Video: माकडांचं टोळीयुद्ध पाहिलंय, जे पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल, हे खरंच आपलेच पूर्वज आहेत!

या भांडणाचा मजेदार व्हिडीओस सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दोन गटांत विभागलेली माकडे दिसतात. दोन्ही टोळ्या एकमेकांवर हल्ला करत होत्या. कधी एक टोळी वरचढ असायची तर कधी दुसरी.

Video: माकडांचं टोळीयुद्ध पाहिलंय, जे पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल, हे खरंच आपलेच पूर्वज आहेत!
माकडांच्या भांडणाचा व्हिडीओ

लोकांना एखाद्या गोष्टीचा राग आला तर ते सगळ भांडणावर उतरतात. त्यातूनच अनेक हिंसाचाराच्या बातम्याही समोर येतात. कधी लोक एकमेकांशी भिडतात, तर कधी गट तयार करून हल्ला करतात. पण एखाद्या प्राण्याला टोळीत भांडताना पाहिलंय का? तुम्ही हे पाहिले नसेल. तर आज आम्‍ही तुम्‍हाला असाच एक व्हिडिओ दाखवत आहोत, ज्यात दोन माकडांची टोळी भिडली. ( Animal Attack Video of Fierce fighting between 2 groups of monkeys, video viral)

या भांडणाचा मजेदार व्हिडीओस सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दोन गटांत विभागलेली माकडे दिसतात. दोन्ही टोळ्या एकमेकांवर हल्ला करत होत्या. कधी एक टोळी वरचढ असायची तर कधी दुसरी. अशा प्रकारे हा हल्ला सातत्याने होत होता. माकडांच्या टोळीची ही झुंज बघून जणू माणसं आपापसातच लढत आहेत, असं वाटत होतं.

ट्विटरवर @Animal_World नावाच्या अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ते आजवर अनेकांनी पाहिले आहे. हा व्हिडिओ जंगलात शूट करण्यात आला आहे. गटात कशावरून तरी भांडण झाले. त्यानंतर दोघे आमनेसामने आले. कधी माकड कुणाला थोबाडीत मारतो तर कधी कुणाला लाथ मारतो. अशा प्रकारे हा लढा बराच काळ चालला.

व्हिडीओ पाहा:

व्हायरल झालेल्या व्हिडिओवर लोकांनी खूप कमेंटही केल्या. एका व्यक्तीने लिहिले की, कदाचित ही भांडणे एखाद्या माकडाच्या प्रेमप्रकरणातून झाली असावी. हा 15 सेकंदाचा व्हिडिओ अनेकवेळा पाहिला गेला आहे. जेव्हा एखादी टोळी एखाद्या माकडावर हल्ला करत होती, तेव्हा दुसरी त्याला वाचवण्यासाठी पुढे येत होती. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

हेही पाहा:

Video: कुत्र्याची गाडी आली, पळा..पळा.., कुत्र्यांच्या भन्नाट व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल, लोक पोट धरुन हसले!

Video: मालकाने कोंबडीला पिंजऱ्यात डांबलं, त्यानंतर कोंबड्याने असं काही केलं की, नेटकरी कोंबड्याच्या प्रेमात पडले!

 

Published On - 3:53 pm, Fri, 3 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI