढे गेंड्याचा सामना सिंहांच्या कळपाशी होतो. जो त्याला आणि त्याच्या पिल्लाला त्रास देण्याचा प्रयत्न करतो. पण गेंड्याने एकट्याने सर्वांची हालत खराब केली आहे.

वाचा:  Jobs 2025: 12वी पास तरुणांसाठी सुवर्णसंधी! फॉरेस्ट गार्ड भरतीत मिळेल 69 हजारांपर्यंत पगार

हा थक्क करणारा वन्यजीव व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (ट्विटर) वर @Predatorvids या आयडीवरून शेअर करण्यात आला आहे. सुमारे 1 मिनिटाच्या या व्हिडीओला आतापर्यंत 15 हजारांहून अधिक वेळा पाहिले गेले आहे. तसेच शेकडो लोकांनी व्हिडीओला लाइक केला आहे आणि विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

नेटकऱ्यांनी केल्या कमेंट्स

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. व्हिडीओवर एका युजरने कमेंट करत लिहिले की, ‘आज जंगलाचा खरा राजा गेंडा ठरला’, तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले की, ‘सिंहाची डरकाळीही गेंड्याच्या शिंगांपुढे निष्फळ ठरली.’ काही युजर्सनी मजेशीर कमेंट करत लिहिले की, ‘गेंड्याने सिंहाला दाखवून दिले की फक्त नावाचा राजा असणे पुरेसे नाही.’

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.