Video: सरकारी फाईल तोंडात घेऊन बकरी पसार, सरकारी बाबूवर बकरीमागे धावण्याची वेळ, पाहा भन्नाट व्हिडीओ!

हा व्हिडिओ एका बकरीचा आहे, जी सरकारी कार्यालयाला 'लुटून' पळून जाते. ज्यात ती चक्क सरकारी फाईल्स तोंडात धरुन पळते. हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील कानपूरचा असल्याचं समजतं आहे

Video: सरकारी फाईल तोंडात घेऊन बकरी पसार, सरकारी बाबूवर बकरीमागे धावण्याची वेळ, पाहा भन्नाट व्हिडीओ!
सरकारी फाईल्स तोंडात धरुन पळणारी बकरी

सोशल मीडिया ही व्हायरल व्हिडिओंची खाण आहे. सोन्याच्या खाणीतून जसं सोनं बाहेर येतं, त्याचप्रमाणे सोशल मीडियाच्या खाणीतून मोठ्या प्रमाणात व्हायरल होणारे व्हिडीओही समोर येतात. काही व्हिडिओ खूप भावनिक असतात तर काही खूप मजेदार असतात, जे लोकांचे मनोरंजन करतात, त्यांचे मनोरंजन करण्याचे काम करतात. काही व्हिडिओ इतके मजेशीर असतात की, ते पाहून लोक हसतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हीही हसल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचवेळी हेही म्हणाल की, हा तर दुर्लक्षाचा कळस आहे. (Amazing Video of Goat ran away with a government file in kanpur Viral Video)

हा व्हिडिओ एका बकरीचा आहे, जी सरकारी कार्यालयाला ‘लुटून’ पळून जाते. ज्यात ती चक्क सरकारी फाईल्स तोंडात धरुन पळते. हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील कानपूरचा असल्याचं समजतं आहे, जो एका सरकारी कार्यालयाचा आहे. खरं तर प्रकरण असे आहे की, सरकारी कार्यालयात एक बकरी घुसली आणि तिथून फाईल तोंडात दाबून पळली. बकरी तोंडात फाईल धरून बाहेर कशी उभी आहे हे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. तेवढ्यात कार्यालयातील एक कर्मचारी ती फाईल घेण्यासाठी धावत येतो, मात्र त्याला पाहताच शेळी पळून जाते.

फाईल तोंडात धरुन शेळी कशी धावत आहे आणि फाईल आणण्यासाठी कर्मचारी त्याच्या मागे धावत आहे, हे व्हिडिओमध्ये दिसत आहे. तो बकऱ्याच्या मागे लांबपर्यंत धावतो, पण शेळी फाईल देण्याचे नाव घेत नाही. जणू बऱ्याच वर्षांनंतर शेळीला अशी एखादी वस्तू सापडली आहे, ज्याची तिला खूप गरज होती आणि ती गोष्ट कोणालाही देऊ इच्छित नाही.

पाहा व्हिडीओ:

बकरी आणि त्या सरकारी कर्मचाऱ्याचा बकरीमागे पळण्याचा व्हिडिओ लोकांना आवडला आहे. अवघ्या 22 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 50 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर 4 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. @apnarajeevnigam या आयडी नावाने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे आणि त्यात लिहिले आहे, ‘कानपूरपण भन्नाट आहे रे भाऊ.. कागद चघळत सरकारी कार्यालयातून एक बकरी पळत आहे आणि कर्मचारी तिचा पाठलाग करत आहेत’.

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या मजेशीर कमेंट्स दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘बकरी म्हणते, मी पेपर दाखवणार नाही, सरकारी मदत खाणार आहे’ ! दुसरीकडे, दुसऱ्या युजरने व्हिडिओचा आनंद घेताना लिहिले आहे की, ‘ अशा कारणांमुळेच सरकारला कोणत्याही प्रकरणाचा डेटा मिळत नाही’.

हेही पाहा:

Video: पाकिस्तानच्या त्या तरुणीचा पुन्हा एक व्हिडीओ व्हायरल, तरुणीच्या सौंदर्यावर नेटकरी फिदा!

Video: माकडांचं टोळीयुद्ध पाहिलंय, जे पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल, हे खरंच आपलेच पूर्वज आहेत!

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI